जिवलगा आणि खतरों के खिलाडीनंतर बॉलिवूड सिनेमात दिसणार अमृता खानविलकर

जिवलगा आणि खतरों के खिलाडीनंतर बॉलिवूड सिनेमात दिसणार अमृता खानविलकर

अभिनयात उत्तम, डान्समध्ये कमाल आणि सोशल मीडियावर सुपर एक्टिव्ह अशी मराठमोळी अभिनेत्री कोण असं जर विचारलं तर क्षणात अनेकांचं अचूक उत्तर असेल ‘अमृता खानविलकर’. मराठी इंडस्ट्रीमध्ये अमृताचं नाव जितकं चर्चेत असतं. तितकीच तिच्या नावाची चर्चा बॉलिवूडमध्ये देखील होत असते. अगदी नुकत्याच तिने भाग घेतलेल्या खतरों के खिलाडी या रिएलिटी शो च्या निमित्तानेही तिची चर्चा सुरू होती. एवढंच नाहीतर तिने केलेली मराठी मालिका जिवलगा हीसुद्धा प्रेक्षकांना खूप आवडली होती. 

अमृताची अजून एक भरारी

चित्रपटांच्याबाबतीत बोलायचं झाल्यास अमृताने साकारलेल्या प्रत्येक भूमिका आणि तिचे डायलॉग्स तिच्या चाहत्यांना अगदी तोंडपाठ असतात. आता यामध्येच नव्याने भर पडणार आहे. कारण अमृताचा नवीन सिनेमा लवकरच येतोय. तोही हिंदी सिनेमा. हो...अमृताचा अजून एक हिंदी सिनेमा येतोय. त्यामुळे आपल्याला ‘राझी’ आणि ‘सत्यमेव जयते’ नंतर अमृताला पुन्हा एकदा हिंदी सिनेमात पाहायला मिळणार आहे.  

चांगली टीम आणि चांगला चित्रपट

विशेष म्हणजे हा सिनेमा मोहित सुरी दिग्दर्शित करणार असून याचं नाव आहे ‘मलंग’. या सिनेमातील स्टार कास्टही तगडी आहे. ज्यामध्ये आदित्य रॉय कपूर, दिशा पटानी, अनिल कपूर आणि कुणाल खेमू यांच्यासोबत अमृता खानविलकर स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात झाली असून अमृताची ‘मलंग’ झलक पाहण्यासाठी अनेकजण उत्सुक असतील यात शंका नाही. या चित्रपटासाठी अमृताने तब्बल 12 किलो वजन कमी केल्याचंही कळतंय.

मराठीसह हिंदीतही अमृताचं नाव

मराठीसह हिंदी सिनेमांत देखील अमृताने तितक्याच ताकदीने प्रत्येक भूमिका अगदी मनापासून आणि मेहनतीने पडद्यावर साकारल्या आहेत. केवळ सिनेमाच नाही तर हिंदी टेलीव्हिजन, वेबसीरिजसाठी देखील अमृताने उत्तम काम केलं आहे. आतापर्यंत केलेल्या कामाची पावती अमृताला वारंवार तिच्या चाहत्यांच्या प्रतिक्रियांवरुन मिळत आली आहे आणि यापुढेही मिळेलच हे नक्की.

POPxoMarathi च्या टीमकडून #BestOfLuck टू #AmrutaKhavilkar.

P.S : POPxo सादर करत आहे #POPxoEverydayBeauty - POPxo Shop's चं नवं कलेक्शन. त्वचा, केसांसाठी असलेली ही सौंदर्यप्रसाधने अतिशय परिणामकारक असून वापरण्यासाठी अगदी सोपी आहेत. शिवाय या सर्व उत्पादनांवर तुम्हाला 25% ची घवघवीत सुूटदेखील आहे. तुम्ही ही उत्पादने POPxo.com/beautyshop खरेदी करू शकता. तेव्हा POPxo Shop ची ही सौंदर्य उत्पादने खरेदी करा आणि तुमचं सौंदर्य आणखी खुलवा.