बिग बीने सोशल मीडियावर विचारलं ‘कोडं’ अभिषेकने दिलं मजेशीर उत्तर

बिग बीने सोशल मीडियावर विचारलं ‘कोडं’ अभिषेकने दिलं मजेशीर उत्तर

सोशल मीडियावर अॅक्टिव्हर राहण्यासाठी कलाकार नेहमीच वेगवेगळ्या युक्त्या लढवत असतात. या स्पर्धेत महानायक अमिताभ बच्चनदेखील मुळीच मागे नाहीत. ते त्यांच्या बिझी शेड्यूल मधून वेळ काढून सोशल मीडियावर काही पोस्ट शेअर करत असतात. नुकतंच अमिताभ बच्चन यांनी एक मजेशीर पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. बिग बीने त्यांच्या ट्विटर अंकाऊंटवरून एक कोडं त्यांच्या चाहत्यांसाठी शेअर केलं आहे. ज्या कोड्याला त्यांच्या मुलगा अभिषेकने एक मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे. अभिषेकप्रमाणेच इतर अनेक बॉलीवूड कलाकारांनी या कोडयावर प्रतिक्रिया दिल्या आहे. बिग बींनी विचारलेल्या या कोड्याचं उत्तर तुम्हाला माहीत आहे का 

अमिताभ बच्चन यांनी काय घातलं आहे कोडं

अमिताभ बच्चन सतत सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात. नुकतंच त्यांनी  एक कोडं सोशल मीडियावरून शेअर केलं आहे. ज्यात त्यांनी लिहीलं आहे की, ' I am the beginning of everything, the end of everywhere. I'm the beginning of eternity, the end of time & space. What I am?'

बिग बीच्या या प्रश्नावर अभिषेक बच्चनने मात्र अगदी मजेशीर उत्तर दिलं आहे. अभिषेकने प्रतिक्रिया दिली आहे की, "या प्रश्नाचं उत्तर तुम्ही तुमच्या नातीलाच विचारा". विश्वसुंदरी मानुषी छिल्लरने लिहीलं आहे की, " अशी कोडी मला फारच उत्साहित करतात.अशा रितीने मी हे कोडं सोडवणारी दुसरी व्यक्ती आहे" अभिनेत्री परिणिती चोप्राने उत्तर दिलं आहे की, याचं उत्तर E असं आहे आणि मला अशी कोडी सोडवायला फार आवडतं. बिग बीने विचारलेल्या या कोड्यवर त्यांच्या चाहत्यांनी 'ई' असंच उत्तर दिला आहे. ज्यावर अमिताभ बच्चन यांनी "हा हा हा शाब्बास... योग्य उत्तर" अशी प्रतिक्रिया दिली आहे. 

अभिताभ बच्चन यांचा या वयातील कामाचा उत्साह

अमिताभ बच्चन सध्या त्यांच्या चार चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. अमिताभ बच्चन यांची चेहरे, ब्रम्हास्त्र, झुंड आणि गुलाबो-सिताबो या चार चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका असणार आहे. या वयातही त्यांचा काम करण्याचा उत्साह अवर्णनिय आहे. त्यांच्या या चारही चित्रपटांचे शूटिंग पूर्ण झाले असून लवकरच हे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. त्यामुळे एकाच वेळी या चार चित्रपटांमधून अमिताभ बच्चन त्यांच्या चाहत्यांच्या भेटीला येत आहेत.  चेहरेमध्ये बिग बी सोबत इम्रान हाश्मी प्रमुख भूमिकेत असणार आहे. ब्रम्हास्त्रमध्ये बिग बीसोबत रणबीर कपूर आणि आलिया भट ही जोडी असणार आहे. गुलाबो - सिताबोमध्ये ते आयुषमान खुरानासोबत काम करत आहेत. तर त्यांचा झुंड हा चित्रपट फुटबॉल या खेळावर आधारित आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सैराटफेम नागराज मंजुळे करत आहे. या चारही चित्रपटांमधून अमिताभ बच्चन सर्व तरूण कलाकारांसोबत काम करत आहेत.

 

 

फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम

हे ही वाचा -

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.

अधिक वाचा -

डान्सर मेलविन लुईससोबत सना खानने या कारणामुळे केलं ब्रेकअप

स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेला निरोप देताना कलाकार झाले भावूक

मोठ्या पडद्यावर पहिल्यांदाच झळकणार ही बापलेकाची जोडी