रोहीत शेट्टी आणि अक्षयच्या ‘सूर्यवंशी’च्या चित्रीकरणाच्या आधीच टीझर झाला शूट

रोहीत शेट्टी आणि अक्षयच्या ‘सूर्यवंशी’च्या चित्रीकरणाच्या आधीच टीझर झाला शूट

रणवीर सिंहबरोबर ब्लॉकब्लस्टर कॉप ड्रामा ‘सिम्बा’ केल्यानंतर आता रोहित शेट्टी अभिनेता अक्षयकुमारबरोबर आपला पुढचा कॉप ड्रामा ‘सूर्यवंशी’च्या चित्रीकरणाला सुरुवात करत आहे. अक्षयकुमारच्या ‘सूर्यवंशी’ मध्ये ‘सिंघम’ अजय देवगण आणि ‘सिम्बा’ रणवीर सिंहचादेखील जबरदस्त कॅमिओ असणार आहे. आता लेटेस्ट अपडेट अशी आहे की, अक्षयकुमार आणि रोहित शेट्टीने आपला कॉप ड्रामा ‘सूर्यवंशी’चा टीझर आधीच चित्रीत करून घेतला आहे. आतापर्यंत कोणत्याही चित्रपटाच्या बाबतीत असं घडलं नाही. पण रोहित शेट्टीचा अंदाज नेहमीच निराळा असतो हे प्रत्येकालाच माहीत आहे. शिवाय अक्षयकुमारसारखा अभिनेता पहिल्यांदाच जेव्हा रोहितबरोबर काम करत आहे. तेव्हा काहीतरी वेगळेपणा असायलाच हवा. प्रेक्षकांमध्ये अगदी पहिल्या दिवसापासून ‘सूर्यवंशी’ची क्रेझ निर्माण झाली आहे. रोहित शेट्टी म्हटलं की फुल टू धमाल आणि मसालेदार चित्रपट हे आता समीकरणच झालं आहे.
 

 

 


View this post on Instagram


 

 

Here’s Bajirao, Simmba and Sooryavanshi along with our creator, @itsrohitshetty signing off from the #Umang show tonight 🙌🏻


A post shared by Akshay Kumar (@akshaykumar) on
‘सूर्यवंशी’चं टीझर आधीच शूट करण्यात आलं


मुंबईमधील यशराज स्टुडिओमध्ये ‘सूर्यवंशी’ या अक्षयकुमारच्या चित्रपटाचं टीझर शूट करण्यासाठी खास रोहित शेट्टी गोव्यावरून आला. रोहित सध्या गोव्यामध्ये राहून या चित्रपटाची स्क्रिप्ट पूर्ण करत आहे. पण खास टीझरच्या शूटसाठी रोहित मुंंबईत आला. एका दिवसात रोहित आणि अक्षयने या चित्रपटाच्या टीझरचं शूट पूर्ण केलं. इतकंच नाही तर शूटिंग करून पुन्हा रोहित स्क्रिप्ट पूर्ण करण्यासाठी गोव्यालाही निघून गेला. अक्षयकुमार म्हटलं की, सर्व काम वेळेत पूर्ण होत असतं आणि रोहित शेट्टी क्रू ची देखील ही खासियत आहे. त्यामुळे पहिल्यांदाच चित्रपटाच्या आधीच टीझर तयार झालं आहे. चित्रपट सुरु होण्याआधीच टीझर तयार असल्याची ही पहिलीच वेळ आहे. लवकरच ‘सूर्यवंशी’ चित्रपटाचं चित्रीकरणदेखील पूर्ण करण्यात येईल. हा चित्रपट याचवर्षाच्या शेवटी प्रदर्शित होणार आहे. वास्तविक या चित्रपटामध्ये ‘सूर्यवंशी’, ‘सिंघम’ आणि ‘सिम्बा’ ला एकत्र बघणं म्हणजे प्रेक्षकांसाठी पर्वणीच आहे. हे तीनही कलाकार आता प्रेक्षकांचे सर्वात आवडते कलाकार झाले आहेत असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.


अक्षय कुमारचे पाच चित्रपट यावर्षी होणार प्रदर्शित


‘सूर्यवंशी’ शिवाय अक्षय कुमारचा यावर्षी धर्मा प्रॉडक्शनचा ‘केसरी’ हा चित्रपट येत आहे. यामध्ये एका सीख योद्धाच्या भूमिकेत अक्षयकुमार दिसणार आहे. नुकतीच याची एक झलक सोशल मीडियावर दाखवण्यात आली. लवकरच या चित्रपटाचा टीझरही प्रदर्शित होईल. तर अक्षयने करिनासोबत साईन केलेला चित्रपट ‘गुडन्यूज’चं चित्रीकरणदेखील सध्या सुरु आहे. यामध्ये दिलजीत दोसांझ आणि कियारा अडवाणीदेखील दिसणार आहेत. शिवाय मे मध्ये अक्षयचा ‘हाऊसफुल 4’ येत आहे. त्यानंतर ‘मिशन मंगल’देखील ऑगस्ट - सप्टेंबरदरम्यान प्रदर्शित होणार आहे. एकंदरीतच अक्षयकुमारसाठी हे वर्ष अप्रतिम असणार आहे. तर रोहित शेट्टी सध्या ‘खतरों के खिलाडी’मध्ये व्यस्त असून त्याचा ‘गोलमाल 5’ आणि ‘सिंघम 3’ येण्याचीही शक्यता आहे. सध्या हे दोन्ही अभिनेता आणि दिग्दर्शक कमालीचे व्यग्र असून एकापाठोपाठ एक हिट देत आहेत. 


फोटो सौजन्य - Instagram 


हेदेखील वाचा - 


सिद्धार्थ-मितालीच्या खास क्षणांनी सजलाय 'व्हॅलेंटाईन डे'


आकाश अंबानी आणि श्लोकाच्या लग्नाचं ‘मंगल पर्व’, पत्रिका व्हायरल


‘प्यार किया तो डरना क्या',मधुबालाविषयी तुम्हाला हे माहीत आहे का?