अभिनेता आनंद इंगळे साकारणार 'सदानंद झगडे'

अभिनेता आनंद इंगळे साकारणार 'सदानंद झगडे'

मराठी अभिनेता आनंद इंगळेचे चाहते अनेक आहेत. त्याला विविध भूमिकेत पाहण्यासाठी चाहते नक्कीच उत्सुक आहेत. ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण या मराठी मालिकेत तो सदानंद झगडे नावाच्या वकिलाची व्यक्तिरेखा रेखाटत आहे. ऑस्ट्रेलियाहून आलेल्या नचिकेत देशपांडे नावाच्या शेजा-याला त्रास देण्यासाठी स्वभाषा आणि स्वदेशीचा आग्रह धरणारे आप्पा केतकर या झगडे वकिलांना घेऊन येतात. पण सदानंद झगडे अप्पांची बाजू घेणार, की नचिकेतची, ही धमाल चाहत्यांची उत्सुकता वाढवणारी आहे. स्वतः मराठी भाषेबाबत अतिशय आग्रही असलेल्या आनंद इंगळे यांना या मालिकेच्या विषयामुळे ही छोटीशी, पण महत्त्वाची भूमिका करताना वेगळीच मजा आली. शिवाय ही मालिका जितकी धमाल आहे, तितकीच धमाल संपूर्ण युनिटसोबत शूटिंग करताना आली, असं आनंद इंगळे यांनी सांगितलं. “सई आणि नचिकेत यांची प्रेमकहाणी सुफळ संपूर्ण व्हावी, असं सगळ्या प्रेक्षकांप्रमाणेच मलाही वाटतं.” या प्रेमकहाणीत आप्पा कसे आणि कोणते अडथळे आणणार आणि त्या अडथळ्यांवर नचिकेत कशी मात करणार हे पाहणं नक्कीच उत्सुकता वाढवणारं आहे.

आनंद इंगळेची हटके भूमिका

आनंद इंगळेने आतापर्यंत अनेक मराठी  मालिका आणि नाटकांमध्ये काम केलं आहे. प्रंपच मालिकेतून आनंद इंगळेने प्रेक्षकांच्या ह्रदयात स्थान मिळवलं. फू बाई फू आणि शेजारी शेजारी पक्के शेजारी अशा मालिकांमधील त्याच्या भूमिकांनी प्रेक्षकांना अगदी खदखदून हसवलं.  आनंद इंगळेची प्रत्येक भूमिकाही नेहमीपेक्षा वेगळी असते. अफेअर डील, तुझ्यात माझ्यात, दोन स्पेशल,लग्नबंबाळ, वस्त्रहरण, वाऱ्यावरची वरत, व्यक्ती आणि वल्ली, सूर्याची पिल्ले या नाटकांमधील त्याच्या भूमिका अनेकांना आजही आवडतात. याचप्रमाणे अनेक मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये आनंद इंगळेला पाहिलं आहे. आता या मालिकेत आनंद इंगळेची नेमकी काय भूमिका असेल आणि त्यामधून प्रेक्षकांचे कसे मनोरंजन होई हे पाहणं नक्कीच उत्सुकतेचं आहे. 

ऑलमोस्ट सुफळ संपूर्णची धमाल

ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण' या मालिकेचा विषय थोडासा हटके असल्यामुळे ही मालिका कमी वेळात टेलिव्हिजनवर लोकप्रिय झाली आहे. ही मालिका एक कॉमेडी मालिका असल्याने यातून प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन होत आहे. खूप हसवत, कोपरखळ्या देत या मालिकेत मराठी भाषा, मराठी संस्कृतीचा अभिमान राखण्याबाबत शिकवणसुद्धा दिली जात आहे. हलक्या फुलक्या मनोरंजक अशा या 'ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण' मालिकेतून एक अनोखी प्रेमकथा या मालिकेत फुलत आहे. आदेश बांदेकर यांच्या 'सोहम प्रोडक्शन'मार्फत या मालिकेची निर्मिती करण्यात आली आहे. या मालिकेतील कलाकार हळूहळू प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. त्यामुळे या मालिकेतील कलकारांविषयी जाणून घेण्यासाठी प्रेक्षक नक्कीच उत्सुक आहेत. 

फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम

हे ही वाचा -

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

अधिक वाचा -

काजोल झाली लेखिका, श्रीदेवीच्या बायोग्राफीसाठी लिहिली प्रस्तावना

दहा बाय दहा'ने नाटकाचा सुवर्ण महोत्सवी टप्पा

सुहाना खान या चित्रपटातून करतेय डेब्यू