कोण आहे जान्हवी मेहता

कोण आहे जान्हवी मेहता

नुकतंच शाहरूख खानची मुलगी सुहाना खानच्या गॅज्युएशन फेयरवेल पार्टीचे फोटो व्हायरल झाले होते. त्यानंतर आता जूही चावलाच्या मुलगी जान्हवी मेहताचे फोटो समोर आले आहेत. जूहीची मुलगी म्हणजे जान्हवी मेहता ही नेहमीच लाईमलाईटपासून दूर राहिली आहे. 

जान्हवीचा हा फोटो होत आहे व्हायरल

अभिनेत्री जूहीने मुलीच्या शाळेचे काही फोटोज तिच्या इन्स्टा अकाऊंटवर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये जान्हवी क्लासरूममध्ये बसलेली दिसत आहे. हे जान्हवीच्या फेयरवेलचे फोटो आहेत. जूहीने याबाबत लिहीलं आहे की, जान्हवी तिच्या फेयरवेल चॅपलच्या क्षणी. एकाच वेळी मला आनंद आणि दुःख दोन्ही होत आहे. तुमच्या माहितीसाठी जान्हवी मेहता आपली जूहीसोबत कोणत्याही इव्हेंटला जात नाही.

जान्हवीमध्ये दिसते जूहीची झलक

जूही चावलाने मुलीचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताच त्यावर फॅन्सचे रिस्पॉन्स यायला सुरूवात झाली. अनेक फॅन्सनी म्हटलं की, जान्हवीची स्माईल अगदी जूहीसारखी आहे. खरंतर अनेक मुलांच्यामध्ये बसलेल्या जान्हवीला ओळखणं सोपं नाही. त्यामुळे अनेकांनी तिला विचारलंही की, यातील जान्हवी कोणती?

जान्हवी आणि लाईमलाईट

अभिनेत्री जूही चावला हा बॉलीवूडमधली 90 च्या दशकातला लोकप्रिय चेहरा. पण तिची फॅमिली मात्र यापासून नेहमीच लांब राहिली. त्यामुळेच की काय एकीकडे बॉलीवूडच्या काही किड्सचे फोटो मीडियावर व्हायरल होत असताना इतके दिवस जूहीच्या मुलांची नावंही कोणाला माहीत नव्हती. लाईमलाईटपासून नेहमी दूर राहणाऱ्या जान्हवीला अॅक्टींग फिल्डमध्ये अजिबात रस नाही.

पण याआधीही जान्हवीची झलक दिसली होती ती आईपीएलच्या ऑक्शनदरम्यान. जेव्ही ती वडील जय मेहता आणि जूही चावला यांच्यासोबत दिसली होती. जूही चावला आणि जय मेहता हे शाहरुखसोबत कोलकाता नाइट राइडर्सचे को-ओनर्स आहेत.

जान्हवी आणि अर्जुन

जूही चावलाची दोन्ही मुलं जान्हवी आणि अर्जुन हे सोशल मीडियावरही खूपच कमी अ्ॅक्टीव्ह आहेत. पण जूही मात्र त्यांचे फोटोज कधी कधी सोशल मीडियावर शेअर करत असते. जान्हवीला अभिनयात रस नसला तरी तिला ज्युनियर धवन वरूण आणि दीपिका पदुकोण तिला आवडतात. 

हेही वाचा -

संजीवनी मालिका सतरा वर्षांनी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला

कार्तिक आर्यनने मिळवली अजून एक तगडी भूमिका

Video : जेव्हा रिटायरमेंट पार्टी सोडून एक्स गर्लफ्रेंडला सोडायला गेला युवराज