आकाश आणि श्लोकाचं स्वप्नवत लग्न, समोर आला पहिला लुक

आकाश आणि श्लोकाचं स्वप्नवत लग्न, समोर आला पहिला लुक

अंबानी आणि मेहता कुटुंबीयांची सोयरीक झाली आणि आकाश आणि श्लोकाच्या लग्नाचा दिवस आला. बिग फॅट वेडिंग असलेलं अंबानी कुटुंबीयांकडील हे दुसरं लग्न. तीन महिन्यापूर्वीच ईशा आणि आनंदच्या लग्नाचा थाट काही वेगळाच होता. आता आकाश आणि श्लोकाच्या लग्नाची तयारीही गेल्या दोन आठवड्यांपासून धुमधडाक्यात सुरु होती. गेल्या दोन दिवसापासून अन्नसेवाही सुरु होती. आकाश आणि श्लोकाच्या लग्नाकडे सर्वांचेच डोळे लागून राहिले होते. आता आकाश आणि श्लोका दोघे नक्की कसे दिसतील? कोणत्या फॅशन डिझाईनरचे कपडे असतील इथपासून ते श्लोकाचा मेकअप कसा असेल आणि ती कशी दिसेल इथपर्यंत सध्या चर्चा आहेत. लग्नानंतर आता पहिला लुक समोर आला आहे.


कसा आहे आकाश आणि श्लोकाचा पहिला लुक


आकाश आणि पूर्ण कुटुंबीयांनी गुलाबी रंगांच्या छटांचे कपडे परिधान केले असून आकाश गुलाबी रंगाच्या शेरवानीमध्ये खूपच छान दिसत आहे. तर श्लोकाने नववधूचा लाल जोडा परिधान केला आहे. श्लोका रंगमंडपात येताना आणि आकाश तिच्याकडे खूपच प्रेमाने पाहतानाचा एक फोटो व्हायरल झाला आहे. प्रेमाच्या रंगात रंगलेलं हे जोडपं खूपच सुंदर दिसत असून दोघांच्याही चेहऱ्यावरील आनंद लपत नाहीये.


shloka  


लग्नाआधी घेतले आजोबांचे आशीर्वाद


लग्न सुरु होण्याच्या आधी गुलाबी शेरवानीमध्ये असलेल्या आकाश सुंदर दिसत होता. संपूर्ण अंबानी कुटुंबीयांनी गुलाबी रंगाच्या वेगवेगळ्या छटांमधील कपडे परिधान केले असून ईशा आणि आनंद, अनंत आणि राधिक मर्चंट हेदेखील अतिशय खुलून दिसत होते. आकाशने लग्नाच्या मंडपात येताच आधी आपल्या आजोबांना प्रणाम करत त्यांचे आशीर्वाद घेतले आणि मग लग्नाच्या विधीसाठी पुढे गेला.


akash barat


अनेक मंडळी उपस्थित


भारतातील सर्व मोठी मंडळी या लग्नाला उपस्थित होती. अगदी शाहरूख खान आपल्या पत्नीसह, सचिन आणि अंजली तेंडुलकर, युवराज सिंग, अभिषेक आणि ऐश्वर्या बच्चन, झहीर-सागरिका, कियारा अडवाणी, रजनीकांत त्याची मुलगी सौंदर्या आणि जावई विशगन हे सगळे उपस्थित होते. इतकंच नव्हे तर परदेशी पाहुण्यांचीसुद्धा रेलचेल पाहायला मिळाली आहे. न्यूझीलंडचे क्रिकेटर, ब्रिटनचे माजी पंतप्रधान, बडे उद्योगपती, सुंदर पिचई, रतन टाटा, लक्ष्मी आणि उषा मित्तल यासारखे नावाजलेले लोकही या लग्नामध्ये आकाश आणि श्लोकाला आशीर्वाद द्यायले आले होते.


abhiash


ranjnikanth


ratan tata


zaheersagrika


आकाश आणि श्लोकाच्या साखरपुड्यातही होती धूम


आकाश आणि श्लोकाचा साखरपुडाही अतिशय थाटामाटात झाला होता. या साखरपुड्याला उद्योगपती आणि बॉलीवूड सितारे सर्वांचीच उपस्थित होती. इतकंच नाही तर अगदी क्रिकेट क्षेत्रातील दिग्गजही उपस्थित होते. आता स्वित्झर्लंडमधील सेंट मोर्टिझमध्ये झालेल्या प्रि - वेडिंग बॅशमध्येही अनेक बॉलीवूडमधील स्टार्स आणि क्रिकेटर्सने उपस्थिती लावली होती. शिवाय हा प्रि - वेडिंग सोहळा आपल्या उपस्थितीने खूप मोठा बनवला होता. अंबानीच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये अनेक स्टार्स आणि दिग्गज उपस्थित असतात आणि यावेळीदेखील तेच दिसून आलं. इंटरनेटवर तर अगदी सगळीकडे अंबानीच्या सोहळ्याचे व्हिडिओज व्हायरल झालेले दिसले आहेत.


फोटो सौजन्य - Photograher Pallav


हेदेखील वाचा - 


आकाश आणि श्लोकाच्या लग्नामध्ये फुलांच्या सजावटीचं संपूर्ण डेकोरेशन


आकाश अंबानीच्या लग्नात सेलिब्रिटी पाहुण्यांचा थाट, पाहा फोटो


आकाश अंबानी आणि श्लोका मेहताच्या लग्नाआधीच्या विधींना सुरूवात