आजारी अवनीत कौरला भावाने हॉस्पिटलमध्ये दिलं ‘हे’ सरप्राईझ रक्षाबंधन गिफ्ट

आजारी अवनीत कौरला भावाने हॉस्पिटलमध्ये दिलं ‘हे’ सरप्राईझ रक्षाबंधन गिफ्ट

अवनीत कौर टेलिव्हिजन माध्यमातील एक क्यूट बाल कलाकार आहे. अल्लाउद्दीन मालिकेत ती सध्या काम करत आहे. मात्र काही दिवसांपासून प्रकृती अस्वास्थामुळे ती हॉस्पिटलमध्ये भरती आहे. याबाबत स्वतः अवनीतने तिच्या सोशल मीडियावरून माहिती दिली होती. अवनीत कौर सोशल मीडिया आणि टिक टॉकवर फारच अक्टिव्ह असते. त्यामुळे सोशल मीडियावर अनेक फॉलोवर आहेत. रक्षाबंधन भावा-बहीणींसाठी एक महत्त्वाचा सण आहे. नुकतच अवनीत कौरला तिच्या भावाने हॉस्पिटलमध्ये भेटून रक्षाबंधनचं गिफ्ट दिलं. ज्यामुळे अवनीत फारच आनंदी झाली आहे.

Instagram

अवनीतला काय दिलं तिच्या भावाने सरप्राईझ

रक्षाबंधनच्या आधीच अवनीतचा भाऊ जयजीत कौर तिला भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये आला. तो केवळ तिला भेटण्यासाठी आला नाही तर त्याने तिच्यासाठी रक्षाबंधनचं गिफ्टदेखील आणलं होतं. त्याचं येणं आणि रक्षाबंधन गिफ्ट आणणं ही गोष्ट अवनीतला सरप्राईझ करणारी होती. अवनीतच्या मते,  “ खरंतर नेहमी रक्षाबंधन जवळ येऊ लागताच जयजीतला फारच टेंशन येऊ लागतं. कारण या दिवशी त्याला मला हवं तसं गिफ्ट घेऊन द्यावं लागतं. मात्र यावर्षी त्याने कमालच केली. या वर्षी मी हॉस्पिटलमध्ये असल्यामुळे तो फारच हळवा झाला होता. ज्यामुळे त्याने माझ्यासाठी रक्षाबंधनच्या आधीच गिफ्ट आणलं एवढंच नाही तर मला आनंद व्हावा यासाठी त्याने चक्क हॉस्पिटलमध्ये येऊन मला हे गिफ्ट दिलं. त्याचं हे असं वागणं माझ्यासाठी नक्कीच आश्चर्यकारक होतं. त्याच्या अशा वागण्यामुळे मला प्रचंड आनंद झाला आहे. शिवाय यापेक्षा मोठं राखी गिफ्ट माझ्यासाठी असूच शकत नाही. त्याने मला आणलेली भेटवस्तूदेखील नक्कीच स्पेशल आहे. माझ्यासाठी त्याने एक सुंदर आणि नाजूक ब्रेसलेट आणलं आहे. जे मला  फारच आवडलं आहे. मात्र त्या भेटवस्तूपेक्षाही मला आजच्या दिवशी माझा भाऊ माझ्यासोबत होता हे फार आवडलं. एखाद्या बहीणीसाठी याहून मोठं गिफ्ट आणखी काय असू शकत.” 

अवनीत आणि जयजीत ही सख्खी भावंडे आहेत. मात्र अवनीतच्या मते तो तिच्या भावापेक्षा जास्त तिचा एक चांगला मित्र आहे. अवनीत एखाद्या बेस्ट फ्रेंडप्रमाणे तिच्या आयुष्यातील सर्व गोष्टी त्याच्यासोबत शेअर करत असते. 

Instagram

अवनीत कौर एक बालकलाकार

अवनीत कौरने एक बालकलाकार म्हणून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. डान्स इंडिया डान्सच्या या लहान मुलांच्या डान्स रिअॅलिटी शोमधून तिने या क्षेत्रात पाऊल ठेवलं.  छोट्या पडद्यावरील अनेक हिंदी मालिकांमध्ये अवनीतने काम केलं आहे. अवनीत आतापर्यंत चंद्रनंदिनी, ट्विस्ट वाला लव्ह, हमारी सिस्टर दिदी, सावित्री, मेरी माॅं अशा मालिकांमध्ये झळकली आहे. शिवाय मर्दानी, करीब करीब सिंगल हे हिंदी चित्रपट आणि बब्बर का टब्बर या वेबसिरिजमध्येही तिने काम केलं आहे. सध्या अवनीत अल्लाउद्दीन मालिकेत काम करत आहे. तिच्या अभिनय आणि सोशल मीडियावरील अॅक्टिव्हीटीजमुळे तिने तिचा स्वतःचा एक चाहता वर्ग निर्माण केला आहे. अवनीत सध्या आजारी असल्यामुळे ती लवकर बरी व्हावी अशी तिचे चाहते आशा करत आहेत. 

अधिक वाचा

स्वराज्यजननी जिजामाता मालिकेचा दिमाखदार सोहळा

Movie Review : अशक्य स्वप्न पूर्ण करण्याची कहाणी ‘मिशन मंगल’

भिनेत्री नेहा पेंडसेने जाहीर केला तिचा 'Reletionship Status'

फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम