Good News: बॉलीवूड अभिनेत्री आहे गरोदर, फोटो केला शेअर

Good News: बॉलीवूड अभिनेत्री आहे गरोदर, फोटो केला शेअर

बॉलीवूडमध्ये याआधी लग्नाआधी गरोदर राहून लग्न केल्याच्या घटना काही नव्या नाहीत. गेल्याच वर्षी नेहा धुपिया आणि अंगद बेदीनेही अगदी हश- हश अर्थात गरोदर असल्यामुळे घाईघाईत लग्न केलं होतं. आता अजून एक अशा अभिनेत्रीने स्वतःच गरोदर असल्याचे फोटो आपल्या चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत. बॉलीवूड नंतर दाक्षिणात्य चित्रपटामध्ये आपला एक दबदबा निर्माण करणारी अभिनेत्री एमी जॅक्सनने या वर्षाच्या सुरुवातीलाच साखरपुडा करून आपल्या चाहत्यांना धक्का दिला होता. तर आता तिने स्वतःच आपण गरोदर असल्याचे फोटोही शेअर केले आहेत. आपल्या प्रियकराबरोबर तिने हे फोटो काढले आहेत. यामध्ये तिचे बेबी बंप अगदी स्पष्ट दिसत आहेत.  


एमीने चाहत्यांबरोबर शेअर केला आनंद

एमीने आपल्या इन्स्टाग्रामवरील अकाऊंटवर फोटो पोस्ट करून आपला आनंद व्यक्त केला आहे. तिने म्हटलं आहे की, ‘मी इतकी आनंदी आहे की, मला जगातल्या सर्वात उंच ठिकाणी जाऊन अगदी बेंबीच्या देठापासून ओरडावं वाटत आहे. यापेक्षा चांगली वेळ असून शकत नाही. मी आता स्वतःवर जास्तच प्रेम करायला लागले आहे. जगामध्ये यापेक्षा जास्त पवित्र नातं दुसरं कोणतंच नाही. आम्ही तुला बघण्यासाठी अतिशय आतुर आहोत...आमच्या छोट्या बाळा’ आई होणं यासारखं दुसरं सुख नाही या जगात असं म्हटलं जातं आणि हाच अनुभव एमीनेदेखील आपल्या चाहत्यांबरोबर शेअर केला आहे. तिने पोस्ट केलेल्या या फोटोमधून तिचा आनंद नक्कीच कळू शकत आहे.


एमीने वर्षाच्या सुरुवातीलाच केला साखरपुडा
 

 

 


View this post on Instagram


 

 

Two Peas on Date Night #ENOBoheme


A post shared by Amy Jackson (@iamamyjackson) on
अभिनेत्री - मॉडेल असणाऱ्या एमीने या वर्षाच्या सुरुवातीला आपल्या बॉयफ्रेंडबरोबर साखरपुडा केल्याचा फोटो शेअर केला होता. एमीचं दाक्षिणात्य चित्रपटामध्ये खूप चांगलं नाव आहे. बॉलीवूडमध्ये तिने जास्त चित्रपट केले नसले तरीही तिचा चेहरा हा प्रेक्षकांसाठी नवा नाही. रजनीकांत आणि अक्षयकुमारबरोबरील चित्रपट 2.0 मध्येदेखील एमीची महत्त्वाची भूमिका होती. एमीचे खूप चाहते आहेत. त्यामुळे तिच्या चाहत्यांसाठी ही बातमी म्हणजे एक सुखद धक्का नक्कीच आहे. अर्थात एमीने अजून तिच्या बॉयफ्रेंडबरोबर लग्न केलं नसलं तरीही एमी मूळची भारतीय नाही. त्यामुळे असं नातं बाहेरच्या देशामध्ये साहजिकच स्वीकारलं जातं. सध्या ती आपल्या बॉयफ्रेंडबरोबर हे गरोदरपणाचे क्षण मजेत घालवत आहे.


बॉलीवूड अभिनेत्याला एमीने केलं आहे डेट


एमी जॅक्सनने काही वर्षांपूर्वी प्रतीक बब्बर या बॉलीवूड अभिनेत्याला डेट केलं आहे. पण त्याचं नातं दीर्घकाळ टिकू शकलं नाही. हे दोघंही लिव्ह इन मध्ये राहात होतं असं म्हटलं जातं. पण काही काळानंतर या दोघांनी आपला वेगळा मार्ग शोधला. प्रतीकनेही नुकतंच त्याची गर्लफ्रेंड सान्याबरोबर लग्न केलं असून एमीदेखील आपल्या आयुष्यात आनंदी आहे. एमीची तिचा बॉयफ्रेंड जॉर्जबरोबर पहिली भेट ही 2015 मध्ये एका कॉमन मित्रामार्फत लंडनमध्ये झाली. त्यानंतर दोघांची मैत्री झाली. जॉर्ज पानायियोटो रिअल स्टेट टायकून अँड्रियास पानायियोटोचा मुलगा आहे. जॉर्ज हा अब्जपती असून त्याचा स्वतःचा एक महागडा नाईट क्लब क्वीन सिटीदेखील आहे.


फोटो सौजन्य - Instagram


हेदेखील वाचा - 


'एक होती राजकन्या' मालिकेत आस्ताद काळे साकारणार पत्रकाराची भूमिका


रणबीर- आलियावर कंगना पुन्हा बरसली, साधला निशाणा


‘कुमकुम’ फेम जुही परमार मरणाच्या दारातून आली परत