अनंत अंबानी ही अडकणार लग्नाच्या बेडीत

अनंत अंबानी ही अडकणार लग्नाच्या बेडीत

#DeepVeer च्या लग्नाचे आणि रिसेप्शनचे फोटोज अजून मनसोक्त बघून ही झाले नाही. तोच #Nickyanka आणि ईशा अंबानीसह इतर लग्नसुध्दा लागोपाठ होत आहेत. या सगळ्यात अजून एका लग्नाच्या बातमीवर शिक्कामोर्तब झाल्याचंही दिसतंय.


46065149 342097986583400 7148554708607565824 n
#Nickyanka म्हणजेच प्रियांका चोप्रा आणि निक जोनसचं 1 डिसेंबर आणि 2 डिसेंबरला लग्न आहे. त्यांचं ख्रिश्चन आणि भारतीय पद्धतीने लग्न होणार असून हे लग्न जोधपूरच्या उमेद भवन पॅलेस येथे होणार आहे. सोशल मिडीयावर प्रियांका चोप्राच्या लग्नासाठी म्हणून पॅलेसचे रोषणाई केलेले खास फोटोज ही व्हायरल झाले आहेत.
 

 

 


View this post on Instagram


 

 

One word beautiful ❤️❤️❤️❤️❤️❤️ #priyankakishaadi 📸 @shinde_himanshu


A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on


या लग्नासाठी पाहुणे म्हणून खास मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचं काल (30 नोव्हेंबर)ला जोधपूर विमानतळावर आगमन झालं. यावेळी त्यांच्याबरोबर मुलगी ईशा अंबानी आणि मुलगा अनंत अंबानीसुद्धा होता. अंबानी कुटुंबिय जोधपूर विमानतळावर उतरताच पापाराझ्झींचे कॅमेराज जरा जास्तच चमकायला लागले. कारण अंबानींबरोबर होती ती अनंत अंबानीची मैत्रीण राधिका मर्चंट. ज्याचं लग्न ही येत्या वर्षात होऊ शकतं. पण याबद्दल अजून अधिकृत घोषणा अंबानी कुटुंबियांकडून करण्यात आली नाही. पण आता जोधपूर ट्रीपमुळे अनंत आणि राधिकाच्या लग्नावर शिक्कामोर्तब झालंय, असं वाटतंय. विमानतळावर अंबानीचं आगमन होताच फोटोज घेणं सुरू झालं. आपल्या होऊ घातलेल्या सूनेबाबत सासूबाई नीता अंबानी आत्तापासूनच फारच प्रोटेक्टीव्ह असल्याचं ही चित्र दिसलं. पाहा हा व्हीडीओ -
 

 

 


View this post on Instagram


 

 

The #ambani family arrive at Jodhpur airport for the big fat #priyankachoora #nickjonas wedding @viralbhayani


A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

#Nickyanka च्या प्री-वेडींग सेरेमनीसाठी अंबानीज खास पारंपारिक आणि कलरफुल कपड्यात आले होते. नीता अंबानी यांनी गुलाबी आणि पांढऱ्या रंगाचा लेहंगा घातला होता. तर लवकरच नववधू होणारी ईशा छान मल्टी कलर शराऱ्यामध्ये दिसली.


45339612 2205114293080021 6736043226043514880 n
2018 आणि 2019 हे वर्ष अंबानीच्या घरी अगदी लग्नसराईचं वर्ष म्हटलं तर हरकत नाही. सध्या अंबानींच्या घरी ईशा अंबानी आणि आनंद पिरामल यांच्या लग्नाची तयारी सुरू आहे. ईशाचं लग्न 12 डिसेंबरला होणार आहे. नुकतीच तिच्या लग्नाआधीच्या विधींना ही सुरूवात झाली आहे. तर 2018 मध्येच अंबानींचा मुलगा आकाश अंबानी आणि श्लोका मेहता यांचा ही साखरपुडा थाटामाटात पार पडला होता.


कोण आहे राधिका मर्चंट -


45826501 743586089352660 2967393643540774912 n


राधिका मर्चंट ही अॅकर हेल्थकेअरचे सीईओ आणि व्हाइस चेअरमन वीरेन मर्चंट यांची मुलगी आहे. ती आणि अनंत बऱ्याच काळापासून मित्र असून एकमेकांना पसंत करतात. राधिका मर्चंटने न्यूयॉर्क विद्यापीठातून शिक्षण घेतलं. त्यानंतर ती भारतात आली आणि तिने इस्प्रव्हा ह्या रिअल ईस्टेट फर्मसाठी काम केले. तिला वाचन, ट्रेकिंग आणि स्विमिंगची आवड असून तिला कॉफीही फारच आवडते.तर हे होतं अंबानींच्या होणाऱ्या सूनेबाबत पण आम्हाला ओढ लागली आहे की, #Nickyanka च्या लग्नाला अजून कोणकोण पाहूणे येणार आहेत. मग या सर्व घडामोडींच्या अपडेट्ससाठी वाचत राहा POPxo.


फोटो सौजन्य : Instagram