अक्षय कुमार 25 वर्ष लहान अभिनेत्रीसोबत करणार रोमान्स

अक्षय कुमार 25 वर्ष लहान अभिनेत्रीसोबत करणार रोमान्स

खिलाडी अक्षय कुमारचा आगामी सिनेमा ‘लक्ष्मी बॉम्ब’ची (Laxmmi Bomb) ची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. कारण या सिनेमामध्ये अक्षय कुमार वेगळ्याच अवतारात पाहायला मिळणार आहे. अक्कीने 3 ऑक्टोबर 2019 रोजी ‘लक्ष्मी बॉम्ब’ सिनेमातील त्याचा पहिला लुक सोशल मीडियावर शेअर केला होता. या सिनेमामध्ये 52 वर्षांचा खिलाडी कुमार 25 वर्ष लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स करताना दिसणार आहे. या दोघांचा रोमाँटिक पोझमधला फोटो देखील समोर आला आहे. ही अभिनेत्री दुसरीतिसरी कोणी नसून कियारा अडवाणी आहे. ‘गुड न्यूज’नंतर अक्षय कुमार आणि कियारा अडवाणी ‘लक्ष्मी बॉम्ब’सिनेमात जोडी म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. 2020मध्ये ईदच्या मुहूर्तावर हा सिनेमा बॉक्सऑफिसवर झळकणार आहे.

(वाचा : भाईजान सलमानचा व्हिलनसोबत दोस्ताना, कोट्यवधींची कार केली गिफ्ट)

‘लक्ष्मी बॉम्ब’मधील अक्षयचा नवा अवतार

'मंगलयान', 'केसरी', 'पॅडमॅन', सिनेमा '2.0', ' हाउसफुल 4'...आतापर्यंत अशा कित्येक सिनेमांमध्ये अक्षय कुमारनं वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. आगामी 'लक्ष्मी बॉम्ब' सिनेमाच्या निमित्तानं अक्षय आणखी एका आव्हानात्मक भूमिकेत आपल्याला पाहायला मिळणार आहे. 2019 मधील नवरात्रौत्सवादरम्यान त्यानं सिनेमातील पहिला लुक शेअर केला होता. यामध्ये अक्षयनं साडी नेसली असून कपाळावर मोठं कुंकू देखील लावलं आहे. शेअर केलेल्या फोटोमध्ये दुर्गा मातेची मूर्ती देखील दिसत आहे. नुकतंच सिनेमाचे निर्माते तुषार कपूर यांनी 'लक्ष्मी बॉम्ब' मधील अक्षय कुमारचा नवा लुक देखील शेअर केला होता. यामध्ये अक्षय-कियारा रोमँटिक अवतार पाहायला मिळत आहेत. पण काही कारणांमुळे तुषार कपूरनं सोशल मीडियावरून फोटो डीलीट केला. पण तोपर्यंत अक्षय-कियाराचा फोटो व्हायरल झाला. सिनेमातील एका रोमँटिक गाण्यातील हा फोटो असून याचं चित्रिकरण दुबईमध्ये करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.  

(वाचा : बॉलिवूडची ‘शांती’ पत्रकारावर भडकली, प्रेग्नेंसीच्या प्रश्नावर दीपिकानं दिलं ‘हे’ उत्तर)

2020मध्ये 4 दमदार सिनेमांमध्ये दिसणार अक्की

2019 मध्ये कियारा अडवाणी ‘गुड न्यूज’ सिनेमामध्ये दिसली होती. या सिनेमामध्ये अक्षय कुमार, करीना कपूर आणि दिलजीत दोसांझ यांच्याही मुख्य भूमिका होत्या. ‘गुड न्यूज’ हा अक्षयचा 2019 मधील शानदार सिनेमा होता. तर 2020 मध्ये 'लक्ष्मी बॉम्ब', 'सूर्यवंशी', 'बच्चन पांडे' आणि 'पृथ्वीराज' अक्षयचे हे चार सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. 

(वाचा : 'अनन्या' आता झळकणार रुपेरी पडद्यावर, रवी जाधव करणार निर्मिती)

हे देखील वाचा :

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.