आलिया रणबीरसोबत नाही तर याच्यासोबत करणार व्हेलेंटाईन्स डे

आलिया रणबीरसोबत नाही तर याच्यासोबत करणार व्हेलेंटाईन्स डे

आलिया- रणबीरची प्यारवाली लव्हस्टोरी आता सगळ्यांना माहीत आहे. या नात्यात आतापर्यंत बरेच चढ- उतार आलेले पाहायला मिळाले आहे. काहीच दिवसांपूर्वी त्यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या चर्चा होत्या. आता आणखी काही चर्चांना व्हेलेंटाईन डे च्या निमित्ताने उधाण आले आहे. प्रेमाचा दिवस प्रेमाच्या व्यक्तिंसोबत साजरा केला जातो. आलियाला ज्यावेळी व्हेलेंटाईन डे कसा आणि कोणासोबत साजरा करणार असा विचारल्याबरोबर तिने जे उत्तर दिले त्याने अनेकांना धक्का बसला कारण तिने रणबीर कपूरचे नाव घेतले नाही. तर दुसऱ्याचे नाव घेत त्याच्यासोबत माझा व्हेलेंटाईन डे साजरा करणार असे म्हटले आहे. हा व्यक्ती आणखी कोणी नसून ‘ब्रम्हास्त्र’ चित्रपटाचा दिग्दर्शक अयान मुखर्जी आहे. आता विचारांना थोडा ब्रेक लावा. कारण आलिया आणि अयानचे असे काहीच नाही.


आलिया-रणबीरच्या नात्यात का रे दुरावा? 


 अयानसोबत म्हणून साजरा करणार व्हेलेंटाईन


रणबीरसोबतच्या नात्याची चर्चा सगळीकडे होत असली. त्यांच्या नात्याला कपूर आणि भट कुटुंबांची परवानगी आहे,या सगळ्या गॉसिपना उधाण आले असले तरी प्रत्यक्षात ही दोघं कधीच  या बाबत उघडपणे बोलत नाही. एका मुलाखतीदरम्यान आलियाला व्हेलेंटाईन डे बद्दल विचारले असता ती हसली आणि ती म्हणाली की, मी सध्या ब्रम्हास्त्र चित्रपटाच्या शुटींगमध्ये व्यग्र आहे. व्हेलेंटाईन्स डे च्या दिवशी मी सेटवरच असेन त्यामुळे माझा दिवस हा दिग्दर्शक अयानसोबतच जाणार आहे. पण सगळ्यांना हे माहीत आहे की, ब्रम्हास्त्र चित्रपटात आलियासोबत रणबीर कपूरही आहे. मिळालेल्या माहितीनुसार दोघेही शुटींगसाठी एकत्र असणार आहेत. पण व्हेलेंटाईन्स डेचा स्पेशल माणूस अयान मुखर्जी असे सांगून तिने वेळ मारुन नेली.


आलियासोबतच्या नात्यात होते अनेक चढ- उतार


ayan aliaa


'ब्रम्हास्त्र'मध्ये दिसणार एकत्र


‘ब्रम्हास्त्र’या चित्रपटाच्या निमित्ताने रणबीर कपूर आणि आलिया भट ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळए खऱ्या आयुष्यासोबत त्यांची ऑनस्क्रिन केमिस्ट्री कशी आहे ? हे पाहण्याची उत्सुकता अनेकांना आहे. ब्रम्हास्त्रच्या सेटवर आतापर्यंत त्यांना एकत्र पाहिले असले तरी ते सार्वजनिक ठिकाणी कधीही फारसे व्यक्त होताना दिसत नाही. त्यामुळे आता त्यांच्या या केमिस्ट्रीसाठी चित्रपटाच्या रिलीजची वाट पाहावी लागणार आहे.


२०१९मध्ये मोठ्या पड्द्यावर दिसणार अनेक नव्या जोड्या


कसा असणार आहे ब्रम्हास्त्र?


अयान मुखर्जी लिखित आणि दिग्दर्शित ब्रम्हास्त्र या चित्रपटात तगडी अशी स्टारकास्ट आहे. आलिया, रणबीर व्यतिरिक्त अमिताभ बच्चन,नागार्जुन,डिंपल कपाडिया, दिव्येंदू शर्मा, मौनी रॉय यांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत. महाभारताच्या काळावर आाधारित हा चित्रपट असून ब्रम्हास्त्र म्हणजेच असे शस्त्र जे सगळ्यात जास्त शक्तीशाली आहे. महाभारतात त्याचा उल्लेख आहे. हा चित्रपट २५ डिसेंबर २०१९ रोजी रिलीज होणार आहे असे म्हटले जात आहे. या चित्रपटाचे बजेट १५० कोटी असून करण जौहर या चित्रपटाचा निर्माता आहे.


amitabh ranbir


आलियाचा ‘गली बॉय’ लवकरच


'ब्रम्हास्त्र' हा चित्रपट बीग बजेट असला तरी सध्या आलियाचा आणखी एक चित्रपट फ्लोअरवर येण्यासाठी सज्ज झा आहे तो म्हणजे ‘गली बॉय’. रणवीर सिंहसोबत ती या चित्रपटात दिसणार असून एका सर्वसामान्य मुस्लिम मुलीची भूमिका तिने साकारली आहे. मुंबईतल्या झोपडपट्टीत वाढलेल्या रॅपरची ही खरी कहाणी आहे. झोया अख्तरचा हा चित्रपट असून येत्या व्हेलेंटाईन्स डेला हा चित्रपट रिलीज होणार आहे. त्यामुळे आलिया 'ब्रम्हास्त्र'च्या शूटसोबतच या चित्रपटाच्या प्रमोशनमध्येही व्यग्र आहे.


( फोटो सौजन्य-Instagram)