संजय लीला भन्सालीच्या मागे लागलीय नकार घंटा

संजय लीला भन्सालीच्या मागे लागलीय नकार घंटा

संजय लीला भन्सालीच्या इंशाअल्लाह चित्रपटाला सलमान खानने नकार दिला... आणि तेव्हा पासून या ना त्या कारणासाठी संजय लीला भन्सालीला अनेक अभिनेत्यांचे नकारच पचवावे लागत आहेत. वास्तविक इन्शाअल्लाह चित्रपटाची निर्मिती बंद झाल्यानंतर त्याने आलिया भट्टसोबत 'गंगूबाई काठियावाडी' या चित्रपटाची घोषणा केली. त्यानंतर लगेचच संजयने 1952 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'बैजू बावरा' या चित्रपटाचा रिमेक करण्याचा घाट घातला. यासाठी संजय लीला भन्सालीने बैजू बावराची अधिकृत घोषणाही केली. या चित्रपटातील बैजूसाठी त्याने त्याचा प्रिय मित्र आणि बॉलीवूडचा लोकप्रिय अभिनेता रणवीर सिंगला गळ घातली मात्र रणवीरच्या बिझी शेड्यूलमुळे त्यानेही संजयला नकार दिला. आता तर अजय देवगननेही संजयच्या बैजू बावरा चित्रपटातील तानसेनची भूमिका करण्यास नकार दिला आहे. ज्यामुळे एकेकाळी या अभिनेत्यांना स्टार करणाऱ्या दिग्दर्शकांच्या पाठीच आता नकारघंटा वाजू लागली आहे.

अजयने का दिला तानसेनच्या भूमिकेला नकार

संजय लीला भन्सालीच्या बैजू बावरामधील तानसेनची भूमिका अजय देवगनला ऑफर करण्यात आली होती. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार अजयने या चित्रपटात काम करण्यास संजयला चक्क नकार दिला आहे. यामागचं कारण असं की अजयला बैजू बावरा मधील बैजूची भूमिका ही तानसेनच्या भूमिकेपेक्षा जास्त प्रभावी आहे असं वाटत आहे. अजयने यापूर्वीही संजयला एकदा नकार दिलेला आहे. अजयने संजयच्या बाजीराव मस्तानीमध्ये काम करण्यासही आधी नकार दिला  होता. त्यामुळे संजयला अजयचा हा दुसरा नकार पचवावा लागत आहे. 

Instagram

काय आहे बैजू बावराचे कथानक

हा चित्रपट 15 व्या शतकातील दोन महान गायकांच्या जीवनकथेवर आधारित आहे. ज्या काळात बैजू बावरा आणि  तानसेन हे दोन दिग्गज कलाकार लोकप्रिय होते. बैजू हे ध्रूपद गायकीसाठी प्रसिद्ध होते. अकबराच्या दरबारात तानसेन यांना फार मानसन्मान होता. मात्र बैजू तानसेन यांना त्यांच्या वडीलांच्या मृत्यूसाठी जबाबदार ठरवत होते. यासाठी त्यांनी दरबारात तानसेन यांना संगीत स्पर्धेसाठी  आव्हान दिलं होतं. 

रणवीर आणि संजयमध्ये काय बिनसलं

या चित्रपटातील बैजूसाठी संजयने त्याचा आवडता अभिनेता रणवीर सिंहला विचारलं होतं. रणवीर संजय लीला भन्सालीचा आवडता कलाकार आहे. ज्यामुळे संजय लीला भन्सालीच्या बैजू बावराला रणवीरने का नकार दिला याबाबत सर्वांनाच आश्चर्य वाटत होतं. रणवीरने नकार दिल्यावर या चित्रपटातील बैजूसाठी संजयने अभिनेता ऋतिक रोशनची निवड केली. संजय लीला भन्सालीसोबत एखादा पिरिएड ड्रामा करण्याची ऋतिकलाही इच्छा होती. ज्यामुळे बैजू बावराचा बैजू होण्यास तो नक्कीच उत्सुक आहे.

Instagram

सलमान खान आणि संजयमध्ये कशामुळे झाला वाद

संजय लीला भन्साली आलिया भट आणि सलमान खानसोबत इंशाअल्लाह हा चित्रपट करणार होता. चाहत्यांना सलमान आणि आलियाची प्रेमकथा पाहण्याची उत्सुकता होती. मात्र चित्रपट सुरू होण्याआधीच तो निर्माण करण्याचा विचार रद्द करण्यात आला.  कारण या चित्रपटाचा निर्माता सलमान खान होता. आणि त्याने हा चित्रपट करण्याचा निर्णय अचानक बदलला. सलमानच्या या निर्णयामुळे संजय लीला भन्सालीला या प्रोजेक्टला सोडून द्यावं लागलं . भंसाळी यांच्या चित्रपटाची प्रोडक्शन कॉस्ट सलमान खानच्या फी शिवायच जवळजवळ160 करोडपर्यंत पोचली होती. सलमानची फीज तब्बल 50 करोड रूपये आहे आणि चित्रपटातील तब्बल 40 टक्के नफ्यात त्याचा वाटा होता. पण सलमान खानच्या चित्रपटाचे सॅटेलाईट आणि डिजीटल राईट्स विकले गेल्यावरही इन्व्हेस्टर्सना 210 करोड रुपये चित्रपटात गुंतवण्यात रस नव्हता. कारण याची रिकव्हरी फक्त थिएटरिकल आणि परदेशातील व्यवसायातून होणं पुरेसं नव्हतं.संजयला ग्रँड आणि बिग बजेट प्रोजेक्ट्स आवडतात. पण ईन्शाअल्लाह हा चित्रपट काही बाजीराव मस्तानी किंवा पद्मावतप्रमाणे पीरियड ड्रामा नाहीतर एक सिंपल लव्हस्टोरी होता. ज्यामुळे त्यावर एवढा खर्च करण्यासाठी सलमान तयार नव्हता. 

 

 

Instagram

फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम

हे ही वाचा -

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रॉडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रॉडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रॉडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूटही देत आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा

 

अधिक वाचा -

‘ड्रीमगर्ल’ नुशरत भरूचाने बिकिनी लुकमध्ये वाढवली चाहत्यांची ‘धडकन’

या कारणासाठी किआरा अडवाणीला व्हाचययं आहे प्रेग्नंट

शिकारीफेम नेहा खानच्या दिलखेचक अदा