अळीमिळी गुपचिळीमधुन लहानांची मोठ्यांना कोपरखळी

अळीमिळी गुपचिळीमधुन लहानांची मोठ्यांना कोपरखळी

टेलिव्हिजनवर माध्यम नेहमीच लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच नेहमी भुरळ घालते. त्यामुळे यावर प्रेक्षकांच्या आवडीचे कार्यक्रम सादर करण्याचा प्रयत्न सुरू असतो. झी मराठी या वाहिनीवर लवकरच  प्रेक्षकांसाठी एक असा एक चॅट शो सुरू होणार आहे ज्यात कलाकार त्यांच्या मुलांसोबत हजर राहणार आहेत. या कार्यक्रमाचं नाव आहे ‘अळीमिळी गुपचिळी’. लहानांची मोठ्यांना कोपरखळी असलेला हा धमाल शो 17 जानेवारी पासून शुक्रवार आणि शनिवार सायंकाळी सादर होणार आहे. या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा सांभाळणार आहेत अभिनेता अतुल परचुरे यांच्याकडे  आहे. त्यामुळे हा कार्यक्रम नक्कीच लहानांपासून मोठ्यांपर्यंत मनोरंजन करणारा असेल. 

अळीमिळी गुपचिळीमध्ये नेमकं काय असेल

अळीमिळी गुपचिळी हा एक मनोरंजनात्मक कार्यक्रम आहे. प्रत्येक आईवडिलांना आपल्या मुलांचा सार्थ अभिमान असतोच पण कुठल्या क्षणी आपली मुलं भोळेपणाने आपली विकेट घेतील हे दिग्गज कलाकारांनाही सांगता येत नाही. कारण लहान मुलं जे मनात येईल ते बोलतात, आत एक बाहेर एक असं त्यांचं काहीच नसतं.ज्यामुळे बाहेरच्या लोकांसमोर किंवा पाहुण्यांसमोर ते कधी काय बोलून जातील याचा नेम नसतो. सेलिब्रेटीज हे जगासाठी लोकप्रिय कलाकार असले तरी त्यांच्या मुलांसाठी ते आई-वडीलच असतात. त्यामुळे  त्यांची मुलं त्यांची कशी विकेट घेतील हे या कार्यक्रमात पाहायला मिळेल. या कार्यक्रमात स्नेहलता वसईकर आणि अर्णव काळकुंद्री देखील असणार आहे. अतुल परचूरे पहिल्यांदाच या दोघांसोबत काम करत आहेत.  

या कार्यक्रमाबाबत अतुल परचुरेची प्रतिक्रिया

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अतुल परचुरे करत आहेत.पण त्यांच्या मुलांनी त्यांची कधी विकेट घेतली होती का हे प्रेक्षकांना नक्कीच जाणून घ्यायचं असेल. याबाबत अतुलने सांगितलं की, होम मिनिस्टर या कार्यक्रमाच्या चित्रीकरणादरम्यान माझी मुलगी आदेश बांदेकर यांना म्हणाली कि, माझे बाबा मला सांगतात होम मिनिस्टर सारखे कार्यक्रम बघत जाऊ नकोस. कोपरखळी म्हणण्यापेक्षा तिने मला तोंडावर उपडी पाडलं असं मी म्हणू शकतो. यासोबतच त्यांनी अळीमिळी गुपचिळीच्या चित्रीकरणाच्या दरम्यान खूपच मजेशीर किस्से घडतात. राहुल देशपांडे यांच्या सोबत एक एपिसोड टीम शूट करत होती. राहुलने सांगितलं की, माझ्या मुलीला सायकल चालवायची होती आणि ती इतकी इनोसंट आहे कि तिला चित्रीकरण होतंय याच भानच नव्हतं ती कॅमेरासमोरून सायकल चालवत होती. असे अनेक मजेशीर किस्से प्रेक्षक या कार्यक्रमात प्रेक्षकांना पाहता येणार आहेत. सहाजिकच लहान मुलांसाठी आणि पालकांसाठी एक मजेशीर शो यामधून पाहायला मिळणार आहे.  

 

फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम

हे ही वाचा -

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.

अधिक वाचा -

 दीपिकाला माझ्यासारख्या सल्लगाराची गरज- बाबा रामदेव

अग्गंबाई सासुबाई मालिकेत साजरी होणार शुभ्राची पहिली संक्रांत

अक्षय कुमार 25 वर्ष लहान अभिनेत्रीसोबत करणार रोमान्स