आलिया भटने तिच्या ड्रायव्हर्सचे घराचे स्वप्न केले पूर्ण

आलिया भटने तिच्या ड्रायव्हर्सचे घराचे स्वप्न केले पूर्ण

बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट तिच्या वैयक्तिक आणि प्रोफेशनल लाईफमध्ये अनेक गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. बॉलीवूडमध्ये खूपच कमी वयात तिला चांगले यश मिळाले. तिचे जवळजवळ सर्वच चित्रपट बॉक्सऑफिसवर हिट ठरत आहेत. यामागे आलियाची मेहनत आणि अभिनयकौशल्य नक्कीच आहे. सोशल मीडियावर तिचे अनेक चाहते आहेत. काही दिवसांपासून आलिया तिच्या वैयक्तिक जीवनात  रणबीर कपूरसोबत असलेल्या रिलेशनशिपमुळे सतत चर्चेत आहे. रणबीर आणि आलिया लवकरच विवाहबंधनात अडकणार असंही म्हटलं जात आहे. या नात्यासाठी त्या दोघांच्या कुटुंबाची संमती मिळाली आहे. आलिया एक सह्रदय व्यक्तिमत्व असल्यामुळे ती आता आणखी एका गोष्टीमुळे पुन्हा चर्चेत आली आहे. आलियाने नुकतच तिच्या ड्रायव्हरसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. आलियाने 2012 साली तिच्या करिअरला सुरूवात केली. तेव्हापासून ड्रायव्हर सुनिल आणि हेल्पर अमोल तिच्यासोबत असतात. आलिया या दोघांना कुटुंबातील सदस्याप्रमाणे वागणूक देते. नुकतच तिने ड्रायव्हर सुनिल आणि अमोल यांचं स्वतःच्या घराचं स्वप्न पूर्ण केलं आहे. यासाठी आलियाने सुनिल आणि अमोलला प्रत्येकी जवळजवळ पन्नास लाखांची मदत केली आहे. आलियाने नुकतच 26 व्या वर्षात पदार्पण केलं आहे. तिच्या वाढदिवशीच तिने सुनिल आणि अमोल ड्रायव्हरला हे गिफ्ट देऊन चकीत केलं होतं. आलियाच्या या गिफ्टमुळे आता सुनिल आणि अमोल याचं मुंबईत स्वतःचं घर असण्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे. सुनिल आणि अमोल यांनी जुहू आणि खार येथे वन बी एच के बूक केल्याची चर्चा आहे.


FI-alia-bhatt


आलिया विषयी आणखी काही


2012 साली धर्मा प्रॉडक्शनच्या स्टुडंट ऑफ दी एअरमधून बॉलीवूडमध्ये आलियाने पदार्पण केलं. फारच कमी वयात तिला चांगली लोकप्रियताही मिळाली. एवढ्या कमी कालावधीत विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. या सर्व भूमिका तिच्या सक्षम अभिनयामुळे प्रेक्षकांनी पसंत केल्या. त्यामुळे कमी कालावधीत तिचे अनेक चाहते निर्माण झाले आहेत. बऱ्याचदा नवोदित अभिनेत्री सुरूवातीला ग्लॅमरस भूमिका करणं पसंत करतात. आलियाने मात्र तिच्या बॉलीवूडमधील पदार्पणानंतर लगेच विविध धाटणीच्या भूमिका करण्यास सुरूवात केली. हायवे, 2 स्टेट्स, उडता पंजाब, लव्ह यु जिंदगी, बद्री की दुल्हनिया, राझी असे हटके विषयासह तिने अनेक चित्रपट केले. गली बॉय चित्रपटाने तिला एक चांगली ओळख निर्माण करून दिली.


alia-bhatt2


आलियाचे  आगामी चित्रपट


आलिया सध्या तिच्या आगामी चित्रपट कलंक आणि ब्रम्हास्त्रच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.ब्रम्हास्त्रमध्ये ती रणबीरसोबत काम करत आहे. कलंक चित्रपटात वरून धवन, माधुरी दीक्षित, संजय दत्त, आदित्य राय कपूर, सोनाक्षी सिन्हा यांच्यासोबत आलिया दिसणार आहे. सध्या कलंक चित्रपटाचे प्रमोशन जोरदार सुरू असून नुकतच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. कलंक चित्रपट 17 एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. या शिवाय बाहुबलीच्या मेकर्सनी तिला एका चित्रपटासाठी साईन केल्याचीही चर्चा आहे. एस.एस. राजमौली यांनी स्वत: आलियाकडून ही फिल्म साईन करुन घेतली असून बाहुबलीप्रमाणेच हा एक बीग बजेट सिनेमा ते आलियासोबत करणार आहेत. त्यामुळे आलियाचा नावाचा चांगलाच दबदबा बॉलीवूडमध्ये निर्माण होणार यात शंकाच नाही.alia ranveer


अधिक वाचा


एकेकाळी ऑडीशनमध्ये रिजेक्ट झालेले हे स्टार्स तुम्हाला माहीत आहेत का?


प्रियांका चोप्राचा फिटनेस, डाएट आणि ब्युटी मंत्रा जाणून घ्या


मैने प्यार किया फेम भाग्यश्री पटवर्धनचा मुलगा अभिमन्यू करतोय बॉलीवूडमध्ये पदार्पण


फोटोसौजन्य-  इन्स्टाग्राम