अमिताभ बच्चन यांनी अचानक का बदलला आहे स्वतःचा स्वभाव

अमिताभ बच्चन यांनी अचानक का बदलला आहे स्वतःचा स्वभाव

महानायक म्हणून अमिताभ बच्चन यांनी गेली अनेक दशकं बॉलीवूडमध्ये अधिराज्य गाजवलं. आता बिग बी 77 वर्षांचे झाले आहेत. मात्र या वयातही तरूणांना लाजवेल अशा उत्साहात ते काम  करत आहेत. एवढंच नाही तर इतर तरूण कलाकारांप्रमाणे ते सोशल मीडियावरही तितकेच सक्रिय आहेत. शूटिंगमधून जेव्हा जेव्हा त्यांना वेळ मिळतो तेव्हा ते सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत असतात. अमिताभ बच्चन यांचे चाहते अनेक आहेत. सोशल मीडियावरही त्यांना लाखो चाहते फॉलो करत असतात. मात्र नुकतीच  बिग बी यांनी सोशल मीडियावर अशी एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामुळे अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांना धक्काच बसला आहे. 

अभिताभ बच्चन काय केलं आहे ट्विट

अमिताभ यांनी त्यांच्या ट्विटर अकांऊंटवर एक फोटो आणि कॅप्शन शेअर केली आहे. ज्यावरून अमिताभ बच्चन यांचा स्वभाव अचानक बदलला आहे असं वाटत आहे. या फोटोमध्ये अमिताभ बच्चन रागावलेले दिसत आहेत. अमिताभ बच्चन यांची  प्रतिमाच मुळात अॅंग्री यंग मॅन अशी होती. त्यामुळे या रागावलेल्या मुद्रेतही ते तितकेच रूबाबदार वाटतात. मात्र या फोटोसोबत त्यांनी एक कॅप्शन शेअर केली आहे. ज्याची चर्चा सोशल मीडियावर सर्वत्र सुरू आहे. अमिताभ बच्चन यांनी हे फोटोसेशन डब्बू रत्नानी यांनी यांच्या अल्बमसाठी केलं आहे. शिवाय फोटोसोबत त्यांनी ट्विट केलं आहे की, " मिजाज में थोडी सक्ती जरूरी है जनाब, लोग पीकर खाली कर देते अगर समंदर खारा ना होता " यावरून कधी कधी स्वभावात थोडासा बदल करणं गरजेचं आहे असं त्यांना सांगायचं आहे. आणखी एका ट्विटमध्ये त्यांनी शेअर केलं आहे की, " कभी कभार, हमार इम्पिहान,  हमारी कमजोरीयों को दिखाने के लिए नही लिया जाता, वो लिया जाता है, हमारी ताकत को दिखाने के लिए " या पोस्टवरून तुम्हाला नक्कीच अमिताभ बच्चन यांच्या विचार आणि स्वभावात बदल झाल्याचं जाणवत आहे.सोशल मीडियावर अमिताभ बच्चन सतत काही काहिना पोस्ट शेअर करत असतात. होळीच्या दिवशीदेखील त्यांनी त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देणारी पोस्ट शेअर केली होती. 

महानायक दिसणार या मराठी चित्रपटात

अमिताभ बच्चन तब्बल 25 वर्षांनंतर मराठी चित्रपटात एंट्री करत आहेत. 25 वर्षापूर्वी अमिताभ बच्चन यांनी त्यांचे मेकअप आर्टीस्ट दीपक सावंत यांची निर्मिती असलेल्या आणि श्रीधर जोशी यांचं दिग्दर्शन असलेल्या ‘आक्का’ (1994) या मराठी चित्रपटात काम केलं होतं. या चित्रपटात त्यांच्यासोबत जया बच्चन यांनीही काम केलं होतं. त्यानंतर आता तब्बल पंचवीस वर्षांनी बिग बी ’AB आणि CD’ या मराठी चित्रपटात दिसणार आहेत. मिलिंद लेले दिग्दर्शित ‘AB आणि CD’ या सिनेमात अमिताभ बच्चन, विक्रम गोखले, सुबोध भावे, सायली संजीव आणि अक्षय टंकसाळे यांच्या भूमिका आहेत. अमिताभ बच्चन यामध्ये कॅमिओ पण मुख्य पात्राचा रोल करणार आहेत. या चित्रपटात ते विक्रम गोखले यांच्या मित्राच्या भूमिकेत दिसतील. लवकरच ‘AB आणि CD’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. ज्यामुळे मराठी चित्रपटात महानायकाला पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे.

फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम

हे ही वाचा -

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.

अधिक वाचा -

KKK10: खतरों के खिलाडीमध्ये तेजस्वी, धर्मेश आणि करणचा जलवा

स्वातंत्र्यवीर सावरकरांची यशोगाथा सांगणार नाटक ‘वीर’

या कारणासाठी करिना कपूरचा राग झाला अनावर, व्हिडिओ झाला व्हायरल