अक्षय कुमारने शेअर केला आईसोबत ‘हा’ भावनिक व्हिडिओ

अक्षय कुमारने शेअर केला आईसोबत ‘हा’ भावनिक व्हिडिओ

अभिनेता अक्षय कुमार सध्या लंडनमध्ये सुट्टीवर आहे. नुकताच त्याने  लंडनमधील त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामध्ये तो त्याच्या आईसोबत वेळ घालवताना दिसत आहे. अक्षयची आई व्हिल चेअरवर बसलेली आहे आणि अक्षय तिला लंडन दाखवत  आहे असा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये अक्षयने अगदी साधा पेहरावात दिसत आहे. मात्र तो त्याच्या आईची विशेष काळजी घेताना यामध्ये दिसत आहे.अक्षय या व्हिडिओमध्ये आईसोबत स्पेशल वेळ घालवताना दिसत आहे. या व्हिडिओसोबत त्याने एक भावनिक मेसेजदेखील शेअर केला आहे. अक्षयने यात लिहीलं आहे की, " शूटिंगमधून थोडासा वेळ काढत लंडनमध्ये मी आईसोबत आलो आहे. तुम्ही किती बिझी आहात हे महत्त्वाचं नाही. कारण पालकांना तुमची आता सर्वात जास्त गरज असते. आईवडीलांचं वय झालं आहे हे विसरू नका. यासाठीच त्यांना आता वेळ द्या." अक्षयच्या या पोस्टवर ट्विंकल खन्नाने एक लव स्माईलीने प्रतिक्रीया दिली आहे. शिवाय त्याच्या चाहत्यांना हा व्हिडिओ फार आवडला आहे. एका युझरने त्यावर "मला तुमचा अभिमान वाटतो" तर एकाने "लव यू सर" असं म्हटलं आहे. या व्हिडिओमधून त्याचं त्याच्या आईवरील प्रेम दिसून येतं. मुलांनी त्यांच्या बिझी शेड्यूमध्ये आईवडीलांची काळजी घेणं किती महत्त्वाचं आहे हे त्याने यात व्यक्त केलं आहे. आईवडीलांना त्यांच्या उतारवयात फक्त तुमचा थोडासा वेळ हवा असतो. तुमच्या अशा वेळ देण्यामुळे आईवडीलांना त्यांचा वृद्धापकाळ सुखावह वाटू लागतो. म्हणूनच  प्रत्येकाने आपल्या आयुष्यातील थोडासा वेळ खास पालकांसाठी ठेवणं गरजेचं आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

अक्षय कुटुंबाची घेतो अशी काळजी

अक्षय अभिनेता असूनही फारच कुटुंबवत्सल आहे. कारण तो  सतत त्याच्या आईवडील,बायको, मुलांची काळजी घेताना दिसत असतो. अक्षय कुमार बऱ्याचदा त्याच्या कुटुंबासोबत वेळ घालवतो. मुलांसोबतदेखील त्याचे चांगले बॉंडिंग दिसून येते. अक्षय कुमार त्याच्या वैयक्तिक जीवनात शिस्त आणि फिटनेससाठी प्रसिद्ध आहे. अगदी सकाळी लवकर उठण्यापासून वेळेवर व्यायाम करण्यापर्यंत अनेक गोष्टी तो अगदी काटेकोरपणे फॉलो करतो. अक्षय कुमारचा हाच गुण त्याची मुलं आरव आणि नितारामध्ये दिसू लागली आहेत. अक्षयने त्याच्या मुलाला जिमनॅस्टिकचं ट्रेनिंग दिलं आहे. आता निताराही जिमनॅस्टिक ट्रेनिंगसाठी सज्ज झाली आहे. निताराचं जिमनॅस्टिक ट्रेनिंग स्वतः अक्षय स्वतः करून घेतो.  शिवाय अक्षय एक चांगला कूक देखील आहे. आता त्याला स्पर्धा देण्यासाठी अक्षयचा मुलगा आरवदेखील स्वयंपाक शिकत आहे. अक्षयसाठी आरवने खास डिनर बनवल्याचं ट्विकलने एका पोस्टमध्ये शेअर केलं होतं. यावरून अक्षय फक्त स्वतःच एक चांगला मुलगा नसून तो त्यांच्या मुलांनादेखील एक आदर्श शिकवण देत आहे. अक्षय अभिनयासोबतच सामाजिक कार्यामध्येदेखील नेहमीच सक्रीय असतो. यावरून तो सेलिब्रेटी असला तरी एक चांगला माणूस असल्याचं दिसून येतं. 

अधिक वाचा

हॉट बिकिनी बॉडीसाठी वाणी कपूरने घेतली मेहनत

या’ व्यक्तीमुळे स्टेशनवर गाणारी राणू मंडल बनली बॉलीवूड गायिका

देसी गर्ल प्रियांका ‘युनिसेफ’ची ambassador नको, पाकिस्तानची मागणी

फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम