अजय देवगण 2020 मध्ये करणार एअर स्ट्राईक

अजय देवगण 2020 मध्ये करणार एअर स्ट्राईक

सध्या बॉलीवूडमध्ये देशभक्तीपर चित्रपट आणि बायोपिकचा एक रंगच चढला आहे. शिवाय सध्या भारतामध्ये जे वातावरण आहे त्याबद्दल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवण्याचा विडा बॉलीवूडने उचलला आहे असंही एका अर्थी म्हणावं लागेल. यावर्षाच्या सुरुवातीला प्रदर्शित झालेल्या ‘उरी’ या विकी कौशलच्या चित्रपटाने तर सर्वांचीच मनं जिंकली. तर होळीच्या दिवशी प्रदर्शित झालेल्या ‘केसरी’ने देखील सर्व प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. आता अजय देवगणदेखील एक बायोपिक घेऊन प्रेक्षकांसमोर येत आहे. अजय देवगणने याआधी भगतसिंहची भूमिका साकारून प्रेक्षकांचं मन जिंकलं होतं. आता देशाच्या शत्रूंवर एअर स्ट्राईक करण्याचं अजयने ठरवलं आहे. अजय देवगणचा ‘भुज - द प्राईज ऑफ इंडिया’ हा चित्रपट 2020 मध्ये प्रदर्शित होणार असून याची तयारी सुरु झाली आहे.


2020 मध्ये अजय देणार डबल डोस


ajay devgan


सध्या अजय देवगण ‘टोटल धमाल’च्या यशाचा आनंद घेत आहे. पण 2020 मध्ये अजय देवगण प्रेक्षकांना डबल डोस देणार आहे. अजय देवगण ‘भुज - द प्राईज ऑफ इंडिया’ हा चित्रपट 2020 मध्ये प्रदर्शित करणार असून या चित्रपटामध्ये भारतीय एअरफोर्स ऑफिसर विजय कर्णिकची भूमिका अजय साकारणार आहे. हा विजय कर्णिक यांचा बायोपिक असेल. या चित्रपटाची पूर्ण टीम तयार झाली आहे. या चित्रपटामध्ये अजय देवगणबरोबर संजय दत्त, सोनाक्षी सिन्हा आणि परिणिती चोप्रा अशी तगडी स्टारकास्ट दिसणार आहे. अशा चित्रपटांमध्ये अजयला काम करण्याचा अनुभव असून बायोपिकमध्ये अजय अतिशय चांगली व्यक्तिरेखा साकारताना आतापर्यंत दिसला आहे. 


तरण आदर्शने दिली माहितीट्रेड अनालिस्ट तरण आदर्शने या चित्रपटाबद्दल धमाकेदार माहिती सोशल मीडियावर दिली आहे. आपल्या अधिकृत अकाऊंटवरून ही माहिती तरण आदर्शने दिली. तरण आदर्शने यामध्ये म्हटलं आहे की, ‘#BhujThePrideOfIndia मध्ये काम करणार अजय देवगण. 1971 मध्ये झालेल्या भारत - पाक युद्धादरम्यान आयएएफ विंग कमांडर विजय कर्णिक यांची भूमिका अजय साकारणार आहे. याचं दिग्दर्शन अभिषेक दुधई करणार असून गिन्नी खनुजा, वझिर सिंह, भूषण कुमार हे या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत.’ तरणने ही पोस्ट शेअर केल्यामुळे अजय ही भूमिका साकारणार आहे हे स्पष्ट झालं आहे. विजय कर्णिक यांनी 1971 मध्ये भारत - पाकिस्तान युद्धादरम्यान खूपच महत्त्वाची भूमिका निभावली होती. विजय कर्णिक यांचं काम खूप मोठं होतं. त्यामुळे त्यांच्यावर हा चित्रपट बनवण्यात येणार आहे.


अजय देवगण प्रचंड व्यग्र


ajay


अजय देवगण सध्या त्याचा आगामी चित्रपट ‘दे दे प्यार दे’ आणि ऐतिहासिक चित्रपट ‘तानाजी द अनसंग वॉरियर’ च्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. यानंतर फुटबॉल कोच सय्यद अब्दुल रहीमच्या बायोपिकचं चित्रीकरण अजय सुरू करणार आहे. याच दरम्यान विजय कर्णिक यांचा बायोपिक ‘भुज - द प्राईज ऑफ इंडिया’च्या चित्रीकरणाला सुरुवात करेल. मागच्या काही दिवसांमध्ये अजयने राजामौलीचा ‘आरआरआर’ हा चित्रपटदेखील साईन केल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. या चित्रपटामध्ये अजय देवगणबरोबर आलिया भटदेखील दिसणार आहे. आता इतक्या सर्व चित्रपटांमध्ये अजय देवगण दिसणार असल्यामुळे त्याच्या चाहत्यांना नक्कीच आनंद झाला असेल.


फोटो सौजन्य - Instagram 


हेदेखील वाचा - 


Video: आईबाबांशिवाय तैमूरने केली एन्जॉय होळी


विकी कौशल करणार कतरिनाच्या बहिणीसोबत रोमान्स


रणबीरने सर्वांसमोर दिली आलियाला प्रेमाची कबुली