अमृता झाली स्वीट सँटा

अमृता झाली स्वीट सँटा

मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री अमृता खानविलकर हीने ख्रिसमसच्या निमित्ताने सांताची आगळवेगळी भूमिका पार पाडली.  बच्चेकंपनीची आवडती अम्मूदीदी


amruta-khanvilkar-santa3


अमृताच्या चाहत्यावर्गामध्ये बच्चेकंपनीचाही समावेश आहे. अमृताही तिच्या बिझी शेड्यूलमधून वेळात वेळ काढून लहान मुलांमध्ये वावरताना दिसते. सोनी मराठीच्या 'सुपर डान्सर महाराष्ट्राचा' या रिएलिटी शॉमुळे तर ती बच्चेकंपनीची लाडकी 'अम्मू दीदी' झाली आहे.अमृताचं ख्रिसमस सेलिब्रेशन


बच्चेकंपनीच्या लाडक्या अम्मू दीदीने यंदा ख्रिसमस विशेष मुलांसोबत साजरा केला, ठाण्यातील जागृती पालक संस्थेच्या विशेष मुलांसोबत तिने नाताळ साजरा केला आणि अमृताने त्यांच्यासाठी खास भेटवस्तूही आणल्या होत्या.
 

 

 


View this post on Instagram


 

 

There has to be at least one day of the year to remind us that we are here for something besides ourselves - #merrychristmas #everyone What a pleasure it was to visit the JAGRUTI PALAK SANSTHA , thane yesterday. It is a home for more than 100 special kids where their own parents take part into teaching them, grooming them and taking care of them. Not a lot of parents of these kids can afford day today expenses but the place is blessed with some amazing people who not only welcome these kids but also their parents. I think we all celebrated the #truespiritofchristmas Which is to spread joy and happiness. Sometimes you got to experience it, because somethings can never be expressed in words. Thanks to my entire team of @thesocialhoot For this lovely celebration #merrychristmas #blessed #truespiritofchristmas #secretsanta


A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar) on
तिने या बच्चेकंपनीबरोबर भरपूर मज्जा मस्ती केली आणि खेळदेखील खेळले. मुलांनीही या तिच्याबरोबर ख्रिसमस पार्टीचा मनमुराद आनंद लुटला.बच्चेकंपनीने केलं अमृताचं खास स्वागत


amruta-santa-2


एरवी आपल्या नृत्याने इतरांना भुरळ पाडणाऱ्या अमृताच्या स्वागतासाठी जागृती पालक संस्थेतील विशेष मुलांनी खास नृत्य सादर  केली. या मुलांकडून मिळालेल्या अमाप प्रेमामुळे अमृता इमोशनल झाली. 'मी दरवर्षी वेगवेगळ्या एनजीओमधील लहान मुलांना जाऊन भेटते. त्यांचा सहवास मला आवडतो.  मात्र, इथे येऊन मी खरंच भरून पावले आहे. ही मुलं निरागस आणि भोळीभाबडी आहेत, त्यामुळे यांना इतरांहून वेगळे असे म्हणताच येणार नाही. या मुलांकडून मला जे काही प्रेम मिळालं आहे, ते न विसरण्याजोगं आहे.' अशा भावना तिने यावेळी व्यक्त केल्या.