‘हेरा फेरी 3’ मध्ये पुन्हा अक्षय कुमार,परेश रावल आणि सुनिल शेट्टीची जबरदस्त कॉमेडी

‘हेरा फेरी 3’ मध्ये पुन्हा अक्षय कुमार,परेश रावल आणि सुनिल शेट्टीची जबरदस्त कॉमेडी

अक्षय कुमार, परेश रावल आणि सुनिल शेट्टी यांचे ‘हेरा फेरी’ आणि ‘फिर हेरा’ फेरी दोन्ही चित्रपट एके काळी हीट ठरले होते. या त्रिकुटाने मिळून प्रेक्षकांना अक्षरशः पोट धरून हसायला भाग पाडले होतं. ‘हेरा फेरी’च्या प्रचंड यशानंतर या चित्रपटाचा ‘फिर हेरा फेरी’ हा सिक्वल प्रदर्शित करण्यात आला होता. या दोन्ही चित्रपटांना चांगलंच यशही मिळालं. काही दिवसांपासून आता हेरा फेरीचा तिसरा भाग प्रदर्शित होणार अशी चर्चा होती. मात्र काही कारणांमुळे या चित्रपटाविषयी अधिकृत घोषणा करण्यात आली नव्हती. मात्र आता हेरा फेरी 3 या चित्रपटाचं शूटिंग या वर्षांच्या अखेरीस सुरू केलं जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. यासाठी चित्रपटाची स्टार कास्टदेखील ठरविण्यात झाली आहे. हेरा फेरी आणि फिर हेरा फेरीला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला होता. आजही अनेकांच्या तोंडी या चित्रपटाचे डायलॉग असतात. त्यामुळे आता हेरा फेरी 3 पाहण्यास चाहते नक्कीच उत्सुक असणार आहेत.
'हेरा फेरी 3' च्या शूटिंगला वर्षअखेरीस होणार सुरूवात


फिरोज नाडियावाला या चित्रपटाची निर्मिती करत असून या चित्रपटाचं दिग्दर्शन इंद्र कुमार करत आहेत. हेरा फेरी 3 च्या स्किप्टपासून कलाकारांपर्यंत सर्व काही ठरविण्यात आलं असून चित्रपटाचं शूटिंग या वर्षाच्या अखेरीस सुरू होणार आहे. इंद्र कुमार सध्या त्यांच्या टोटल धमाल या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहेत. टोटल धमाल हा धमाल सिरिजचा तिसरा भाग आहे. यात माधुरी दीक्षित, अनील कपूर, अजय देवगन, अर्शद वारसी, जावेद जाफरी, रितेश देशमुख हे दिग्गज कलाकार आहेत. या कॉमेडी चित्रपटाला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. लवकरच हा चित्रपट 100 कोटींची कमाई करणार अशी चर्चा आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या यशानंतर इंद्र कुमार लगेचच हेरा फेरी 3 साठी सज्ज झाले आहेत. टोटल धमाल मध्ये इंद्र कुमार यांनी व्हि एफ एक्स तंत्राचा वापर केला होता. त्यामुळे आता हेरा फेरी 3 मध्येही हेच तंत्र वापरणार आहेत. त्यामुळे सहाजिकच हेरा फेरी 3 एक भव्य दिव्य चित्रपट असण्याची शक्यता आहे.


hera pheri 1


बिझी शेड्युलमधूनही अक्षय कुमार हेरा फेरी 3 मध्ये काम करण्यासाठी तयार


हेरा फेरी 3 मध्ये पुन्हा अक्षय कुमार, परेश रावल आणि सुनिल शेट्टी एकत्र काम करणार आहेत. काही दिवसांपूर्वी अक्षय कुमार या चित्रपटात नसेल अशी चर्चा होती. मात्र आता अक्षय या चित्रपटात काम करण्यासाठी तयार झाला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा या तिघांच्या कॉमेडीची जादू प्रेक्षकांवर चालणार आहे. सध्या अक्षय कुमार केसरी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. त्यानंतर तो करीन कपूरसोबत धर्मा प्रॉडक्शनच्या गुड न्यूज या चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात करेल. यानंतर अक्षय रोहीत शेट्टीच्या सुर्यवंशीच्या शूटिंगमध्ये व्यस्त असेल. त्यामुळे या सर्व चित्रपटांच्या शूटिंगनंतर तो हेरा फेरी 3 च्या शूटिंगसाठी फ्री होणार आहे. त्यामुळे वर्षाअखेरीस हेरा फेरी 3 चं शूटिंग सुरू होण्याची शक्यता आहे.


hera pheri 2


प्रनूतनच्या ‘नोटबुक’ चित्रपटातील पहिलं रोमॅंटिक गाणं प्रदर्शित


चित्रपटांशिवाय अनुष्का शर्माने आता सुरू केलंय 'हे' काम


श्रीदेवीच्या मुलीच्या वडिलांच्या भूमिकेत दिसणार 'मिर्झापूर' फेम पंकज त्रिपाठी


फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम