ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
कोरोनामुळे अजय देवगनचा ‘थॅंक गॉड’ धोक्यात, होणार कोटींचे नुकसान

कोरोनामुळे अजय देवगनचा ‘थॅंक गॉड’ धोक्यात, होणार कोटींचे नुकसान

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने भारतात भीतीचं वातावरण निर्माण केलं आहे. कोरोना महामारीचा फटका सर्वसामान्याप्रमाणेच बॉलीवूडलाही बसत आहे. मागच्या दोन वर्षांपासून अनेक चित्रपट यामुळे रखडले आहेत. कोरोनाची पहिली लाट ओसरल्यावर सर्व काही आलबेल होईल अशी आशा वाटत असतानाच देशात कोरोनाची दुसरी लाट निर्माण झाली. ज्यामुळे अनेक ठिकाणी कडक लॉकडाऊन करण्यात आलेलं आहे. ज्यामुळे सर्व चित्रपट आणि मालिकांचे शूटिंग सध्या बंद आहे. चित्रपटगृहे बंद असल्यामुळे चित्रपट चित्रपटगृहाच प्रदर्शित देखील होत नाही आहेत. अशाचट अजय देवगण, सिद्धार्थ मल्होत्रा आणि रकुल प्रीतची मुख्य भूमिका असलेल्या थॅंक गॉड या चित्रपटालाही करोडोंचे नुकसान सहन करावे लागणार आहे.

कोरोनामुळे थॅंक गॉड धोक्यात

अजय देवगणच्या थॅंक गॉडचं शूटिंग लवकरच सुरू होणार होतं. मात्र अचानक आलेल्या कोरोनाच्या लाटेमुळे या चित्रपटाचे शूटिंग बंद करण्यात आलं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या चित्रपटासाठी मुंबईतील फिल्म सिटीमध्ये एक भव्य दिव्य सेट उभारण्यात आला होता. या चित्रपटाच्या पहिल्या शेड्यूलच्या शूटिंगची तयारी झाली होती. मात्र पुन्हा कोरोनाने डोकं वर काढलं आणि एप्रिलपासून शूटिंगवर निर्बंध घालण्यात आले. ज्यामुळे थॅंक गॉड सह अनेक चित्रपटांना नुकसान सहन करावे लागत आहे. शूटिंग रखडल्यामुळे पुढचे कोणतेच प्लॅन आता करणं शक्य नाही. जोपर्यंत सर्व ठीक होत नाही तोपर्यंत वाट पाहण्यापलीकडे आता हातात काहीच उरलं नाही.

थॅंक गॉडच्या सेटचा खर्च पाण्यात

फिल्म सिटीत बांधलेल्या या सेटसाठी दररोजचं भाडं निर्मात्यांना भरावं लागत आहे. लॉकडाऊन संपून सर्व काही आलबेल होईपर्यंत हे सर्व असंच सुरू राहणार आहे. असे किती दिवस सेटचं भाडं भरायचं हा निर्मात्यांसमोर निर्माण झालेला पेच होता.  असं करत राहिल्यास या चित्रपटातून जवळजवळ कोटींचे नुकसान होण्याची शक्यता होती. ज्यामुळे निर्मांत्यांनी चक्क थॅंक गॉडचा सेटच नष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. आता निर्मांत्यांना यामुळे फक्त दोन कोटीचे नुकसान सहन करावे लागू शकते. अजयचा थॅंक गॉड इंद्र कुमार दिग्दर्शित करत आहे. तर भूषण कुमार, किशन कुमार, अशोक ठकेरिया, सुनिल खेतपाल, आनंद पंडित, दीपक मुकुट, मकरंद अधिकारी याचे निर्माते आहेत. या चित्रपटातून पहिल्यांदाच अजय देवगण आणि सिद्धार्थ मल्होत्रा ही जोडी पडद्यावर झळकणार आहे. त्यामुळे चाहत्यांना या चित्रपटाबद्दल नक्कीच उत्कंठा लागून राहिली आहे. पहिल्यांदा  जेव्हा लॉकडाऊन झालं होतं तेव्हाही चित्रपटसृष्टीचं बरंच नुकसान झालं होतं. मात्र यावेळी हे नुकसान काही करोडोंच्या घरात होत आहे. असं असलं तरी एकीकडे अजय देवगण त्यांच्या परीने कोरोनाग्रस्तांची मदत करत आहे. अजयने काही दिवसांपूर्वीच कोरोना रूग्णांसाठी आईसीयू बेडची व्यवस्था केली होती. त्याने पहिल्या वेळीदेखील मदतीची हात पुढे केला होता. ज्यामुळे संपूर्ण बॉलीवूड इंडस्ट्रीदेखील कोरोनाची लाट लवकर ओसरण्याची वाट पाहत आहे. कोरोनाचं संकट लवकर दूर व्हावं आणि सर्व काही पुन्हा नीट व्हावं अशी चाहत्याना आशा वाटत आहे. 

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

ADVERTISEMENT

अधिक वाचा –

गोव्यातील मालिकांचं चित्रीकरण रखडलं,मालिकांना बसणार फटका

मराठी मालिकांना झालंय तरी काय, दर्जा घसरला

लॉकडाऊन नियम मोडल्याने लग्नानंतर 9 दिवसातच सुगंधा मिश्राविरोधात FIR दाखल

ADVERTISEMENT
10 May 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT