भारतात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे भीतीचं वातावरण आहे. सहाजिकच अनेक ठिकाणी लॉकडाऊन असल्यामुळे सध्या देशातील लोकांना मदतीची गरज आहे. कोरोनाच्या या कठीण काळात मदत करण्यासाठी अभिनेता अक्षय कुमार पुन्हा एकदा पुढे आला आहे. झालं असं की, कोरिओग्राफर गणेश आचार्यच्या वाढदिवशी अक्षय कुमारने त्याला विचारलं की तुला काय भेट हवी. त्यावर गणेश आचार्यने सध्या लॉकडाऊनमुळे त्यांच्या डान्सरचे होत असलेले हाल सांगितले आणि त्यांना आर्थिक मदत करण्यास सांगितली. बॉलीवूडच्या दिलदार अक्षय कुमारनेही लगेच मदतीचा हात पुढे करत जवळजवळ 3600 डान्सर्सच्या भोजनाची व्यवस्था करण्याचं मान्य केलं.
डान्सरपर्यंत कशी पूरवली जाणार भोजनव्यवस्था
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अक्षय कुमारने बॉलीवूड चित्रपटसृष्टीतील एकूण 3600 डान्सर्सनां महिनाभर रेशन पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थात या डान्सरनां मदत करण्यासाठी गणेश आचार्यने त्याला विनंती केली होती. गणेशचा नुकताच 50 वा वाढदिवस झाला. गणेशच्या वाढदिवसाचं गिफ्ट म्हणून अक्षय या बॅकडान्सरच्या भोजनाची व्यवस्था महिनाभर करणार आहे. गणेशच्या मते आज इंडस्ट्रीमध्ये 1600 ज्युनिअर डान्सर आणि 2000 बॅकग्राऊंड डान्सर्स आहेत या सर्व डान्सर्सची नावे इंडस्ट्रीमध्ये रजिस्ट्रर आहेत. मात्र सध्या लॉकडाऊनच्या काळात काम नसल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. गणेशच्या मते ही सेवा पूरवताना सर्वांच्या आरोग्य आणि सुरक्षेची काळजी घेतली जाणार आहे. या मदतीसाठी डान्सर्सनां रेशन किट अथवा त्यासाठी लागणारे पैसे पूरवण्यात येतील. गणेश आचार्यची पत्नी आचार्य फाऊंडेशनमार्फेत ही सेवा डान्सर्सनां पूरवणार आहे. त्यामुळे ती जातीने लक्ष घालून वितरीत केल्या जाणाऱ्या पॅकिंग आणि सुरक्षेच्या गोष्टी पाहणार आहे.
याआधीही अक्षयने केली आहे कोरोनाच्या काळात मदत
अक्षयने कोरोनाच्या काळात पहिल्यांच मदतीचा हात पुढे केलेला नाही त्याने यापूर्वीही मदत केली आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने ऑक्सिजन कॉन्सस्ट्रेटरची व्यवस्था केली होती. त्यानंतर गौतम गंभीरच्या फाऊंडेशनला एक कोटीची देणगी दिली. मागच्या वर्षी त्याने पंतप्रधान मदत निधीसाठी 25 कोटी दान केले होते. मुंबई महानगर पालिकेला पीपीई किट खरेदी करण्यासाठीदेखील 3 कोटींची मदत केली होती. अक्षय ने मुंबई पोलिसांच्या मदतीसाठी 2 कोटींची मदत केली होती. शिवाय त्याने कोरोनाच्या काळात आजवर दररोज काम करणाऱ्या मजुरांपासून ते अगदी इंडस्ट्रीमधील फोटग्राफर्सपर्यंत मदतीचा हात दिलेला आहे.
अक्षय कुमार एकाच वेळी अनेक चित्रपटात काम करत असतो म्हणून सर्वांचे सतत त्याच्या कमाईकडे लक्ष असते. बऱ्याचदा श्रीमंत अभिनयाच्या लिस्टमध्ये तो पहिल्या नंबरवर असतो. मात्र तो जसा मेहनत घेऊन पैसा कमावतो तसाच वेळ पडली तर गरजूंना मदत करण्यासाठी खर्च करण्यासही मागे पुढे पाहत नाही हेच यावरून सिद्ध होते. लॉकडाऊन संपताच अक्षयचा ‘सूर्यवंशी’ प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे. कोरोना महामारीमुळे हा चित्रपट गेले दोन वर्ष चांगलाच रखडला आहे. याशिवाय अक्षय लवकरच नेहमीप्रमाणे ‘रामसेतू’सह आणखी अनेक चित्रपटातून प्रेक्षकांच्या समोर येणार आहे.
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
अधिक वाचा –
देवदासनंतर आता संजय लीला भन्सालीच्या ‘हीरा मंडी’त माधुरीचा मुजरा
ऑडिशन न देताच तापसी पन्नूने मिळवला होता तिचा पहिला बॉलीवूड चित्रपट