अमृता, स्वप्नील आणि सिद्धार्थ दिसणार मालिकेत, 'जिवलगा'लवकरच भेटीला

अमृता, स्वप्नील आणि सिद्धार्थ दिसणार मालिकेत, 'जिवलगा'लवकरच भेटीला

एकदा चित्रपटात गेलेले कलाकार पुन्हा मालिकांकडे वळून पाहात नाही, असे म्हणतात. पण हल्ली कलाकार अनेक नवे प्रयोग करुन पाहतात. सिनेमा, नाटक, मालिका, वेबसीरिज असे प्रयोग करुन पाहताना त्यांना फक्त प्रसिद्धी नको असते तर प्रेक्षकांची पोचपावती अपेक्षित असते त्यांनी साकारलेले पात्र लोकांच्या कायम लक्षात राहावे असे वाटत असेत. स्टार प्रवाहावरील एका नव्या मालिकेच्या निमित्ताने पुन्हा एकदा मोठ्या पड्याद्यावरील कलाकार मालिकेकडे वळले आहेत. अमृता खानविलकर, स्वप्नील जोशी आणि सिद्धार्थ चांदेकर हे ते कलाकार असून त्यांना घेऊन स्टार प्रवाह ‘जिवलगा’ ही मालिका घेऊन येत आहे. ८ एप्रिलपासून ही मालिका रात्री ८.३० वाजता सुरु होणार आहे. तेव्हा एका अनोख्या प्रेमकथेसाठी तयार व्हा.


पाहा कसौटी जिंदगीच्या सेटवर कशी साजरी झाली रंगपंचमी


ज्याच्यामुळे तुम्ही आहात ‘जिवलगा’


जिवलगा ही मालिका एक आगळी- वेगळी प्रेमकथा असल्याचा दावा स्टार प्रवाहने केला. 'जो डोळे बंद केल्यावरही दिसतो तो जिवलगा… ज्याच्यामुळे आपण आहोत, तो जिवलगा' अशा आशयाची ही प्रेमकथा आहे. मुंबईत या मालिकेच्या निमित्ताने या मालिकेतील स्टारकास्ट एकत्र आली होती. अमृता, स्वप्नील, सिद्धार्थ यांच्यासोबत आणखी एक चेहरा या मालिकेत आहे तो म्हणजे मधुरा देशपांडे. या कार्यक्रमादरम्यान या मालिकेचा एक टीझर ही प्रदर्शित करण्यात आला. या मालिकेची संकल्पना सतीश राजवाडे यांची आहे.तर या मालिकेतील कथा डॉ. चंद्रशेखर फणसळकरांच्या कथेतून प्रेरणा घेतलेली आहे.  मालिकेचा टीझर पाहून ही मालिका नक्कीच काहीतरी वेगळी असणार असे कळते.

Subscribe to POPxoTV

नातेसंबंधातील अनेक पैलू उलगडणार


जिवलगा ही नातेसंबंध उलगडणारी कथा आहे. यात नातेसंबधातील अनेक पैलू उलगडले जाणार आहेत.  मानवी स्वभाव, प्रगल्भता आणि विचार करण्याची पद्धत याची प्रत्येकाची एक शैली असते. ती या कथेतून समोर येणार आहे. बऱ्याचदा नाती समजून घेण्याची आणि त्यांचे मूल्यमापन करण्याची पद्धत चुकते. एखाद्या संबंधी असलेले आपले अंदाज चुकतात.या सगळ्यावरच ही मालिका प्रकाश टाकणार आहे.


madhura 1


स्वप्नीलचे कमबॅक


स्वप्नीलला खरी ओळख मिळवून दिली ती टीव्हीने. त्याने साकारलेला कृष्ण.. आजही कित्येकांच्या लक्षात आहे. तसा कृष्ण होणे नाही. पण प्रसिद्धीनंतर चित्रपटात गेलेला स्वप्नील पुन्हा मालिकेत येईल असे वाटले नव्हते. पण त्याने अनेक मालिका केल्या.मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये त्याने आपले वर्चस्व राखून धरले. पापडपोळ, सजन रे झूट मत बोलो, एका लग्नाची दुसरी गोष्ट अशा काही मालिका देखील त्याने केल्या. पण आता पुन्हा एकदा त्याने मालिकांमध्ये भल्या मोठ्या गॅपनंतर कमबॅक केले आहे, असे म्हणायला हवे.


swapnil 1


तब्बल नऊ वर्षानंतर करणार मालिका


सिद्धार्थ चांदेकरला तुम्ही पहिल्यांदा पाहिले असेल ते स्टार प्रवाहावरील ‘अग्नीहोत्र’ या मालिकेतून. ही मालिकाही सतीश राजवाडे यांची होती. या मालिकेमुळे सिद्धार्थला ओळख मिळाली. तब्बल ९ वर्षांनंतर पुन्हा एकदा सतीश राजवाडे यांच्या मालिकेमध्ये काम करण्याची संधी मिळाल्याचा आनंद सिद्धार्थने या कार्यक्रमात व्यक्त केला आहे. 


सिद्धार्थ- मितालीचा तो खास व्हिडिओ पाहिलात का?


siddharth 1


अमृता पहिल्यांदाच दिसणार मालिकेत


तर अमृता खानविलकरची मालिकेत काम करण्याची ही पहिलीच वेळ आहे. अमृताची 'डॅमेज' ही वेबसीरिज चांगलीच गाजली. त्यातील तिच्या अभिनयाचे कौतुक झाले. या शिवाय अनेक हिंदी चित्रपटांमध्येही तिने आपल्या कामांचा ठसा उमटवला आहे. आता मालिकेत ती कोणत्या रुपात पाहायला मिळणार याची उत्सुकता आहे.


amruta 1


(सौजन्य-Instagram)