Bad News:अक्षय कुमारच्या ‘लक्ष्मी बाॅम्ब'मुळे 'सूर्यवंशी' अडचणीत

Bad News:अक्षय कुमारच्या ‘लक्ष्मी बाॅम्ब'मुळे 'सूर्यवंशी' अडचणीत

अक्षय कुमारच्या ‘केसरी’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सो- सो कमाई केल्यानंतर आता पुन्हा एकदा तो हिट चित्रपट देण्याच्या तयारीला लागला आहे. ‘सिंबा’चा सिक्वल असलेला ‘सूर्यवंशी’ हा चित्रपट 2020 जूनला प्रदर्शित होत आहे. पण आता या चित्रपटाची तारीख पुढे गेल्याचे समजतआहे. याला कारण आहे तो ‘लक्ष्मी बाॅम्ब’ हा चित्रपट… काहीच तासांपूर्वी अक्षय कुमारने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन ‘लक्ष्मी बाॅम्ब’ चे पोस्टर शेअर केले आहे. त्या पोस्टरखाली 5 जून 2020 ही रिलीजची तारीख लिहिली आहे. त्यामुळे जूनमध्ये बॅक टू बॅक दोन्ही चित्रपट प्रदर्शित करणे शक्य नसल्यामुळेच हा निर्णय घेतला जाणार आहे,  असे समजत आहे. त्यामुळे 'सूर्यवंशी' च्या फॅनची निराशा होणार आहे हे नक्की!


कान्सच्या रेड कार्पेटवर प्रियांका, दीपिका आणि कंगनाचा जलवाAlso Read : सनी लिओनीचे चरित्र


कसा वाटतोय फर्स्ट लुक

पोस्टरमध्ये फक्त अक्षय कुमार दिसत आहे. अक्षय कुमार डोळ्यात काजळ भरत असून…कंचना चित्रपटातील सीनमध्ये जसे हिरोच्या अंगात स्त्रीचे भूत आल्यानंतर तो तयारी करत होता. अगदी तसेच हे पोस्टर आहे आणि अर्थात चित्रपटाच्या टायटलमध्ये बॉम्बचा उल्लेख केल्यामुळे बॉम्ब फुटल्याचे या पोस्टरमध्ये दाखवण्यात आले आहे.


पुन्हा एकदा येतेय संजीवनी मालिका, पण आता इश्कबाजची टीम साकारणार डॉक्टर्सची भूमिका


 पोस्टरनंतर सुरु झाला नवा वाद


अक्षय कुमारच्या 'सूर्यवंशी' या चित्रपटाची अनेक जण प्रतिक्षा करत आहेत. तो चित्रपट फ्लोअरवर येण्याआधीच ‘लक्ष्मी बाॅम्ब’ या चित्रपटाची घोषणा त्याने त्याच्या अकाऊंटवरुन केली खरी… पण हा चित्रपट दिग्दर्शित करणाऱ्या दिग्दर्शकाने मात्र हा चित्रपट करणार नाही असे सांगून टाकले आहे. राघव लाॅरेन्स हा साऊथचा अभिनेता आणि दिग्दर्शक असून त्याने साऊथमधील कंचना या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. याच कंचनावर आधारीत हा 'लक्ष्मी बाॅम्ब' हा चित्रपट आहे. पण त्याने आता हा चित्रपट करणार नाही असे सांगत या मागील कारण सांगणारी एक भली मोठी पोस्ट केली आहे. त्यामुळेच पोस्टरनंतर आता नवा वाद सुरु झाला असे म्हणायला हवे.


डार्लिंग हबीने दिल्या दीपिकाला अशा कमेंट की तुम्हाला त्या ठरतील #couplegoal


काय खटकले राघवला?जर तुम्ही साऊथमधील ‘कंचना’ हा चित्रपट पाहिला असेल तर या चित्रपटाचे तीन भाग आतापर्यंत आले आहेत. हॉरर कॉमेडीपटात मोडणारा हा चित्रपट होता. या चित्रपटात राघव लॉरेन्सने महत्वाची भूमिका साकारली आहे. नुकताच कंचना 3 हा चित्रपट येऊन गेला. या चित्रपटाच्या प्रसिद्धीनंतरच हा चित्रपट हिंदीत करण्याचा निर्णय घेण्यात आला. अक्षय कुमार, किआरा अडवाणी  यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट.. या चित्रपटाचे शुटींगही सुरु झाले असे कळत आहे. पण राघवला न सांगता या चित्रपटाचे पोस्टर शेअर केल्यामुळे त्याच्या भावना दुखावल्या गेल्या आणि त्याने ट्विट करत लगेचच आपण हा चित्रपट करत नसल्याचे सांगितले. पैशांपेक्षाही आत्मसन्मान हा महत्वाचा आहे. अशा आशयाचे ट्विट त्याने लिहले आहे.


आता प्रश्न हा आहे की, हा चित्रपट राघव करणार का? राघवने चित्रपट केला नाही तर या चित्रपटाचे दिग्दर्शन कोण करणार? चित्रपटाच्या या सगळ्या गोंधळामुळे रोहित शेट्टी ‘सूर्यवंशी’ चित्रपटाच्या रिलीजची तारीख पुढे ढकलणार का ? हे सगळे प्रश्न उद्भवले आहेत.


(सौजन्य- Twitter,Instagram)