चाहत्यांसाठी खुशखबर! या दिवशी प्रदर्शित होणार अक्षय कुमारचा 'सूर्यवंशी'

चाहत्यांसाठी खुशखबर! या  दिवशी प्रदर्शित होणार अक्षय कुमारचा 'सूर्यवंशी'

रोहीत शेट्टीने 'सिम्बा' चित्रपटात 'सूर्यवंशी' चित्रपटाची घोषणा केली आणि त्याच्या पुढच्या चित्रपटाची ओढ प्रेक्षकांच्या मनात निर्माण केली. मागच्या वर्षीच अक्षय कुमार आणि कैतरिनाचा सुर्यवंशी प्रदर्शित केला जाणार होता. मात्र कोरोनामुळे हा चित्रपट चांगलाच रखडला. लॉकडाऊनंतरही सिनेमागृह पूर्णपणे सुरू झालेली नसल्यामुळे या वर्षाच्या सुरूवातीलाही सूर्यवंशी प्रदर्शित होईल की नाही अशी शंका होती. आता सर्व काही पुन्हा सुरळीत होत आहे. त्यामुळे  केंद्र सरकारने नुकतंच सिनेमागृहे शंभर टक्के सुरू करण्यासाठी परवानगी दिलेली आहे. ज्यामुळे चित्रपटसृष्टीत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. मागच्या वर्षभर संपूर्ण चित्रपटसृष्टीला कोरोना महामारीचा जबरदस्त फटका बसला होता. ज्यामुळे चित्रपट प्रदर्शित करण्याबाबत योग्य निर्णय घेणं निर्मात्यांसाठी आवश्यक होतं. शंभर टक्के सिनेमागृह सुरू होणार या घोषणेनंतर आता निर्मात्यांनी सूर्यवंशी लवकरच प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. कारण त्यांना खात्री आहे की यंदाचा बहुचर्चित सूर्यवंशी चित्रपट बॉक्सऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालणार

कधी होणार सूर्यवंशी प्रदर्शित

सिनेमागृह शंभर टक्के सुरू झाल्यानंतर जे चित्रपट प्रदर्शित होणार त्यामध्ये सर्वात पहिलं नाव आहे रोहीत शेट्टीच्या सूर्यवंशीचं. अक्षय कुमार आणि कैतरिनाची मुख्य भूमिका असलेला हा कॉप ड्रामा या वर्षी 2 एप्रिल 2021 ला प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा चित्रपट या वर्षी गुडफ्रायडेला प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे. मात्र याबाबत अजूनही कोणतीच अधिकृत घोषणा निर्मात्यांकडून करण्यात आलेली नाही. कारण याबाबत रोहीत शेट्टी सध्या थिएटर मालकांसोबत चर्चा करत आहे. ज्यामध्ये या चित्रपटाचे सह निर्माते रिलायंस इंटरटेंटमेंटही सहभागी आहेत. काही गोष्टींबाबत सविस्तर चर्चा करून मगच हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार याची घोषणा केली जाणार आहे. कदाचित या सर्व चर्चेनंतर पुढच्या आठवड्यात याबाबत अधिकृत घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. 2 एप्रिल ऐवजी जर हा चित्रपट 9 एप्रिलला प्रदर्शित झाला तर हैराण होण्याचं कारण नाही. कारण 9 हा आकडा अक्षय कुमारसाठी फारच लकी आहे. त्यामुळे कदाचित या तारखेचाही विचार चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी केला जाऊ शकतो. 

या तारखेचं हे आहे गुपित

सूर्यवंशी नेमका कधी प्रदर्शित होणार याबाबत अजूनही अनेक तर्क वितर्क केले जात आहेत. कारण मागच्या वर्षी होळीला हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार होता. मात्र लॉकडाऊनमुळे तेव्हा चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारिख रद्द करण्यात आली होती. ज्यामुळे चाहत्यांना या वर्षी होळीला हा  चित्रपट प्रदर्शित व्हावा असं वाटत आहे. चाहत्यांनी तर #SooryabanshiOnHoli या हॅशटॅगने या चित्रपटाचं ट्विट करून निर्मांत्यांना चित्रपट होळीला प्रदर्शित करण्याची मागणी केली आहे. मात्र चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी आता निर्मांत्यांना फक्त भावनिक विचार करून चालणार नाही. कारण या चित्रपटाकडून निर्मात्यांना, कलाकारांना आणि चाहत्यांना अनेक अपेक्षा आहेत. सूर्यवंशी मध्ये सिम्बाप्रमाणेच अजय देवगण आणि रणवीर सिंहचा कॅमियो असणार आहे. ज्यामुळे यंदाचा हा एक सुपरहिट कॉप ड्रामा असेल यात शंकाच नाही.