संजय लीला भन्सालीच्या ‘गंगुबाई काठीयावाडी’मध्ये आलिया भटची वर्णी

संजय लीला भन्सालीच्या ‘गंगुबाई काठीयावाडी’मध्ये आलिया भटची वर्णी

संजय लीला भन्साली आलिया भट आणि सलमान खानसोबत इंशाअल्लाह हा चित्रपट करणार होता. चाहत्यांना सलमान आणि आलियाची प्रेमकथा पाहण्याची उत्सुकता होती. मात्र चित्रपट सुरू होण्याआधीच तो निर्माण करण्याचा विचार रद्द करण्यात आला.  कारण या चित्रपटाचा निर्माता सलमान खान होता. आणि त्याने हा चित्रपट करण्याचा निर्णय अचानक बदलला. सलमानच्या या निर्णयामुळे संजय लीला भन्सालीला या प्रोजेक्टला सोडून द्यावं लागलं. शिवाय आलियाचं संजय लीला भन्सालीसोबत काम करण्याचं स्वप्नंही भंगलं.  आलियासोबत चित्रपट करण्याच्या निर्णयावर संजय लीला भन्साली मात्र ठाम होता. ज्यामुळे त्याने तिच्यावर एक महिला प्रधान चित्रपट करण्याचा निर्णय घेतला.

Instagram

आता आलियाचं स्वप्न होणार पूर्ण

आलिया भटला लहानपणापासून संजय लीला भन्सालीसोबत काम करण्याची इच्छा होती. ज्यावेळी तिला इंन्शाअल्लाह चित्रपट ऑफर झाला तेव्हा तिचा  आनंद गगनात मावत नव्हता. इन्शाअल्लाहसाठी तिच्यावर एक गाणंही चित्रीत करण्यात आलं होतं. मात्र अचानक सलमानचा निर्णय बदलल्यामुळे हा चित्रपट रद्द झाला. ज्यामुळे आलियाचं संजय लीला भन्सालीसोबत काम करण्याचं स्वप्न पूर्ण होणार नाही असं वाटू लागलं. मात्र संजय लीला भन्सालीला आलियासोबत काम करायचंच होतं. ज्यामुळे त्यांनी  तिला एका नव्या चित्रपटाची ऑफर दिली. संजय लीला भन्साली आता आलियासोबत या आगामी चित्रपटाची तयारी करत आहे. संजय लीला भन्सालीच्या आगामी ‘गंगूबाई काठियावाडी’मध्ये आलिया भट झळकणार आहे. या चित्रपटात आलिया प्रमुख भूमिकेत असणार आहे. हा चित्रपट महिला प्रधान आहे. गंगूबाई काठियावाडी हा मुंबईतील कामाठीपूरा येथील रेड लाईट लाईफवर आधारित असणार आहे.  ही या विभागातील गंगूबाई काठियावाडी या प्रसिद्ध महिलेवर या चित्रपटाचं कथानक आहे. ज्यामुळे प्रेक्षकांना मुंबईतील मागील साठ वर्षांचा प्रवास दाखवण्यात आलं आहे. हा चित्रपट 2020 मध्ये प्रद्रर्शित होणार आहे. 

Instagram

गंगूबाई काठियावाडीचं कथानक

या चित्रपटाची शूटिंग या महिन्यापासून सुरू होण्याची शक्यता आहे. ज्यामध्ये आलिया एक महिला माफिया डॉनच्या भूमिकेत दिसणार आहे. गंगूबाईची भूमिका साकारण्यासाठी याआधी प्रियंकाला हा रोल ऑफर करण्यात आला होता. मात्र आता या चित्रपटासाठी आलिया भटची वर्णी लागली आहे. हा चित्रपट एस. हुसैन जैदी यांच्या माफिया क्विन्स ऑफ मुंबई या पुस्तकावर आधारित असणार आहे. या चित्रपटातील गंगूबाई यांना कामाठीपूराची राणी असंही म्हटलं जायचं. गंगूबाई सेक्स वर्कर्स साठी गॉडमदर होती. जिला या व्यवसायातील महिला गंगू मॉं या नावाने ओळखत असतं. गंगूबाईची ओळख मुंबईतील सर्व माफिया आणि राजकीय नेत्यांसोबत होती.ज्यामुळे तिची दहशत सर्वत्र पसरली होती. वास्तविक गंगूबाई परिस्थितीमुळे या व्यवसायात अडकली होती. तिचं मुळ नाव गंगा हरजीवनदास काठियावाडी असं होतं. ती पूर्वी गुजरातच्या काठियावाडी येथे राहत असे. एका मोठ्या आणि संपन्न घरातील मुलगी होती. मात्र गंगाला मुंबईत येऊन चित्रपटात काम करण्याची हौस होती. ज्यामुळे ती मुंबईत आली आणि त्यानंतर तिला परिस्थितीमुळे या व्यवसायात जावं लागलं. 

फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम

हे ही वाचा -

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

अधिक वाचा -

मधुबालासारख्या दिसणाऱ्या या मुलीचा टिक टॉक व्हिडिओ होतोय व्हायरल

सलमान खान लवकरच राहायला जाणार त्याच्या नव्या घरी

सैराट आणि धडकफेम ‘आर्ची-पार्थवी’च्या या भेटी मागचं कारण काय