शरीर साथ देत नाही, आता निवृत्त झालं पाहिजे… बिग बींचा भावनिक ब्लॉग

शरीर साथ देत नाही, आता निवृत्त झालं पाहिजे… बिग बींचा भावनिक ब्लॉग

गेल्या 50 वर्षांपासून बॉलिवूड आणि सिनेचाहत्यांचा हृदयावर अधिराज्य गाजवणारे महानायक अमिताभ बच्चन यांनी निवृत्ती घेण्याचे संकेत दिले आहेत. 'वाढतं वय शरीराला सहकार्य करत नाही, त्यामुळे निवृत्त होण्याचा विचार करत आहे', अशा भावना बिग बींनी आपल्या ब्लॉगमधून व्यक्त केल्या आहेत. अमिताभ बच्चन बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित ‘ब्रह्मास्त्र’ सिनेमाची शुटिंग करण्यासाठी गुरुवारी (28 नोव्हेंबर) सकाळीच मनालीमध्ये पोहोचले होते. मनालीमधील शुटिंग लोकेशनवर पोहोचण्यासाठी त्यांना तब्बल 12 तासांचा प्रवास करावा लागला. या प्रवासासंदर्भातील माहिती त्यांनी आपल्या ब्लॉगद्वारे चाहत्यांसमोर मांडली. शिवाय, इथल्या निसर्गाचं आणि स्थानिकांचंही प्रचंड कौतुक केलं आहे. ‘मनालीतील लोक अतिशय साधी आणि प्रामाणिक आहेत, आपण कधीही त्यांची बरोबरी करू शकत नाही’,असं बिग बींनी आपल्या ब्लॉगमध्ये नमूद केलं आहे.

‘आता मला निवृत्त झाले पाहिजे...’

बिग बींच्या ब्लॉगमधील पुढील संदेश अतिशय भावनिक आहे. ‘पुन्हा एकदा नवीन जागा, नव्या खोलीत स्वतःला सामावून घ्यायचं आहे. आता मला निवृत्त झाले पाहिजे. मेंदू आणि हाताची बोटं परस्परविरोधी काम करत आहेत, हा एक संदेश आहे’,असा आशयाचा ब्लॉग बिग बींना लिहिला आहे. दरम्यान, हा एक मेसेज असल्याचं अमिताभ बच्चन यांनी पोस्टच्या शेवटी म्हटलं आहे. पण बॉलिवूडमध्ये अमिताभ बच्चन यांच्या या ब्लॉगकडे गांभीर्यानं पाहिलं जात आहे. मीडिया इंडस्ट्रीमध्ये अमिताभ बच्चन यांच्या निवृत्तीसंदर्भात निरनिराळ्या प्रकारची चर्चा सुरू झाली आहे. त्यांच्या प्रकृती स्वास्थासंदर्भातही चिंता व्यक्ती केली जात आहे.

वाचा अमिताभ बच्चन यांचा भावनिक ब्लॉग :

https://srbachchan.tumblr.com/

 

बिग बींवर सुरू होते औषधोपचार

काही दिवसांपूर्वी अमिताभ बच्चन यांना चार दिवसांसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. 1983साली झळकलेल्या 'कुली' सिनेमाच्या शुटिंगदरम्यान झालेली दुखापत आणि वारंवार उद्भवणाऱ्या आरोग्याच्या समस्यांमुळे अमिताभ बच्चन त्रासल्याची माहिती समोर आली आहे. 

(वाचा : सनी लियोनीचा बोल्ड अवतार, व्हिडीओ पाहून चाहत्यांना लागलं वेड)

ब्रह्मास्त्रच्या शुटिंगमध्ये व्यस्त

सध्या अमिताभ बच्चन अयान मुखर्जीच्या 'ब्रह्मास्त्र' सिनेमाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहेत. या सिनेमात रणबीर कपूर आणि आलिया भट यांच्या मुख्य भूमिका आहेत. तर दुसरीकडे आयुष्मान खुरानासोबत असलेल्या ‘गुलाबो सिताबो’ सिनेमाचंही शुटिंग ते करत आहेत.  याव्यतिरिक्त त्यांच्याकडे 'झुंड' सिनेमादेखील आहे. या सिनेमाच्या शुटिंगचं वेळापत्रकही व्यस्त असल्याचं म्हटलं जात आहे.  

(वाचा : ‘थलायवी’चा फर्स्ट लुक रिलीज, कंगना रणौत सोशल मीडियावर ट्रोल)

नव्या कलाकारांसाठी प्रेरणास्त्रोत

सिनेसृष्टीत 'अँग्री यंग मॅन' अशी ओळख असणारे अमिताभ बच्चन यांनी बॉलिवूडला कित्येक सुपरहिट सिनेम्यांसहीत बरंच काही दिलं आहे. कित्येक नवोदित कलाकार त्यांना आपले गॉडफादर मानतात. त्यांच्यासाठी ते प्रेरणास्त्रोत आहेत. प्रामाणिकपणे आणि कष्ट करून यश कसं मिळवलं जातं, याचं जिवंत उदाहरण म्हणून अमिताभ बच्चन. या महानायकानं प्रकृती अस्वास्थ्यामुळे अभिनयापासून आराम घेण्याचा निर्णय घेतला तर बॉलिवूड आणि चाहत्यांसाठी एक मोठी धक्कादायक बातमी असेल. 

(वाचा :VERY HOT ! अभिनेत्रीचा बाथटबमधला टॉपलेस फोटो व्हायरल)

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.