आकाश अंबानी आणि श्लोकाच्या लग्नाचं ‘मंगल पर्व’, पत्रिका व्हायरल

आकाश अंबानी आणि श्लोकाच्या लग्नाचं ‘मंगल पर्व’, पत्रिका व्हायरल

ईशा अंबानी आणि आनंद पिरामलचं लग्न खूपच गाजलं. साधारण 700 कोटीच्या आसपास या लग्नाचा खर्च करण्यात आला होता. अवघी बॉलीवूड आणि उद्योग जगतातील इंडस्ट्री या लग्नाला हजर होती. आता आकाश अंबानी आणि श्लोका मेहताच्या लग्नाची तारीख घोषित झाली असून 9 मार्चला या दोघांचं लग्न होणार आहे. या लग्नाची पत्रिका व्हायरल झाली आहे. अर्थात अंबानी आणि मेहता परिवाराची पत्रिका म्हणजे वेगळी असणार यात वादच नाही. ‘मंगल पर्व’ असणारी ही पत्रिका बरीच मोठी असून यामध्ये कोकिलाबेन अंबानी ते अगदी ईशा आणि आनंद यांचीदेखील नावं आहेत. ही खूप मोठी पत्रिका असून यावर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टी लिहिण्यात आल्या आहेत. दोन दिवसापूर्वीच मुंबईतील सिद्धिविनायकाच्या चरणी आकाश आणि श्लोकाच्या लग्नाची पत्रिका मुकेश आणि नीता अंबानी यांनी अर्पण केली होती. आता ही पत्रिका नक्की कशी असणार याची सर्वांनाच उत्सुकता होती. 9 मार्चला या दोघांचं लग्न जियो वर्ल्ड सेंटरमध्ये होणार असून 10 मार्चला संध्याकाळी आकाश आणि श्लोकाच्या लग्नाचं वेडिंग सेलिब्रेशन असेल आणि 11 मार्चला रिसेप्शन पार पडणार आहे.


अनंत अंबानी ही अडकणार लग्नाच्या बेडीत
 

 

 


View this post on Instagram


 

 

The celebrations have begun. Congratulations Shloka and Akash #Shloka #Akashambani


A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on
काय आहे या पत्रिकेमध्ये


ही पत्रिका खूपच मोठी असून यामध्ये गणपती आणि राधा कृष्णाचे अनेक फोटोज आहे. तसेच या पत्रिकेमध्ये नीता आणि मुकेश अंबानी यांनी आपल्या पाहुण्यांना आमंत्रण देण्यासाठी एका बाजूला भावना व्यक्त केल्या आहेत तर तीन दिवस चालणाऱ्या या लग्नामध्ये नक्की कोणता अटायर हवा आणि कोणत्या वेळी कोणते विधी असणार आहेत याची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. सर्व ठिकाणी ‘मंगल भारत’, ‘मंगल विवाह’ आणि ‘मंगल पर्व’ असे मंगलमय शब्द वापरण्यात आले आहेत. तुम्हाला आठवत असेल तर आकाशची बहीण ईशा. तिच्या लग्नाची पत्रिकाही खूप खास होती. त्या पत्रिकेची बरीच चर्चा झाली. आता आकाशच्या लग्नाचा शाही थाटही काही कमी नसणार. त्यामुळे आकाश आणि श्लोका मेहताच्या लग्नाची पत्रिका कशी असेल अशी उत्सुकता देखील आहे. ईशाच्या लग्नासाठी मुंबईतील अंबानींच्या घराचे रुपडे पालटण्यात आले होते. आता अंबांनीच्या कुटुंबात आणखी एक व्यक्तिची भर पडणार आहे. त्यामुळे तिच्या स्वागताची काय तयारी केली असेल तेही थोड्या दिवसाने समजेलच.  


akash


ईशा आणि आनंदचं 'ग्रॅन्ड रिसेप्शन'

इथे रंगणार बॅचलर्स पार्टी


लग्नाआधी आकाश अंबानी एक मोठी बॅचलर्स पार्टी करणार आहे.ही पार्टी स्वित्झर्लंड येथे होणार आहे. 23 ते 25 फेब्रुवारी या काळात ही बॅचलर्स पार्टी होणार असून थोड्याच दिवसांनी तो स्वित्झर्लंडसाठी रवाना होणार आहे. या पार्टीसाठी रणबीर कपूर, करण जोहर हमखास जाणार आहेत. शिवाय 500 लोकांची यादी तयार करण्यात आली आहे.आता ईशाच्या लग्नाला बियॉन्से, हिलरी क्लिंटन आणि संबंध बॉलीवूड आले होते. आता या बॅचलर्स पार्टीलाच 500 लोकांना आमंत्रण आहे. म्हटल्यावर विवाहसोहळा हा शाही असणार यात काही शंका नाही. मिळालेल्या माहितीनुसार सेंट मोरटीज या हॉटेलमध्ये या पार्टीची सगळी व्यवस्था करण्यात आली आहे.


ईशा अंबानी - आनंद पिरामल यांच्या लग्नावर तब्बल 700 करोडचा खर्च

कोण आहे श्लोका मेहता?


akashloka


हिरा व्यापारी रसेल मेहता यांची श्लोका ही कन्या आहे. श्लोका आणि आकाश एकत्रच शिकायला होते. दोघेही लहानपणापासूनचे मित्र आहेत. श्लोकाने आपलं शिक्षण लंडनमधून पूर्ण केलं असून सध्या श्लोका ही ब्ल्यू फाऊंडेशनची संचालक आहे. या दोघांनी काही महिन्यापूर्वीच साखरपुडा केला होता. शिवाय ईशा आणि आनंदच्या लग्नामध्येही श्लोका प्रत्येक कार्यक्रमामध्ये सहभागी झाली होती.


फोटो सौजन्य - Instagram