माझ्यापासून 5 पावलं दूर उभे राहा.. आलियाने दिला दम

माझ्यापासून 5 पावलं दूर उभे राहा.. आलियाने दिला दम

आलिया भट सध्या फक्त रणबीर कपूरमुळे कायम प्रकाशझोतात असते. त्यांच्या या लव्ह रिलेशनशीपमुळे पापाराझी त्यांच्या अगदी मागेच लागलेले असतात. पण सध्या आलियाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. यामध्ये आलियाचे इतरवेळी दिसणारे बबली लुक दिसत नाही. तर ती चक्क सज्जड दम भरताना दिसत आहे. माझ्यापासून 5 पावलं दूर उभे राहा असे म्हणत तिने चांगलाच दम भरला आहे.

कल्की केकलाच्या pregnancy वर अनुराग कश्यपने दिली ही प्रतिक्रिया

या कारणासाठी आलियाने दिला दम

आता आलिया नेहमीच आपल्या क्युट स्माईलला कॅरी करते. पण त्या दिवशी असे काही झाले की, आलियाला तिचा राग आवरता आला नाही. वाडिया येथे हृदयविकारांनी त्रस्त असलेल्या लहान मुलांना भेटायला ती गेली होती. तिचा फोटो काढण्यासाठी फोटग्राफर आले. तिचा चांगला फोटो मिळावा यासाठी ते फारच गोंधळ घालत होते.. त्यावर चिडलेल्या आलियाने माझ्यापासून 5 पावलं दूर उभे राहा…मी कुठेही जात नाही…. ज्याप्रमाणे शाळेत शांत बसायला सांगितले जाते. तसे राहा हे हॉस्पिटल आहे या ठिकाणी आवाज करणे चांगले नाही. असे म्हणत आलियाने फोटोग्राफरची चांगलीच कानउघडणी केली.

View this post on Instagram

Sweet #aliabhatt ❤😄

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

पापाराझींचा गोंधळ कायमच

Instagram

हल्ली इतकी स्पर्धा आहे की, पापाराझींना सेलिब्रिटींचे एक्सक्लुझिव्ह फोटो हवे असतात. पण हे फोटो काढण्यासाठी ते फारच गोंधळ घालतात. या आधी देखील असा अनुभव आला आहे. ऐश्वर्या राय बच्चन हॉस्पिटलमध्ये गेली होती. यावेळी तिची आई आणि मुलगी आराध्या देखील होती. त्याहीवेळी पापाराझींनी ऐश्वर्या राय बच्चनचा फोटो काढण्यासाठी एकच गोंधळ घातला. ऐश्वर्या रायला फोटोग्राफर्सना आवरताना नाकी नऊ आले होते. त्यावेळी तिच्या डोळ्यात अश्रूही आले होते. त्यामुळे पापाराझींचा हा गोंधळ हा काही नवीन राहिला नाही. 

आलिया सध्या काय करते

Instagram

उडता पंजाब, राझी, गली बॉय यासारखे एकामागोमाग दर्जेदार चित्रपट केले. सध्या ती धर्मा प्रोडक्शनच्या ‘ब्रम्हास्र’ या चित्रपटामध्ये व्यग्र आहे. या चित्रपटात ती रणबीर कपूरसोबत दिसणार आहे. रिअल लाईफसोबत रिललाईफमध्येही तिचा हा रोमान्स पाहायला मिळणार आहे.  या शिवाय तिच्याकडे सडक 2 आणि RRR हा चित्रपट आहे. हे सगळे मोठे प्रोजेक्ट असून ती या सगळ्यामध्ये व्यग्र आहे. 

ऐश्वर्या राय बच्चन बनणार अँजेलिना जोलीचा आवाज

आलिया कधी करणार लग्न

Instagram

सध्या तरी आलिया आणि रणबीर कपूर यांच्या लग्नाच्या चर्चा जोर धरताना दिसत आहे.रणबीर कपूर या आधीही लग्न करेल अशा जोरदार चर्चा होत्या. दीपिका पदुकोण, कतरिना कैफ या दोघींसोबत तो काही काळासाठी रिलेशनशीपमध्ये होता. पण त्यांच्यासोबत त्याचे नाते टिकले नाही. त्यानंतर अचानक आलिया आणि रणबीरच्या लिंकअपच्या चर्चा जोर धरु लागल्या आणि आता त्यांच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आले आहे. पण ते कधी लग्न करणार हे अद्याप कळू शकलेलं नाही. 


पण आता आलियाने आपला सोबर अवतार सोडून दमात घ्यायला सुरुवात केली आहे हे या व्हिडिओमधून तरी दिसत आहे. 

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.