मराठमोळ्या आकाश कुंभारचा आगळावेगळा वर्ल्ड इंडिया रेकॉर्ड

मराठमोळ्या आकाश कुंभारचा आगळावेगळा वर्ल्ड इंडिया रेकॉर्ड

अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या इंटरनॅशनल स्पोर्ट्स फोटोग्राफर आकाश कुंभारने 10 तासात २७४ फिटनेस मॉडेल्सचे २१६७ फोटो काढण्याचा वर्ल्ड इंडिया रेकॉर्ड करून विक्रम नोंदवला आहे.


आकाशचा आश्चर्यकारक विक्रम
 

 

 


View this post on Instagram


 

 

Hello! Everyone This is a very auspicious moment for me as i have received my award for success of the completion of our much awaited project.Being honest, the journey towards the project accomplishment and subsequently towards this award was not easy; in fact it was very long. Right from the moment when the idea was conceived to the outline of the project which was initiated later on and until today, a lot of work has been done. Transforming the idea to the real output required a good deal of efforts and various challenges came in the way. I was not alone though, I had my friends who provided unconditional support to me. Together, we overcame every problem and challenges which have now become the milestones for us. The project was also very close to my heart.I am very glad to announce that we did it! I set New WorldRecord In fitness Photography Thank you! All of you and thank you! For your support @nickorton22 ❤️ #akashkumbhar #worldrecord #mumbai #fitnessphotography #fitnessphotoshoot #india #indian #marathi #pune #fitnessmotivation #fitness #fitness


A post shared by Akash Kumbhar(Hitesh) (@akashkumbharphotography) on
१० तासात २७४ फिटनेस मॉडेल्सचे फोटोग्राफ काढणारा आकाश हा पहिलाच भारतीय फिटनेस फोटोग्राफर ठरला आहे. १२ जानेवारी सकाळी १० वाजून ३० मिनिटांनी त्याने या विश्वविक्रमाला सुरूवात केली आणि त्याच दिवशी रात्री ८ वाजून ३० मिनिटांत तो पूर्णही केला. नुकताच वर्ल्ड इंडिया रेकॉर्ड्सकडून त्याचा गौरव करण्यात आला.


फॅशन, ग्लॅमर आणि स्पोर्टस जगतातलं प्रसिद्ध नाव ‘आकाश कुंभार’
 

 

 


View this post on Instagram


 

 

Hey guys today my hard work has truely paid off!!!! My 6 years of hard work in the field of photography has rewarded me on this special day of mine I have received a award as the best fashion Photographer....WOW Awards Pune awarded me with this award and this is truely the best birthday gift of all time. I would like to take this opportunity to thank all my family and friend for tremendous love and support..... guy I dedicate this award to all you guys.. One of the best Sandeep Soparkar , Mrunal kulkarni , race 3 Movie Actor Fredy Daruwala , Lovell Prabu , Vivek Pawar , Simran Ahuja, Sangram Chaughule , Mahendra Chavan , Abhyang Kuwalekar and My favourite Shobha arya 😘❤️ #akashkumbharphotography #fashionphotography #fashionphotographer #model #modellife #fashionable #fashionpage #award #bolllywood #celebrity #industry #akashkumbhar #modelphotography #fashionmagazine #sudio #makeup #makeupparty #photographs #photographystudio #dubai #thailand


A post shared by Akash Kumbhar(Hitesh) (@akashkumbharphotography) on
आकाशने आजवर अनेक राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय फॅशन डिझाइनर्ससाठी तसेच ग्लॅमरवर्ल्डमधल्या आणि स्पोर्ट्सवर्ल्डमधल्या राष्ट्रीय आणि आंततराष्ट्रीय मॉडेल्ससाठी पोर्टफोलिओ शूट केलं आहे. 2018 मध्ये एशिया आणि मीडल ईस्टच्या वॉव अवॉर्ड्सने आकाशचा आउटस्टॅंडिग फॅशन फोटोग्राफर हा सन्मान देऊन गौरव केला होता. ‘बी’ ह्या आंतरराष्ट्रीय लाईफस्टाईल मॅगझीनच्या कव्हरपेजसाठी तीनदा फोटोशूट केलेला आकाश फॅशनवर्ल्डमधलं मोठं नाव आहे.

आकाशला शुभेच्छा देताना वर्ल्ड इंडिया रेकॉर्डचे अध्यक्ष पवन सोलंकी यांनी दिलेली प्रतिक्रिया, ‘आकाश कुंभार हा जगातील पहिला फिटनेस फोटोग्राफऱ आहे. त्याने १० तासात २७४ फिटनेस मॉडेल्सचे २१६७ फोटो काढण्याचा विक्रम केला. यासाठी त्याचं वर्ल्ड इंडिया रेकॉर्डमध्ये नाव नोंदवण्यात आलं असून हा विश्वविक्रम केल्याबद्दल त्याला शुभेच्छा.’


फिटनेस फोटोग्राफीविषयी जागरूकता हवी

आकाश कुंभार आपल्या विक्रमाविषयी बोलताना म्हणाला की, “ मी 2012 सालापासून फिटनेस इंडस्ट्रीत काम करतोय. मी अनेक आंतरराष्ट्रीय किर्तीच्या मॉडेल्ससाठी फोटोशूट केलं आहे. पण एका दिवसात २७४  मॉडेल्सचे फोटो काढणं हे माझ्यासाठी खूप आव्हानात्मक होतं. तसंच  भारतात फिटनेस फोटोग्राफीविषयी जागरूकता नसल्याचं मला जाणवलं. मला हा विक्रम नोंदवून फिटनेस फोटोग्राफीविषयी जागरूकता आणायची आहे. फोटोग्राफीकडे व्यावसायिकदृष्टीने न पाहता, कलात्मक माध्यमातून नव्या पिढीने पाहावं, यासाठी मी हा विक्रम नोंदवला आहे. या विक्रमाचं श्रेय मी माझ्या आई, वडिलांना तसेच माझ्या मित्रांना देऊ इच्छितो. काही दिवसातच मी यूकेमध्ये जाऊन गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नाव नोंदवणार आहे.”


हेही वाचा -


तुमच्या वॉडरोबमध्ये असायलाच हव्यात या गोष्टी!


खास तुमच्यासाठी टीव्ही सेलिब्रिटी अनिता हसनंदानीचे '61' सुंदर आणि स्टाईलिश ब्लाऊज डिझाईन्स(Stylish Blouse Designs)


ग्लॅमरस आणि स्टायलिश कॉमेडी क्वीन श्रेया बुगडेचा ‘फॅशन फंडा’