संजय लीला भन्सालीचे घरातूनच काम सुरू, बैजू बावरामध्ये झळकणार ‘ही’ जोडी

संजय लीला भन्सालीचे घरातूनच काम सुरू, बैजू बावरामध्ये झळकणार ‘ही’ जोडी

कोरोना व्हायरसच्या भितीमुळे संपूर्ण चित्रपटसृष्टी  लॉकडाऊन झाली आहे. चित्रपटाचे शूटिंग आणि प्रदर्शनाचे काम पूर्णपणे ठप्प झाले आहे. कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी सर्व सेलिब्रेटीजनी स्वतःला जवळजवळ घरात कोंडूनच घेतले आहे. मात्र या काळातही काही सेलिब्रेटीज त्याचं काम घरातून करत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहीतीनुसार संजय लीला भन्सालीने सध्या घरातूनच त्याच्या आगामी चित्रपटाचं काम करण्यास सुरूवात केली आहे. ‘गंगूबाई काठियावाडी’ नंतर त्याने त्याच्या आगामी चित्रपट ‘बैजूबावरा’साठी स्टार कास्ट निवडण्याचं काम सुरू केलं आहे. या चित्रपटाची पटकथा लिहून पूर्ण झाली असून चित्रपटाच्या संगीताचे कामदेखील सुरू करण्यात आले आहे. लवकरच या चित्रपटात एक  सुपरहिट जोडी झळकण्याची शक्यता आहे.

'बैजू बावरा'मधून ही जोडी पुन्हा एकदा एकत्र

संजय लीला भन्सालीच्या आगामी चित्रपट 'बैजू बावरा'मध्ये रणवीर आणि आलिया झळकण्याची शक्यता आहे. या दोघांनी या पूर्वी गली बॉय या चित्रपटात काम केलं होतं. संजय लीला भन्सालीच्या गंगूबाई काठियावाडी या चित्रपटात आलिया भट प्रमुख भूमिका साकारत आहे. या वर्षी 11 सप्टेबरला संजय लीला भन्सालीचा गंगूबाई काठियावाडी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. आलियाच्या अभिनयावर संजय इतका खूश झाला आहे की त्याने त्याच्या बैजू बावरा या आगामी चित्रपटातदेखील आलियाला प्रमूख भूमिकेत घेण्याचा निर्णय घेतला आहे. या चित्रपटात आलियासोबत रणवीर सिंहदेखील प्रमुख भूमिकेत असणार आहे. रणवीरने संजयच्या अनेक चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. त्यामुळे यंदाच्या दिवाळीत प्रेक्षकांना रणवीर सिंह आणि आलिया भट ही जोडी पुन्हा एकदा एकत्र दिसण्याची शक्यता आहे.    

Instagram

आलिया आणि रणवीरची सुपरहिट जोडी

आलिया आणि रणवीर सिंह गली बॉय या चित्रपटात एकत्र दिसले होते. मागच्या वर्षी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला होता. या चित्रपटात रणवीर सिंहने मुराद आणि आलियाने सैफीनाची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील त्या दोघांच्याही अभिनयाचे भरपूर कौतूक करण्यात आले होते. ज्यासाठी त्यांना अनेक चित्रपट पुरस्कारदेखील मिळाले. या चित्रपटातील काही संवादांवर खास मीम्सदेखील तयार करण्यात आले होते. जे सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यामुळे या दोघांना पुन्हा एकत्र पाहण्यास चाहते नक्कीच उत्सुक असतील. 

काय आहे बैजूबावराचं कथानक

'बैजू बावरा' हा चित्रपट 1892 साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटाचा रिमेक असणार आहे. बैजू बावरा ही एक संगीतमय बायोपिक आहे. हा चित्रपट 15 व्या शतकातील दोन महान गायकांच्या जीवनकथेवर आधारित आहे. ज्या काळात बैजू बावरा आणि तानसेन हे दोन दिग्गज कलाकार लोकप्रिय होते. बैजू हे ध्रूपद गायकीसाठी प्रसिद्ध होते. अकबराच्या दरबारात तानसेन यांना फार मानसन्मान होता. मात्र बैजू तानसेन यांना त्यांच्या वडीलांच्या मृत्यूसाठी जबाबदार ठरवत होते. यासाठी त्यांनी दरबारात तानसेन यांना संगीत स्पर्धेसाठी  आव्हान दिलं होतं. 

फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम

हे ही वाचा -

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या. 

अधिक वाचा -

ते चित्रपट नाकारल्याचा मला आजही पश्चाताप होतो

जय-वीरुची जोडी पुन्हा दिसणार पडद्यावर तेही मराठी चित्रपटात

सोनम कपूरकडे आहे गोड बातमी, व्हायरल होतोय फोटो