2019 मध्ये आलियाची जोरदार घौडदौड सुरू

2019 मध्ये आलियाची जोरदार घौडदौड सुरू

आल‍िया भटसाठी 2019 हे वर्ष खूपच जोरदार ठरत आहे. आलियाच्या रणवीर सिंगसोबत आलेल्या ‘गली बॉय’ला चांगलंच यश मिळालं.
 

 

 


View this post on Instagram


 

 

Luls & Tuts ✌️


A post shared by Alia 🌸 (@aliaabhatt) on
त्यानंतर सध्या आलिया रणबीर कपूरसोबत ब्रम्हास्त्रमध्ये बिझी आहे.
 

 

 


View this post on Instagram


 

 

शिवा और इशा 💫 #brahmastra


A post shared by Alia 🌸 (@aliaabhatt) on
एवढंच नाहीतर तिने स्वतःचं प्रोडक्शन हाऊस सुरू करण्याचीही घोषणा केली आहे. त्या मागोमागच तिला एक बायोपिकही मिळाला आहे.   


आलिया उतरत्येय निर्मिती क्षेत्रात
 

 

 


View this post on Instagram


 

 

🔎


A post shared by Alia 🌸 (@aliaabhatt) on
आपल्या उत्तम अभिनयामुळे आलिया भटने बॉलीवूडमध्ये आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. पण आलियाला अॅक्टींगपर्यंतच सीमित राहायचं नाहीयं. नुकत्याच एका मुलाखतीत तिने स्वतःच्या प्रोडक्शन हाऊसबाबत सांगितलं. या प्रोडक्शन हाऊसला तिने Eternal Sunshine Productions असं खास नाव दिलंय. 
 

 

 


View this post on Instagram


 

 

🐒


A post shared by Alia 🌸 (@aliaabhatt) on
आलियाने या प्रोडक्शन हाऊसला सुरूवात केली असून ती एक सॉलिड प्रोडक्शन प्लॅन करत आहे. यावर तिची टीम सध्या काम करत आहे. पण कोणता चित्रपट याबाबत मात्र तिने कोणताही खुलासा केलेला नाही. आलियाला असा सिनेमा बनवायचा आहे, जो तिला स्वतःला पाहायला आवडेल.


आलियाचा बायोपिक


बॉलीवूडमध्ये सध्या बायोपिक चित्रपटांची चलती आहे. आलिया भट्टही लवकरच एक बायोपिक करणार आहे.  हा चित्रपट अरुणिमा सिन्हावर बनवण्यात येणार आहे आणि या चित्रपटासाठी आलियाने होकारही दिला आहे. 'बॉर्न अगेन ऑन द माउंटन: ए स्टोरी ऑफ लूजिंग एव्हरीथिंग अँड फाइंडींग बँक' नावाच्या पुस्तकावर आधारित हा चित्रपट असेल. हा चित्रपट करण जोहर आणि विवेक रंगाचारी हे निर्मिती करणार आहे.


13561760 252614841777294 1490788130 n


अरूणिमा सिन्हा ही एक नॅशनल व्हॉलीबॉल खेळाडू होती, जी काही चोरांशी लढताना चालत्या ट्रेनमधून पडली आणि या दुर्घटनेत तिला आपला एक पाय गमवावा लागला. पण तरीही अरूणिमा खचली नाही आणि एका वर्षाच्या आतच तिने एव्हरेस्टवर चढाई केली. एव्हरेस्टवर चढणारी ती पहिली दिव्यांग महिला बनली.


13732256 1012057625568052 717753011 n


अरूणिमाने एका कृत्रिम पायाच्या साहाय्याने एव्हरेस्ट सर करण्यासोबतच किलीमांजारो (आफ्रिका), एल्ब्रुस (रशिया), कास्टेन पिरॅमिड (इंडोनेशिया), किजाश्को (ऑस्ट्रेलिया) आणि माउंट अकंकागुआ (दक्षिण अमेरिका) पर्वत या सर्व शिखरांना सर केलं आहे. तसंच माउंट विन्सन हा दक्षिणी ध्रुवावरील अंटार्टीकास्थित माउंट विन्सन हा तिचा शेवटचा पडाव आहे.
 

 

 


View this post on Instagram


 

 

take you wonder by wonder 🧚‍♂️


A post shared by Alia 🌸 (@aliaabhatt) on
ही भूमिका करण्यासाठी आलियाला वजन वाढवावं लागणार आहे. या चित्रपटासाठी आलियाला दिव्यांग व्यक्तीसोबत खास ट्रेनिंगही घ्यावं लागणार आहे. या चित्रपटाच्या शूटींगला लखनौमध्ये सुरूवात करण्यात येणार आहे.


हेही वाचा -


‘माझं लग्न झालं आहे’ म्हणाली आलिया भट


आलिया-रणबीरच्या नात्यात ‘का रे दुरावा?’,पाहा पुरावा


आलिया भट ही करण जोहरच्या हातातील बाहुली - कंगना राणौत