देशभक्तीचा चित्रपट करणारी आलिया नाही करणार मतदान

 देशभक्तीचा चित्रपट करणारी आलिया नाही करणार मतदान

आलिया भटची बॉलीवूडमधील इमेज बदलत चालली आहे. तिच्या चित्रपटांच्या निवडीमध्ये विविधता येऊ लागली आहे. देशभक्तीवर तिने केलेला राझी हा चित्रपट तिच्या करिअरसाठी कलाटणी ठरला. देशासाठीही काहीही करण्याची भूमिका साकारणाऱ्या आलियाच्या अभिनयाची सगळ्यांनीच तारीफ केली. पण देशभक्तीचा सिनेमा करणारी हीच आलिया मतदान करणार नाही हे तुम्हाला माहीत आहे का? हो तुम्ही ऐकत आहात ते अगदी खऱे आहे आलिया येत्या निवडणूकांसाठी मतदान करणार नाही. मतदान न करण्यामागे एक कारण आहे ते कारण तुम्ही जाणून घेणे गरजेचे आहे.


aliaa kalank


प्रेग्नन्सीच्या अफवांवर दीपिकाने केला खुलासा


म्हणून आलिया नाही करणार मतदान


सध्या देशभरात लोकसभा निवडणुकांचे वारे आहेत. काही ठिकाणी मतदानाला सुरुवात झाली आहे. मुंबईत येत्या २९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. याची जोरदार तयारी सुरु आहे. तर कलंक या चित्रपटाची टीम प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. अशाच एका प्रमोशन इव्हेंटमध्ये आलिया आणि वरुण धवन गेले. तेव्हा एका पत्रकाराने वरुण धवनला मतदान करणार का ? असा प्रश्न केला. त्यावेळी त्याने अर्थात. मतदान हा माझा अधिकार आहे आणि तो मी बजावणारच असे सांगितले. जेव्हा आलियाला हा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा ती म्हणाली मी मतदान करु शकत नाही. तेव्हा प्रत्येक जण चपापला. पण जर तुम्हाला माहीत नसेल तर आलिया ही भारताची नागरिक नाही. तर ती ब्रिटनची नागरिक आहे. सोनी राजदान म्हणजेच आलियाची आईसुद्धा ब्रिटनची आहे. त्यामुळे आलियाला भारतातील मतदानाचा अधिकार नाही.


कलंकचे प्रमोशन जोरात

करण जोहरचा 'स्टुडंट ऑफ द इयर २' चा ट्रेलर म्हणजे शिळ्या कढीला उत


आलिया भटचा नुकताच गली बॉय हा चित्रपट येऊन गेला.तो चांगलाच हिट झाला आणि आता आलिया करण जोहरचा ड्रिम प्रोजेक्ट असलेल्या कलंकच्या प्रमोशनमध्ये गुंतली आहे. कलंक हा पिरियॉडिक चित्रपट आहे. या चित्रपटात वरुण धवन, माधुरी दीक्षित, संजय दत्त यांच्या प्रमुख भूमिका आहे. या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी रिलीज करण्यात आला. या शिवाय आलिया 'ब्रम्हास्त्र' या चित्रपटाचे शुटींगही करत आहे. या चित्रपटात तिच्यासोबत रणबीर कपूर आहे. या चित्रपटाचा लोगो एका वेगळ्या पद्धतीने रिलीज करण्यात आला. त्यामुळे आलिया सध्या फुलफॉर्ममध्ये असून वेगवेगळ्या काळातील चित्रपट आलिया करत आहे.


आलियाचे अच्छे दिन 


आलियाकडे गेल्या काही वर्षांपासून खूप चांगले प्रोजेक्ट आहेत. तिच्या अभिनयाची वेगवेगळी झलक प्रत्येक चित्रपटात पाहायला मिळाली आहे. २०१९ ची सुरुवात हिट ठरलेल्य गली बॉयने झाली म्हटल्यावर  2019 चे उर्वरित साल तिच्यासाठी एकदम 'फर्स्ट क्लास' असणार आहे यात काहीच शंका नाही.


आलियावर पुन्हा बरसली कंगना, केली अभिनयावर टीका


इतर कलाकारही भारताचे नागरिक नाहीत


आलियाच नाही तर बॉलीवूडमध्ये इतरही असे प्रसिद्ध चेहरे आहेत ज्यांच्याकडे भारताचे नागरिकत्व नाही. अक्षय कुमार हे त्यातील एक मोठे नाव आहे. आतापर्यंत अक्षयने अनेक देशभक्तीपर चित्रपट केले आहेत.पण तो भारताचा नागरिक नाही तर त्याच्याकडे कॅनडाचं नागरिकत्व आहे. दीपिका पदुकोणही भारताची नागरिक नाही तर तिच्याकडे डेन्मार्कचं नागरिकत्व आहे. याशिवाय अजून बरेच सेलिब्रिटींकडे भारताचे नागरिकत्व नाही.


(सौजन्य- Instagram)