अंबानींच्या घरचं लग्न म्हणजे ते धुमधडाक्यातच असणार. मागच्या वर्षीच ईशा अंबानीचं लग्न थाटामाटात पार पडल्यावर आता उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मोठ्या मुलाच्या प्रि-वेडिंग सेलिब्रेशनला सुरूवात झाली आहे. आकाश अंबानी आणि श्लोका मेहता यांचा बिग फॅट विवाहसोहळा 9 मार्चला होणार आहे. त्यामुळे अंबानी आणि मेहता परिवारात लगीनघाईला सुरूवात झाली आहे. नुकतंच मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील घरी म्हणजेच अॅंटिलियामध्ये यासाठी एका खास पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. ज्यामध्ये लोकप्रिय गायिका फाल्गुनी पाठक आणि तुषार त्रिवेदी यांचा एक स्पेशल दांडिया कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमामध्ये संपूर्ण अंबानी परिवाराने दांडिया खेळत ताल धरला. या खास पार्टीचे काही क्षण सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहेत. या कार्यक्रमासाठी अंबानी परिवारातील जवळच्या नातेवाईकांना आमंत्रित करण्यात आलं होतं. दांडियाच्या विधीसाठी कोकिलाबेन देखील आवर्जून उपस्थित होत्या. त्यांनी यावेळी गुलाबी रंगाची साडी परिधान केली होती. आकाशने निळ्या रंगाचा पारंपरिक पेहराव केला होता तर मुकेश अंबानी यांनी काळ्या रंगाचा कुर्ता घातला होता. नीता अंबानी यांनी या कार्यक्रमासाठी खास सब्यसाचीचा लेंहगा आणि हेरिटेज कलेक्शनचे अलंकार परिधान केले होते. तर टीना अंबानी सी-ग्रीन रंगाच्या साडीमध्ये शोभुन दिसत होत्या. फाल्गुनी पाठकने तिच्या नेहमीच्या शैलीमध्ये याही कार्यक्रमाची रंगत वाढवली.
View this post on Instagram
आकाश आणि श्लोकाची विवाह पत्रिका सिद्धीविनायका चरणी अर्पण
काही दिवसांपूर्वीच या दोघांच्या लग्नाची पत्रिका अर्थात मंगलपर्व सिद्धीविनायकाच्या चरणी अर्पण करण्यात आली. ही पत्रिका खूपच मोठी असून यामध्ये गणपती आणि राधा कृष्णाचे अनेक फोटोज आहे. तसेच या पत्रिकेमध्ये नीता आणि मुकेश अंबानी यांनी आपल्या पाहुण्यांना आमंत्रण देण्यासाठी एका बाजूला भावना व्यक्त केल्या आहेत तर तीन दिवस चालणाऱ्या या लग्नामध्ये नक्की कोणता अटायर हवा आणि कोणत्या वेळी कोणते विधी असणार आहेत याची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. सर्व ठिकाणी ‘मंगल भारत’, ‘मंगल विवाह’ आणि ‘मंगल पर्व’ असे मंगलमय शब्द वापरण्यात आले आहेत.
View this post on InstagramThe celebrations have begun. Congratulations Shloka and Akash #Shloka #Akashambani
कसा पार पडणार अंबानीच्या घरचा विवाहसोहळा
9 मार्चला दुपारी 3:30 ला आकाशची वरात अंबानी यांच्या घरातून निघेल आणि सायंकाळी सात वाजता आकाश आणि श्लोकाच्या लग्नाचे विधी जियो वर्ल्ड सेंटरमध्ये पार पडतील. तर 10 मार्चला संध्याकाळी या दोघांच्या लग्नाचं ग्रॅंड सेलिब्रेशन केलं जाईल. 11 मार्चला काही खास पाहुण्यांसाठी रिसेप्शन पार्टीचं आयोजन करण्यात येणार आहे. लग्नासाठी देश-विदेशातील पाहुणे मंडळी हजर होणार आहेत. लग्नाआधी आकाश अंबानी त्याच्या खास मित्रांसाठी बॅचलर पार्टी देखील देणार आहे. ही पार्टी स्वित्झलैंडमध्ये होणार असल्याची चर्चा सुरू आहे. या बॅचलर पार्टीसाठी बॉलीवूडमधून करन जोहर, रणबीर कपूर यांना बोलावण्यात येण्याची शक्यता आहे. आकाशची बहीण ईशा अर्थात अंबानींच्या लाडक्या कन्येचा विवाहसोहळा अगदी थाटामाटात पार पडला होता. आता आकाशच्या लग्नाचा शाही थाटही काही कमी नसणार त्यामुळे सर्वांचेच डोळे या विवाहसोहळ्याकडे लागले आहेत.
अधिक वाचा
‘Wedding चा शिनेमा’ चं टीझर प्रदर्शित
फोटोसौजन्य - इन्साग्राम