लॉकडाऊनमध्ये पूजा बेदीची मुलगी अलाया शिकतेय एडिटिंग

लॉकडाऊनमध्ये पूजा बेदीची मुलगी अलाया  शिकतेय एडिटिंग

कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण देश लॉकडाऊनमध्ये आहे. सध्या सुरक्षेसाठी हे लॉकडाऊन 3 मे पर्यंत वाढवण्यात आलं आहे. लॉकडाऊनमुळे जवळजवळ एक महिन्यापेक्षा जास्त काळ सर्वजण घरातच अडकून पडले आहेत. शूटिंग बंद असल्यामुळे सर्वसामान्यांप्रमाणेच बॉलीवूड सेलिब्रेटीदेखील घरात काहीतरी नवीन शिकून आपला वेळ घालवत आहेत. पूजा बेदीची मुलगी अलाया फर्निचरवालादेखील घराच बसून असंच एक कौशल्य आत्मसात करत आहे. अलायाच्या मते लॉकडाऊनचा काळ रडत खडत घालवण्यापेक्षा या वेळेचा चांगला उपयोग काहीतरी सकारात्मक गोष्ट शिकण्यासाठी करायला हवा. 

View this post on Instagram

Protein Pancakes with dark chocolate peanut sauce and apple compote (recipe⤵️) Ingredients you will need: - 4 Egg Whites - Almond Milk (or any type of milk) - Cinnamon Powder - Honey - Baking Soda - Protein Powder (whichever one you use) - 2 Apples - Dark Chocolate - Peanut Butter - Olive Oil - Stevia / Sugarfree Pancake batter recipe: 1. Put the following ingredients into a mixer/blender: (4 Egg Whites, 3 tbsp Almond Milk (or subsitute), 2 tsp Baking Soda, 1 tsp Cinnamon Powder, 1 tbsp Honey, 1.5 tbsp Peanut Butter, 1 Scoop Protein Powder) 2. Blend it all together until until there are no big chunks or lumps. If you have used chunky peanut butter, some bits of peanuts are okay. 3. Heat up a pan and add a few drops of Olive Oil to grease the pan. 4. Pour some pancake batter on to the pan 5. once the bottom side is no longer sticking to the pan and has cooked, flip the pancake to the other side and let it cook. 6. Once both sides are ready, take the pancake off and pour fresh batter on the pan for another pancake! 7. Add olive oil to the pan as and when necessary. Apple Compote recipe: 1. Peel the 2 apples and dice them into small pieces 2. Put the diced apples into a pot on the stove and add water till just a little above the apples 3. Add sufficient sugarfree / stevia (add to taste) 4. Add 1 tbsp honey 5. Add 1 tsp of cinnamon powder 6. Allow it to boil 7. Cover the lid and let it sit for a bit with the stove on. 8. Take a spoon and smash the apples a little while its cooking. 9. Once apples look softer and slightly browned by the cinnamon and it’s not looking too watery, take it off the stove. Chocolate Peanut Sauce recipe: 1. Add half cup Almond milk(or substitute) to a pot on the stove 2. Add 2 tbsp Peanut Butter 3. Cut the dark chocolate into small pieces and add it 4. Add 2 tbsp honey 5. keep stirring so it doesn’t stick to the bottom of the pot and burn 6. If you want to change the consistency and make it slightly thinner as a sauce then simply add some more milk and stir.

A post shared by Alaya F (@alaya.f) on

लॉकडाऊनमध्ये नेमकं काय करत आहे अलाया

लॉकडाऊनमुळे अलायाला आयताच रिकामा वेळ मिळालेला आहे. म्हणूनच ती सध्या नवनवीन गोष्टी शिकण्यात, वाचन करण्यात आणि उत्कृष्ट चित्रपट पाहण्यात हा वेळ घालवत आहे. या शिवाय अलाया या काळात फोटोशॉप कसं वापरायचं आणि एडिटिंग कसं करायचं हे ही शिकत आहे. यासाठी सध्या ती 'Avid' या ऑनलाईन एडिटिंग सॉफ्टवेअरचा वापर करत आहे. यातील काही नवीन प्रकार शिकून ती तिचं एडिटिंग स्कील वाढवत आहे. यापूर्वी अलायाने हे सॉफ्टवेअर न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीतून डायरेक्शनचं शिक्षण वापरलं होतं. आता ती एडिटिंग शिकण्यासाठी ऑनलाईन मास्टरक्लास देखील करत आहे. एडिटिंग आणि अभिनय या दोन्ही कलांमध्ये तिला पारंगत व्हायच आहे. या दोन्ही स्कीलचा तिला तिच्या करिअरमध्ये नक्कीच फायदा होणार आहे. लॉकडाऊनमध्ये घरात कंटाळा करत बसण्यापेक्षा मिळालेली संधी ओळखून तिचा वापर योग्य पद्धतीने करण्याचा तिचा विचार आहे.

अलायाने या चित्रपटातून केलं आहे बॉलीवूडमध्ये पदार्पण

अलाया फर्निचरवाला काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या 'जवानी जानेमन' या चित्रपटातून झळकली होती. नितीन कक्कड दिग्दर्शित जवानी जानेमन एक कॉमेडी चित्रपट होता. या चित्रपटात सैफ आणि अलायासोबत तब्बूदेखील प्रमुख भूमिकेत होती. जवानी जानेमनमध्ये सैफने एका जबाबदारी न स्वीकारणाऱ्या बेफिकीर माणसाची भूमिका साकारली होती. ज्यामध्ये त्याला लग्न, मुलं ही जबाबदारी नको असते. मात्र अचानक त्याच्यासमोर त्याची टीनएज मुलगी येते ज्यामुळे त्याचं संपूर्ण आयुष्यच बदलून जातं. या चित्रपटातील सैफच्या 'ओले ओले' या गाण्याला चांगली पसंती मिळाली होती. हे गाणं सैफच्या दिल्लगी या चित्रपटातील होतं मात्र या गाण्याचे हे न्यू व्हर्जन आणि त्यातील सैफचा नवा अंदाज लोकांना फारच आवडला होता. या चित्रपटातील सैफचा बेफिकीर माणूस ते प्रेमळ बाप हा प्रवास खूपच भावनिक होता. यात अलायाने सैफच्या टिन एज मुलीची भूमिका साकारली होती. अलायाच्या अभिनयामुळे तिचं पहिल्याच चित्रपटात चांगलं कौतुक झालं होतं. ज्यामुळे अलायासमोर पुढील काम यापेक्षा चांगलं करण्याचं आव्हान नक्कीच  आहे. प्रेक्षक देखील तिला विविध भूमिकांमध्ये पाहण्यासाठी उत्सुक आहेत. एडिटिंग स्कील शिकत असल्यामुळे आणि न्यूयॉर्कमधून रितसर डायरेक्शन शिकून आल्यामुळे अलाया अभिनयासोबतच दिग्दर्शकाच्या भूमिकेतसुद्धा लवकरच दिसण्याची शक्यता आहे.