शोले चित्रपटाच्या सेटवर गब्बर सिंह म्हणजेच अमजद खान प्यायचे इतका चहा

शोले चित्रपटाच्या सेटवर गब्बर सिंह म्हणजेच अमजद खान प्यायचे इतका चहा

प्रत्येक चित्रपटाच्या सेटवर काहीना काही गमती जमती घडत असतात. शूटिंगदरम्यान काम करता करता अनेकांची चांगली मैत्रीही होते आणि काहींमध्ये कायमच वितुष्टही निर्माण होते. प्रत्येक चित्रपटाच्या काही आठवणी असतात आणि त्यामध्ये काम केलेल्या कलाकारांच्याही. आता ‘शोले’ या सुपरहिट चित्रपटाचे उदाहरण घ्या ना. या चित्रपटाने त्यावेळी अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले. या चित्रपटातील जय-वीरु-बसंतीसोबतच गब्बरची भूमिका करणारे अमजद खानही चांगलेच प्रसिद्ध झाले. त्यांना गब्बर म्हणून मिळालेली ओळख त्यांच्या शेवटापर्यंत त्यांच्यासोबत होती. आज आम्ही अमजद खान यांच्याबद्दलच्या काही खास गोष्टी शेअर करणार आहोत. 

बॉलीवूड कलाकार जे रिअल लाईफमध्येही आहेत 'बेस्ट फ्रेंड'

सेटवर चक्क प्यायचे चहा

Instagram

कित्येकांचा चहा हे आवडते पेय आहे. अनेकांच्या दिवसाची सुरुवात ही चहाने होते आणि दिवसाचा शेवटही चहा पिऊनच होतो. चहाचे हे व्यसन काही कलाकारांनाही आहे. अभिनेते अमजद खान यांच्याबद्दलही अशीच एक गोष्ट सांगितली जाते. शोले चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अमजद खान दिवसाला तब्बल 30 कप चहा प्यायचे. त्यांची ही सवय अनेकांना माहीत होते. ते चहाचे शौकीन होते. पण त्यांची ही सवय अनेकांसाठी धक्कादायक होती. 

अमजद खान यांना मिळाली ओळख

Instagram

अमजद खान यांनी अनेक चित्रपटांमधून काम केली आहेत. पण गब्बर या भूमिकेने त्यांना चांगलीच ओळख मिळवून दिली. शोले चित्रपटातील डायलॉग इतके प्रसिद्ध होते की, आजही अनेक डायलॉग प्रसिद्ध आहेत. ‘अरे ओ सांबा कितने आदमी थे’, ‘अब तेरा क्या होगा कालिया?.. जो डर गया समझो मर गया’ असे डायलॉग आजही अनेकांच्या ओठांवर आहे. पण अमजद खान ही या रोलसाठी पहिली निवड नव्हती. या आधी हा रोल डॅनी यांना विचारण्यात आला होता. पण त्यांनी या रोलला नकार दिल्यानंतर रणजीत यांनाही या रोलसाठी विचारणा करण्यात आली. पण त्यांनीही काही कारणास्तव हा रोल नाकारल्यामुळे अमजद खान यांना या भूमिकेसाठी विचारणा करण्यात आली. हा रोल निवडल्यानंतर अमजद खान यांनी या भूमिकेला चांगलाच न्याय दिला आणि ही भूमिका अजरामर केली. 

अभिनेत्री राजश्री ठाकूरचा कमबॅक, तब्बल पाच वर्षांनी पुन्हा दिसणार छोट्या पडद्यावर

बालकलाकार म्हणून कामाला केली सुरुवात

अमजद खान यांची ओळखही बालकलाकार आहे. कारण  1951 साली आलेल्या ‘नाजनीन’ या चित्रपटात बालकलाकाराची भूमिका साकारली होती. त्यानंंतर त्यांना वेगवेगळ्या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. पण गब्बर सिंह या भूमिकेसाठी त्यांनी केलेली मेहनत ही इतकी होती की, त्या भूमिकेने त्यांना अजरामर केले. वयाच्या 51 व्या वर्षी त्यांना ह्रदयविकाराचा झटका आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. पण खलनायकाच्या भूमिकेत पाहिलेले अमजद खान कायम सगळ्यांच्याच लक्षात राहतील यात काहीच शंका नाही. 


अमजद खान यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने त्यांच्या या आठवणीला उजाळा मिळाला आहे. 

नायिका ज्यांनी खऱ्या आयुष्यात निवड केली 'खलनायकां'ची