रोहित शेट्टीच्या 'सूर्यवंशी'मध्ये 9 वर्षानंतर अक्षय आणि कॅट ही जोडी दिसण्याची शक्यता

रोहित शेट्टीच्या 'सूर्यवंशी'मध्ये 9 वर्षानंतर अक्षय आणि कॅट ही जोडी दिसण्याची शक्यता

अक्षय कुमार आणि कतरिना कैफबाबात एक मोठी बातमी समोर येत आहे. सूत्रानुसार, तब्बल 9 वर्षानंतर ही जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर रोमान्स करताना दिसणार आहे. हे दोघंही लवकरच रोहित शेट्टीच्या बिग बजेट चित्रपटात 'सूर्यवंशी'मध्ये रोमान्स करताना दिसणार आहेत.


18095826 201363133712011 609467855146057728 n
अक्षय आणि कॅटची जोडी जेव्हा जेव्हा मोठ्या पडद्यावर एकत्र आली आहे तेव्हा तो चित्रपट सुपरहीट झाला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ही जोडी एकत्र आल्यावर बॉक्स ऑफिसवर नक्कीच कमाल होईल. कतरिना आणि अक्षयच्या जोडीने आत्तापर्यंत वेलकम, तीस मार खान, सिंग इज किंग, दे दना दन, नमस्ते लंडन आणि हमको दिवाना कर गए यासारखे ब्लॉकबस्टर सिनेमा दिले आहेत. आता या लिस्टमध्ये 'सूर्यवंशी'च नावही सामील होण्याची शक्यता आहे.  

सूत्रानुसार, सूर्यवंशीमध्ये अक्षय कुमार एका पोलिस ऑफिसरच्या भूमिकेत दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचं पोस्टर रिलीज करून मेकर्सनी या चित्रपटाची घोषणा केली होती. पण अजून कतरिना या चित्रपटात अक्षयच्या अपोझिट दिसणार का याबाबत कोणतीही ऑफिशियल घोषणा झाली नाही. अशीही बातमी आहे की, अक्कीची इच्छा आहे की, या चित्रपटात त्याच्याबरोबर कतरिना असावी.

दिग्दर्शक रोहित शेट्टी या चित्रपटाबाबत फारच उत्साही आहे. रोहितच्या सिम्बा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हीट ठरला होता.
 

 

 


View this post on Instagram


 

 

Roaring Globally.


A post shared by Rohit Shetty (@itsrohitshetty) on
या चित्रपटात रणवीर सिंग लीड रोलमध्ये होता. सूत्रानुसार, सूर्यवंशीमध्येही रणवीर सिंग आणि सिंघम फेम अजय देवगण दिसणार आहे. या चित्रपटात या दोघांचीही पाहूणे कलाकाराची भूमिका असू शकते. अजून या चित्रपटाचं शूटींग सुरू झालं नाहीये. सध्या या चित्रपटाच्या स्क्रिप्टवर काम सुरू असल्याचं कळतंय.  


20987370 112241079455791 7816691490599469056 n
आता पाहूया कॅट आणि अक्की पुन्हा एकत्र आल्यावर बॉक्स ऑफिसवर जादू घडते का?


फोटो सौजन्य - Instagram


हेही वाचा -


शाहरूख, सलमान आणि कतरिना करणार उर्दू भाषा प्रमोट


भारत चित्रपटामध्ये कतरिना कैफचा 'सिंपल' लुक


विकी कौशल करणार कतरिनाच्या बहिणीसोबत रोमान्स