केसरीमधील अक्षय आणि परिणितीचा 'हटके' लुक

केसरीमधील अक्षय आणि परिणितीचा 'हटके' लुक

अक्षय कुमार नेहमीच त्याच्या सिनेमांमध्ये चाकोरी बाहेरील विषय हाताळतो. अक्षय कुमारचे चित्रपट केवळ हटकेच असतात असं नव्हे तर ते तितकेच दर्जेदारदेखील असतात. 'गोल्ड',‘पॅडमॅन’ आणि ‘टॉयलेट एक  प्रेम कथा’ या हटके सिनेमांनंतर नवीन वर्षासाठी अक्षय कुमार चाहत्यांसाठी ‘केसरी’ या सिनेमाची भेट घेऊन येत आहे. या चित्रपटातील अक्षय कुमार आणि परिणिता चोप्राचा फर्स्ट लुक नुकताच रिलीज झाला आहे.


45882540 430071510860773 9187820084714552013 n


हा पहा अक्षय आणि परिणिती यांचा केसरीमधील लुक


केसरीमध्ये अक्षय एका शीख सैनिकाच्या भूमिकेत दिसणार आहे.डोक्यावर शीख पगडी आणि भलीमोठी दाढी असलेला हा अक्षयचा हा लुक त्याने त्याच्या इन्स्टावर शेअर केला आहे.“ केसरी सिनेमामध्ये काम करणं हे माझ्यासाठी अभिमानास्पद असून 21 मार्च 2019 ला या सर्वात धाडसी लढ्यासाठी सज्ज व्हा” असं देखील अक्षयनं या फोटोसोबत शेअर केलं आहे. या सिनेमामध्ये त्याच्यासोबत परिणिती चोप्रा महत्त्वाच्या भूमिकेत असणार आहे. परिणितीने देखील तिच्या इन्स्टावर त्या दोघांचा सिनेमामधील लुक शेअर केला आहे. ती देखील सीख वेशभूषेमध्ये दिसत आहे. परिणितीने निळ्या रंगाचा दुपट्टा आणि शीख पंजाबी सूट परिधान केला आहे.


46960814 780253528995399 6627811415846713885 n


केसरी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला


केसरी हा सिनेमा 2019 साली प्रदर्शित होणार आहे. हा  सिनेमा 1896 साली झालेल्या ‘ब्रिटीश इंडीयन आर्मी’ आणि ‘अफगाण पश्तो मिलिट्री’ यांच्यात झालेल्या सारागढी युद्धावर आधारीत आहे. करण जोहर आणि अक्षय कुमार यांची निर्मिती असलेला केसरी पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे. पण नवीन वर्ष लवकरच सुरू होत असल्याने ही साहसी लढत पाहण्यासाठी आपल्याला फार वाट पहावी लागणार नाही. या चित्रपटाचं दिग्दर्शन अनुराग सिंग यांनी केलं आहे. चित्रपटाच्या नावाप्रमाणेच अक्षय आणि परिणिताचा या हटके लुकमुळे प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबद्दल उत्सुकता नक्कीच वाढली आहे.


41338792 510436926095864 8784242208441847845 n


फोटोसौजन्य-इंन्स्टाग्राम