'इन्शाअल्लाह' नाही पण आलियाला मिळाला भन्साळीचा दुसरा चित्रपट

'इन्शाअल्लाह' नाही पण आलियाला मिळाला भन्साळीचा दुसरा चित्रपट

संजय लीला भन्साळी यांचा ‘इन्शाअल्लाह’ हा चित्रपट सुरु होण्याआधीच बंद झाला. या चित्रपटासाठी सलमान खान आणि आलिया भट यांची निवड करण्या आली होती. पण आता चित्रपटाचा प्रोजेक्टच थांबल्यामुळे ही जोडी पुन्हा पडद्यावर दिसेल असे वाटत नाही. पण प्रोजेक्ट थांबला म्हणून काय झाले. संजय लीला भन्साळी एक नवा चित्रपट घेऊन सज्ज झाले आहेत आणि त्यांनी या चित्रपटासाठी आलियाचीच निवड केली आहे. लवकरच आलिया संजय लीला भन्साळी यांच्या नव्या प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे. चित्रपटाचे नाव देखील घोषित करण्यात आले आहे.

या चित्रपटात दिसणार आलिया

Instagram

 आता संजय लीला भन्साळी यांच्या प्रोजेक्ट बाबत तुम्हाला प्रश्न पडला असेल तर हा चित्रपट आहे  ‘गंगूबाई’ चित्रपटाच्या नावावरुन अनेकांना फार प्रश्न पडले आहेत. हुसैन जैदी यांच्या ‘माफिया क्वीन्स ऑफ मुंबई’ या पुस्तकावर आधारीत हा चित्रपट असल्याचे सांगितले जात आहे. पण त्याबद्दल अधिक कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे हा चित्रपट काय आहे ते कळू शकले नाही. 

सुमी-समरच्या लग्नसोहळ्याचे फोटो झाले व्हायरल

आलियाने केला होता वादा

इन्शाअल्लाह हा मोठा प्रोजेक्ट होता. पण आता अर्ध्यावरच डाव मोडला म्हटल्यावर काय करणार? त्यामुळे आता आलिया कोणत्या चित्रपटात दिसेल असा प्रश्न पडला होता. पण आलियाने दिलेल्या एका मुलाखतीत खात्री दिली होती की, ती लवकरच संजय भन्साळी यांच्या चित्रपटात दिसणार. पण कधी हे मात्र कळत नव्हते. आता तर या चित्रपटाची घोषणा झाल्यानंतर या चित्रपटाचे कामही सुरु झाले असे कळत आहे.

म्हणून इन्शाअल्लाह झाला बंद

Instagram

सलमान खान आणि आलिया भट या चित्रपटात पहिल्यांदाच मुख्य भूमिकेत दिसणार होते. या चित्रपट सलमान खान निर्मित असणार होता. पण अचानक काहीतरी बिनसल्याच्या बातम्या समोर येऊ लागल्या. सलमान खानला या चित्रपटाच्या निर्मितीतसाठी लागणारा पैसा हा तुलनेने अधिक वाटला. म्हणून त्याने हा चित्रपट करण्यास नकार दिला. शिवाय या चित्रपटात वयाने लहान असलेल्या आलियासोबत रोमँटीक सीन करण्यास सलमानने नकार दिल्याचेही म्हटले जात आहे. एकूणच काही कारणांवरुन ही डिल फिस्कटली हे मात्र नक्की!

‘पद्मावत’ झाला हिट

Instagram

संजय लीला भन्साळी यांचा 2018 साली  ‘पद्मावत’ हा चित्रपट येऊन गेला. राणी पद्मावतीच्या जीवनावर आधारीत हा चित्रपट होता. पण हा चित्रपटही वादग्रस्त ठरला. यात दाखवण्यात आलेली दृश्य ही पद्मावती राणीला मानणाऱ्यांना पटणारी नव्हती. म्हणूनच यात बदल करण्यात आले. त्यानंतरच हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. रणवीर सिंह, दीपिका पदुकोण आणि शाहीद कपूर यांच्या या चित्रपटात महत्वाच्या भूमिका  होत्या. हा ही एक भव्य दिव्य असा चित्रपट होता. 

सलमान करणार हा चित्रपट

Instagram

सलमान खान सध्या दबंग 3 मध्ये व्यग्र आहे. या शिवाय त्याच्या डोक्यात अनेक प्लॅन आहे. तो त्याच्याच चित्रपटाचे फ्युजन करायच्या तयारीत असल्याचे कळत आहे. शिवाय तो indian army वर आधारीत सॅटेलाईट शंकर नावाच्या चित्रपटाची निर्मिती करत आहे. या चित्रपटात सुरज पांचोली, मेघा आकाश यांच्या प्रमुख भूमिका आहे. सलमान खाननेच सुरज पांचोलीला ब्रेक दिला होता. आता हा सलमानसोबत सुरजचा दुसरा चित्रपट आहे.

हे सगळं असलं तरी आलियाच्या हाताला सोनं लागलं आहे कारण तिला संजय लीला भन्साळीसोबत एका मोठ्या प्रोजेक्टमध्ये काम करता येणार आहे. 

सुमी-समरच्या लग्नसोहळ्याचे फोटो झाले व्हायरल


खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.