बाळाला जन्म दिल्यानंतर आता 'या' अभिनेत्रीने केले हॉट फोटोशूट, फोटो व्हायरल

बाळाला जन्म दिल्यानंतर आता 'या' अभिनेत्रीने केले हॉट फोटोशूट, फोटो व्हायरल

बॉलीवूडमधील अनेक अभिनेत्री लग्न झाल्यावर अथवा बाळाला जन्म दिल्यानंतर वेगळ्या भूमिका स्वीकारणं पसंत करतात. करिना कपूर खान, काजोल अशा काही अभिनेत्रींचा अपवाद वगळता इतर अभिनेत्री तर कामही करणं बंद झाल्या आहेत. पण आता अजून एका अशा अभिनेत्रीने बाळाला जन्म देऊन एक वर्ष झाल्यानंतर आपल्या सौंदर्याचा जलवा दाखवला आहे. बाळाला जन्म दिल्यानंतरही अनेक वेळा ही अभिनेत्री आपल्या सोशल मीडियावर अॅक्टिव्ह होतीच. ही अभिनेत्री आहे एमी जॅक्सन. सध्या बाळाबरोबर रमलेली असूनही एमीने एक हॉट फोटो सेशन केले आहे. टॉपलेस अवतारात तिने काही आपले फोटो पोस्ट केले असून सध्या हे फोटो व्हायरल होत आहेत. मुळात बाळाला जन्म दिल्यानंतर तिने आपल्या आरोग्याकडे लक्ष देत पुन्हा एकदा आपली उत्तम फिगर मिळवली आहे हे या फोटोतून दिसून येत आहे.

या कारणामुळे अक्षय कुमार मुळीच जात नाही कोणत्याही सेलिब्रिटी पार्टीत

एमीचा हॉट लुक अंदाज

एमीने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर काही टॉपलेस फोटो शेअर केले आहेत.  हे फोटो पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे. कॅमेरासमोर अत्यंत बिनधास्त वावर असल्याचे दिसून येत आहे. स्मोकी आईज आणि न्यूड लिपस्टिकमधील हा हॉट लुक तिच्या चाहत्यांना खूपच भावला आहे. तसंच तिचे हे फोटो खूपच बोल्ड आहेत. एमीने यामध्ये बाऊन्सी केस केले असून तिच्या चेहऱ्याला ते खूपच शोभून दिसत आहेत. एमीने असा बोल्ड लुक पहिल्यांदाच केलेला नाही. मात्र आता बाळाला जन्म दिल्यानंतरही एमी अधिक सुंदर दिसत आहे. तिच्या या फोटोवर चाहत्यांनी अनेक कमेंट्स केल्या आहेत. तर तिने बरेच फोटो पोस्ट केले असून काही फोटोंमधील तिचा मेकअपही खूपच आकर्षक  आहे. एमीने बॉलीवूडमध्ये जास्त काम केले नसले तरीही तिने आपली ओळख दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये अधिक निर्माण केली आहे. पण तिच्या सौंदर्यामुळे आणि तिच्या सोशल मीडियावर असण्याने अनेक जण तिला फॉलो करतात.  तसंच एमी दिसायला अतिशय सुंदर असून तिला खूपच फॉलोअर्स आहेत. 

हिमाचलमध्ये मुलींसोबत सुट्टीचा आनंद घेत आहे रविना टंडन, शेअर केले फोटो

Beauty

Manish Malhotra 4 in 1 Eyeshadow Palette - Paparazzi

INR 1,250 AT MyGlamm

ग्लॅमरपासून सध्या दूर

एमीने एक दिवाना था या चित्रपटापासून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. हा चित्रपट खूपच गाजला होता. पण सध्या एमी ग्लॅमर वर्ल्डपासून दूर आहे. आपल्या कुटुंबासह एमी वेळ घालवत असून आपल्या मुलाला जास्तीत जास्त वेळ देत आहे. एमीने अक्षयकुमार आणि रजनीकांत यांच्यासह शेवटचा चित्रपट 2.0 केला होता. त्यानंतर तिने आपल्या पती आणि मुलांसह वेळ घालवणं योग्य समजलं. पण आता हे फोटो पाहिल्यानंतर एमी पुनरागमनासाठी तयार आहे का असा प्रश्न तिच्या चाहत्यांना नक्कीच पडला असेल. पण एमीने अजूनही आपले कोणतेही पुढचे प्रोजेक्ट जाहीर केलेले नाहीत. पण तिने लवकरच पुन्हा काम करावे अशीही तिच्या चाहत्यांची नक्कीच इच्छा आहे. त्यामुळे लवकरच एमीला पुन्हा एकदा चित्रपटांमधून पाहायला मिळेल अशी अपेक्षा तिचे चाहते करत आहेत आणि या फोटोमुळे त्यांनाही तशी आशा निर्माण झाली आहे हे नक्की. 

टीव्हीवर ठरले हिट, पण बॉलीवूडमध्ये अनफिट, कोण आहेत हे कलाकार जाणून घ्या

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक