आलियाच्या घरचे संपले सामान, सोनी राजदानने मांडली मुख्यमंत्र्यापुढे व्यथा

आलियाच्या घरचे संपले सामान, सोनी राजदानने मांडली मुख्यमंत्र्यापुढे व्यथा

लॉकडाऊनमध्ये सगळीकडेच दुकांनावर कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. गरजेच्या वस्तू वगळता इतर कोणतीही दुकाने या काळात सुरु ठेवण्यास मज्जाव करण्यात आला आहे. मुंबईतील काही ठिकाणं कोरोनामुळे Hot spot  म्हणून घोषित करण्यात आली आहेत. त्यामुळेच अनेक ठिकाणी भाजी आणि किराणा मालाची दुकानं काही काळासाठी बंद करण्यात आली आहे. सगळ्यांनाच याचा सामना करावा लागतोय. आता यामध्ये सेलिब्रिटीही मागे नाहीत. नुकतेच सोनी राजदानने एक ट्विट करत सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे. सर्वसामान्यांप्रमाणे त्यांच्या घरचेही सामान संपले आहे आणि त्यांच्यावर उपासमारीची वेळ येण्याची भीती त्यांना वाटत आहे. 

लॉकडाऊनमध्ये ‘यामिनी’ परत येतेय, मौनी रॉयचा पुन्हा एकदा 'नागिन'अंदाज

मुख्यमंत्र्यापुढे मांडली व्यथा

 सोनी राजदानने या संदर्भात एक ट्विट केले आहे. ती जुहू परिसरात राहात असून त्यांना त्यांच्या परिसरात कोणतेही सामान मिळत नाही. सगळी दुकानं 24 तास सुरु राहण्याचा दावा करुन सुद्धा आता थेट दुकान सोमवारी उघडणार असे दुकानदार सांगत आहेत. गर्दी टाळावी म्हणून दुकाने बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे खरा. पण अशामुळे दुकानांमध्ये आता जास्त गर्दी होण्याची भीती आहे. जुहू परिसरात भाजी धान्य आणि भाजीपाला मिळणे कधीच बंद झाले आहे असे का? असा प्रश्न आलियाच्या आईने चक्क मुख्यमंत्र्यांना विचारला आहे. त्यावर तिने  पुन्हा एकदा ट्विट करत आता आम्हाला ब्रेडसुद्धा मिळणार नाही का? आम्ही जगायचं कसं? असे ट्विट सोनी राजदान यांनी केले आहे. 

शाहरूख खानने मेडिकल स्टाफच्या सुरक्षेसाठी 25 हजार पीपीई किट्सची केली मदत

जुहू परिसरात कर्फ्यू सदृश्य वातावरण

दक्षिण मुंबईतील अनेक ठिकाणी कोरोनाचे रुग्ण आढळल्यामुळे काही परिसर सील करण्यात आले होते. यामध्ये जुहूचा भागही होता. अति दक्षता म्हणून हा निर्णय घेण्यात आला. इतकेच नाही. प्रत्येक वॉर्डाने social distancing पाळण्यासाठी दुकानांवर काही निर्बंध ठेवले आहे. आवश्यक वस्तूंचा पुरवठा हा रोजच्या रोज करण्याचा प्रयत्न केला जात आहे. इतकेच नाही तर अनेक शेतकऱ्यांनी थेट घरीच भाजीपाला पुरवठा करण्याचीही सोय केली आहे.

सौम्या टंडणनेही व्यक्त केली चिंता

सोनी राजदानच नाही तर टीव्ही अभिनेत्री सौम्या टंडनेसुद्धा हीच शंका उपस्थित केली होती. अनेक ठिकाणी आवश्यक वस्तूंची दुकाने बंद असल्यामुळे त्रास होत आहे.  लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सामान मिळणार नाही या भीतीने ते उगाचच दुकानं सुरु झाल्यानंतर दुकानांबाहेर गर्दी करतील. त्यामुळे आपले उद्दिष्ट्य पूर्ण होणार नाही. 

3 मे पर्यंत भारत बंद

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी लाईव्ह येऊन लॉकडाऊनचा कालावधी 30 एप्रिलपर्यंत करणार असे सांगितले होते. त्यामुळे सगळ्यांच्याच मनाची तयारी झाली होती. मंगळवारी मोदींनी लाईव्ह येत हा कालावधी 3 मे पर्यंत वाढवला याचे कारणही आहे. ते म्हणजे 1 मे कामगार दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानंतर शनिवार- रविवार असल्यामुळे सुट्टीचा फायदा घेत अधिक लोक घराबाहेर पडतील म्हणूनच हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पुढील काळात सगळे काही ठिक होईल अशी अपेक्षा आहे. 


आता राहिला प्रश्न सोनी राजदानचा तर त्यांना याचे उत्तर काय मिळेल हे जाणून घेण्यासाठी थोडे थांबावे लागेल.

 

लॉकडाऊनमध्ये चित्रिकरण करत असल्याचा सोनाक्षी सिन्हावर आरोप, दिले सडेतोड उत्तर