2018 सालातील सेलिब्रिटी लग्नांच्या धडाक्यानंतर 2019 सालात ही सेलिब्रिटी लग्नसराईला सुरूवात झाली आहे. मागच्याच आठवड्यात अभिनेत्री स्मिता पाटील यांचा मुलगा प्रतीक बब्बर आणि सान्या सागर यांचं लग्न झाल्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना (एमएनएस) अध्यक्ष राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे आणि फॅशन डिझाईनर मिताली बोरूडे हे मुंबईत विवाहबद्ध झाले.
पारंपारिक पद्धतीने पार पडला शाही विवाहसोहळा
रविवारी (27 जाने 2019) मुंबईतील सेंट रेजिस येथे खाजगीरित्या हा विवाह समारंभ पार पडला.
View this post on Instagram
बऱ्याच कालावधीनंतर ठाकरे कुटुंबात पार पडलेला हा विवाहसोहळा आहे. या विवाहसोहळ्याला सर्व ठाकरे कुटुंबियही आवर्जून उपस्थित होते. लग्नासाठी अमित-मिताली यांनी पारंपारिक मराठमोळी वेशभूषा केली होती. या लग्नसोहळ्यात मितालीने केलेली एंट्री ही एकदम शाही होती.
View this post on Instagram
अमित-मितालीच्या रिसेप्शनला सेलिब्रिटीजची मांदियाळी
विवाहानंतर लगेचच बॉलीवूड सेलेब्स आणि राजकीय नेत्यांच्या उपस्थितीत अमित आणि मितालीचं रिसेप्शनही पार पडलं.
या ग्रँड रिसेप्शनसाठी अमितने टक्सीडो घातला होता तर मितालीने लाल आणि गुलाबी रंगाचा लेहंगा घातला होता.
View this post on Instagram
या रिसेप्शनला उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी, अभिनेते अमिताभ बच्चन, क्रिकेटपटू सचिन आणि बायको अंजली तेंडुलकर, शाहरूख खान , सलमान खान, माधुरी दीक्षीत, इतर बॉलीवूड सेलेब्स आणि मराठी सेलेब्सनीही आवर्जून उपस्थिती लावली.
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
का झाला होता 11 डिसेंबरला अमित आणि मितालीचा साखरपुडा
अमित ठाकरे आणि मिताली बोरूडे यांचा साखरपुडा 11 डिसेंबर 2017 ला झाला होता. हे दोघंही बऱ्याच काळापासून एकमेकांना डेट करत होते. त्यांचा साखरपुडाही राज ठाकरे यांच्या निवासस्थानी कृष्णकुंज येथे पार पडला होता. 11 डिसेंबर ही साखरपुड्याची तारीख निवडण्यात आली कारण याच दिवशी राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांच्या लग्नाचा वाढदिवस असतो.
अमित-मितालीची लव्हस्टोरी
अमित ठाकरे कॉमर्स ग्रॅज्युएट असून मिताली बोरूडे ही फॅशन डिझाईनर आहे. मितालीने अमितची बहीण उर्वशी ठाकरेसोबत 'द रॅक' नामक लेबल सुरू केलं होतं. फॅशन डिझाईनर असलेली मितालीही प्रसिद्ध बाल चिकित्सक डॉक्टर संजय बोरूडे यांची मुलगी आहे. अमित स्वतः एक कार्टूनिस्ट असून त्याला फुटबॉलचीही आवड आहे.
फोटो सौजन्य - Instagram