'मलंग' मधील भूमिकेसाठी अमृतानं केलं तब्बल 12 किलो वजन कमी

'मलंग' मधील भूमिकेसाठी अमृतानं केलं तब्बल 12 किलो वजन कमी

अभिनेत्री अमृता खानविलकर मराठी चित्रपटसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. आतापर्यंत अमृताने अनेक मराठी चित्रपट, मालिका आणि रियालिटी शोमधून काम केलं आहे. मात्र आता लवकरच अमृता लवकरच "मलंग" या बहुचर्चित चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.  मोहित सुरी दिग्दर्शित "मलंग" या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा अभिनेता अनिल कपूर यांच्या उपस्थितीत नुकताच पार पडला. "मलंग" हा या नव्या वर्षातला एक बहुचर्चित चित्रपट असून अमृतासाठीही हा चित्रपट महत्त्वाचा आहे. 7 फेब्रुवारीला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटातील भूमिकेसाठी अमृतानं तब्बल 12 किलो वजन कमी केलं आहे. यासाठी अमृताने कठीण डाएट फॉलो केलं आहे. व्यायाम आणि आहारात विशेष बदल केलेले आहेत. तिच्या मते तिने यासाठी डेअरी प्रॉडक्ट आणि साखर पूर्णपणे बंद केली आहे. थोडक्यात मलंग चित्रपटातील भूमिकेसाठी अमृताने जवळजवळ आपलं फिटनेस रूटीनच बदललं आहे. 

अमृताचा करिअर ग्राफ

अमृताने आतापर्यंत अनेक निरनिराळ्या भूमिका साकारलेल्या आहेत. प्रत्येक भूमिकेसाठी अमृता नेहमीच मेहनत घेत असते. बॉक्स ऑफिसवर हिट ठरलेल्या मेघना गुलजार दिग्दर्शित आणि आलिया भटची प्रमुख भूमिका असलेल्या ‘राझी’ सिनेमात अमृताने ‘मुनिरा’ची भूमिका अतिशय सुंदर पद्धतीने साकारली होती. त्यानंतर अमृताने मिलाप झवेरी दिग्दर्शित ‘सत्यमेव जयते’ सिनेमात जॉन अब्राहम आणि मनोज बाजपेयी यांच्यासोबत स्क्रिन शेअर केली. ‘नटरंग’ आणि ‘कट्यार काळजात घुसली’ या सिनेमांतून संपूर्ण महाराष्ट्राचे प्रेम मिळवणारी ‘जिवलगा’ मालिकेत काव्या या भूमिकेतून तिने तिच्यामधील नकारात्मक भूमिका साकारण्याचं कसब पणाला लावलं. ही मालिका संपल्यावरही काव्या मात्र लोकांच्या मनात कायम राहीली. केवळ चित्रपटच नाही तर हिंदी टेलीव्हिजन आणि वेबसीरिजमध्ये देखील अमृताने उत्तम काम केलं आहे.  अशा प्रकारे आता अमृताला मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत जवळजवळ 18 वर्षे झाली आहेत. आता मलंगमध्ये तिची काय भूमिका आहे आणि त्यातून तिच्या अभिनयाचा कोणता पैलू समोर येणार हे लवकच समजेल.

View this post on Instagram

#phoenix #amuinamrika

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar) on

कोणकोण असणार मलंगमध्ये

मलंग चित्रपटात आदित्य रॉय कपूर, दिशा पटाणी  यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. अनिल कपूर आणि  कुणाल खेमू यांचीही एक झलक या ट्रेलर मध्ये आहे. चित्रपटाचा ट्रेलर अतिशय लक्षवेधी आहे. आता या चित्रपटात अमृताच्या वाट्याला काय भूमिका आली आहे, हे लवकरच कळेल. अमृता तिच्या नेहमीच्या शैलीत या चित्रपटात नक्कीच भाव खाऊन जाईल यात शंका नाही. या भूमिकेसाठी तिने एवढं वजन का कमी केलं आहे हे पाहणं आता प्रेक्षकांसाठी नक्कीच उत्सुकतेचं असेल.  

फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम

हे ही वाचा -

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.

अधिक वाचा -

तैमूर अली खान ते पलक तिवारीपर्यंत लाईमलाईटमध्ये होते हे स्टार किड्स

सुश्मिताच्या डान्स व्हिडिओने चाहते झाले घायाळ

बधाई हो! कुस्तीपटू गीता फोगटच्या घरी आला नवा पाहुणा