अक्षय कुमारची मुलगी 'नितारा'चे जिमनॅस्टिक ट्रेनिंग सुरू

अक्षय कुमारची मुलगी 'नितारा'चे जिमनॅस्टिक ट्रेनिंग सुरू

बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार त्यांच्या स्टंट्स  आणि अॅक्शन मूव्हज साठी लोकप्रिय आहे. अक्षय कुमारच्या केसरी चित्रपटाला चांगलं यश मिळालं आहे. अक्षय त्याच्या प्रोफेशनल लाईफसोबतच वैयक्तिक जीवनातदेखील तितकाच यशस्वी झाला आहे. त्याला त्याचे काम आणि कौटुंबिक जीवन या दोघांमध्ये व्यवस्थित समतोल राखता येतो. अनेकदा अक्षय त्याची पत्नी ट्विंकल खन्ना आणि  मुलांसोबत वेळ घालवताना दिसून येतो. यासोबत इतर स्टाप किड्स प्रमाणे त्याच्या मुलांना नेहमी तो सोशल मीडिया आणि बॉलीवूड ग्लॅमरपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतो. अक्षयचा मुलगा आरव नेहमी मीडिया फोटोग्राफरपासून नजर चोरताना दिसून येतो. तर अक्षयची मुलगी नितारा कधीच मीडियासमोर आलेली नाही. मात्र नुकताच अक्षयने त्याच्या मुलीचा शेअर केलेला एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

निताराचे जिमनॅस्टिक ट्रेनिंग सूरू


अक्षय कुमार त्याच्या वैयक्तिक जीवनात शिस्त आणि फिटनेससाठी प्रसिद्ध आहे. अगदी सकाळी लवकर उठण्यापासून वेळेवर व्यायाम करण्यापर्यंत अनेक गोष्टी तो अगदी काटेकोरपणे फॉलो करतो. अक्षय कुमारचा हाच गुण त्याची मुले आरव आणि नितारा पुढे कायम ठेवेल अशी लक्षणं दिसू लागली आहेत. अक्षयने त्याच्या मुलाप्रमाणेच आता निताराही जिमनॅस्टिक ट्रेनिंगसाठी सज्ज झाली आहे. निताराच्या जिमनॅस्टिक ट्रेनिंगला नुकतीच सुरूवात झाली असून या ट्रेनिंगचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये नितारा जिमनॅस्टिक रिंगवर लटकत आहे आणि अक्षय कुमार तिचा स्टॅमिना मोजताना दिसत आहे. नितारा पंचेचाळीस सेंकद रिंगवर टिकून होती. या  व्हिडीओसोबतच अक्षयने हेही शेअर केलं आहे की, “निताराचे वय सहा वर्ष आहे. हे वय जिमनॅस्टिकसाठी उत्तम वय असून या वयात शरीर लवचिक असल्यामुळे जर या वयात जर जिमनॅस्टिकचा सराव केला तर भविष्यात त्याचा चांगला फायदा होऊ शकतो.”
 

 

 


View this post on Instagram


 

 

Kids tend to pick up what they see...start early and try to set a good example. Great parenting. Active kids. #FitIndia


A post shared by Akshay Kumar (@akshaykumar) on
नितारासोबत अक्षय वेळ घालवताना...


अक्षय कुमार बऱ्याचदा त्याच्या कुटुंबासोबत वेळ घालवतो. मुलांसोबतदेखील त्याचे चांगले बॉंडिंग दिसून येते. काही दिवसांपूर्वी अक्षयने मकर सक्रांतीनिमित्त नितारासोबत पतंग उडवतानाचा व्हिडीओ शेअर केला होता.

कसौटी जिंदगी की : प्रेरणा आणि अनुराग एकमेकांना करत आहेत का डेट


'83' चित्रपटात आदिनाथ कोठारे साकारणार 'दिलीप वेंगसरकर' यांची भूमिका


सोशल मीडियावर ‘छा गये छोटे नबाव’, पाहा फोटो


फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम