नवीन रुपात येणार रंगीला… पोस्टरने आताच घातला सोशल मीडियावर धुमाकूळ

नवीन रुपात येणार रंगीला… पोस्टरने आताच घातला सोशल मीडियावर धुमाकूळ

र्मिला मातोंडकर म्हटली की, तिच्या फिल्मी कारकिर्दीतील ‘रंगीला’ चित्रपट आठवल्यापासून राहणार नाही. राम गोपाल वर्माचा हा चित्रपट एकेकाळी इतका गाजला होता की, कित्येक वर्षांपर्यंत या चित्रपटाची चर्चा सुरु होती. पण आता याच रंगीलाचा एक हॉट व्हर्जन असलेला चित्रपट राम गोपाल वर्मा घेऊन येत आहे. याचे एक पोस्टर राम गोपाल वर्मा यांनी शेअर केले आणि मग काय पाहता पाहता या चित्रपटाच्या पोस्टने सोशल मीडियावर धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे.

नवा चित्रपट पण थीम तीच?

आता राम गोपाल नेहमीच आणत असलेले चित्रपट थोडे हटके आणि वेगळे असतात. त्याहीपेक्षा त्यांची नावं ही वेगळी असतात. आता एकेकाळी गाजलेला ‘रंगीला’ हा चित्रपट आता Beautiful या नावाने परत येणार आहे. या चित्रपटाचा फर्स्ट लुक राम गोपाल वर्माने शेअर केला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अगस्त्य मंजू यांनी केले असून बी मंजू यांनी या चित्रपटासाठी फोटोशूट केले आहे. या पोस्टरवरील फोटोशूट पाहता हा चित्रपट एकदम हॉट असणार आहे यात काहीच शंका नाही.

शाहिदची बायको Mira Rajput पण करणार का बॉलीवूडमध्ये एंट्री?

पाहा व्हिडिओ

या चित्रपटाचा फोटो शेअर करताना एक व्हिडिओ देखील शेअर करण्यात आला आहे. या फोटोजनुसार या चित्रपटातील अभिनेत्री नयना गांगुली आणि पार्थ सुरी एका समुद्र किनाऱ्यावर असून त्यांचा रोमँटीक अंदाज यामध्ये पाहायला मिळत आहे. हाच रोमँटीक अंदाज सध्या अनेकांना सोशल मीडियावर अनेकांना घायाळ करत आहे.

प्रियांकालाही आई होण्याचे वेध... वाचा काय म्हणाली प्रियांका चोप्रा जोनस

लवकरच येणार ट्रेलर

आता हे फोटो पाहिल्यानंतर चित्रपटाच्या ट्रेलरची उत्सुकता वाढली आहे. पण या चित्रपटाच्या ट्रेलर आधी याचा टीझर 9 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित करण्यात येणार आहे. त्यानंतर हा चित्रपट किती जणांची उत्सुकता वाढवेल हे पाहावे लागेल. कारण राम गोपाल वर्मा यांचे चित्रपट दिसायला नेहमीच वेगळ वाटतात. पण त्यात विशेष असं कधीच काही नसतं. त्यांचे हल्ली आलेले चित्रपटच याची साक्ष आहेत. 

‘रंगीला’ म्हणून झाला हिट

Instagram

रंगीला 1945 साली रिलीज झाला होता. या चित्रपटात आमीर खान आणि उर्मिला मातोंडकर यांची जोडी दिसली होती. चाळीत राहणारा आमीर खान टपोरी असून तो त्याच्या शेजारी राहणाऱ्या उर्मिला मातोंडकरच्या प्रेमात पडतो. जॅकी श्रॉफ यांनी या चित्रपटात सुपरस्टारची भूमिका निभावली आहे. या चित्रपटाला ए आर रहमान यांनी संगीत दिले आहे. एका मिडलक्लास मुलीच्या स्वप्ननांची भरारी असे या चित्रपटाची कहाणी असून हा चित्रपट त्या काळात खूपच गाजला होता. या चित्रपटासोबत या चित्रपटातील गाणी अभिनय, कॅरेक्टर खूपच गाजली होती. रंगीलाने बॉक्स ऑफिसवर भरपूर कमाई केली होती.

 आता हा नवा चित्रपट त्यातही राम गोपाल वर्माचा चित्रपट काय धुमाकूळ घालणार ते पाहावे लागेल.

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.