अखेर आज #DeepVeer म्हणजेच बॉलीवूडच्या बाजीराव मस्तानीचं मुंबईचं रिसेप्शनसुध्दा पार पाडलं.
मुंबईच्या ग्रॅंड हयात हॉटेलमधलं हे रिसेप्शन खास बॉलीवूड सेलेब्ससाठी ठेवण्यात आलं होतं. अपेक्षेप्रमाणे या रिसेप्शनला बॉलीवूडमधल्या दीपवीरच्या सर्व ओळखीच्या सेलेब्सनी हजेरी लावली. या लव्हबर्डसनी 3 रिसेप्शन (बंगळूरू, मुंबई आणि बॉलीवूड सेलेब्ससठी) आणि 1 रणवीरच्या कुटुंबियांनी नव्या सूनेसाठी मुंबईत दिलेली खास पार्टी अटेंड केली. तसंच शु्क्रवारी (30 नोव्हेंबर) खास मुंबईतील प्रसिद्ध सिद्धीविनायकाचं ही कुटुंबासमवेत दर्शन केलं.
इटलीतील लेक कोमो येथे मेेदी आणि लग्न
दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांनी 14 नोव्हेंबर आणि 15 नोव्हेंबरला इटलीतील लेक कोमो येथे अत्यंत खाजगीरित्या कोकणी आणि सिंधी पद्धतीने लग्न केलं. अगदी पारंपारिक पद्धतीने ही दोन्ही लग्न पार पडली. केळ्याच्या पानावर जेवण असो वा आनंद करज पद्धतीने सिंधी लग्न असो. या जोडप्याने भारतापासून दूर असूनही सर्व परंपरा आणि विधी पार पाडले. तसंच मेंदी आणि संगीतसुद्धा झाले.
View this post on Instagram
दीपवीरचं बंगळूरू रिसेप्शन
बंगळूरूच्या रिसेप्शन हे द लीली पॅलेस हॉटेल येथे ठेवण्यात आलं होतं. दीपवीरच्या जोडीने या रिसेप्शनसाठी पारंपारिक पोशाखाला पसंती दिल्याचं चित्र होतं. दीपिकाने अंगदी गॅलेरिआची साडी आणि सब्यसाचीने डिझाईन केलेली ज्वेलरी घातली होती तर रणवीरने रोहीत बालने डिझाईन केलेली कपडे घातले होते. रिसेप्शनला पदुकोण कुटुंबियांचे निकटवर्तीय, खेळ जगतातील काही खेळाडू आणि रणवीरचे काही मित्र अशी पाहूणेमंडळी बोलावण्यात आली होती. या रिसेप्शनसाठी खास दाक्षिण्यात्य मेन्यू ठेवण्यात आला होता. एवढंच नाहीतर ह्या रिसेप्शन ईको-फ्रेंडली कटलरीचा वापर करण्यात आला होता.
नणंदेने दिली दीपवीरसाठी खास पार्टी
मुंबईमध्ये राम-लीला दीपिका-रणवीरसाठी खास पार्टी आयोजित करण्यात आली होती. ही पार्टी रणवीरची बहीण रितीकाने दिली होती. या पार्टीत पारंपारिक लुकहून हटके बाजीराव-मस्तीनाचा वेगळाच अंदाज दिसला. पाहा हा त्यांचा डान्स करतानाचा व्हीडीओ -
View this post on Instagram
View this post on Instagram
भवनानी कुटुंबियांचं सूनेसाठी खास रिसेप्शन
नववधूच्या आगमनानंतर दीपिकाच्या सासरचे म्हणजेच भवनानी कुटुंबियांनी खास रिसेप्शन दिलं. ह्या पार्टीमध्ये पाहूण्यांना ब्लॅक अॅंड व्हाइट थीम देण्यात आली होती. त्यामुळे स्टेजवर अगदी बुद्धीबळाच्या पटासारखा भास होत होता.
या रिसेप्शनमध्ये दीपिकाच्या सासूबाईसुद्धा अगदी उठून दिसत होत्या.
सिद्धीविनायकाचं सहकुटुंब दर्शन
लग्नानंतर देवदर्शनाला प्रत्येक जोडपं जातं. या परंपरेला दीपवीरने ही परंपरा कायम ठेवत शुक्रवारी (30 नोव्हेंबर) मुंबईतील प्रसिद्ध सिद्धीविनायकाचं दर्शन घेतलं.
View this post on Instagram
आणि आज अखेर पार पडलं मोस्ट अवेटेड मुंबई रिसेप्शन ही पार पडलं ज्याला संपूर्ण बॉलीवूड ग्रॅंड हयात हॉटेलमध्ये अवतरलं होतं.
फोटो सौजन्य - Instagram
अगदी पाहात राहावेसे वाटतात ना ह्यांचे फोटोज. येत्या लग्नसराईत दीपवीरच्या लग्नाचा ट्रेंड नक्कीच फॉलो होईल, ह्यात शंका नाही.
फोटो सौजन्य - Instagram