बोल्ड सीन्ससाठी फक्त अभिनेत्रींनाच का केलं जातं ट्रोल

बोल्ड सीन्ससाठी फक्त अभिनेत्रींनाच का केलं जातं ट्रोल

बॉलीवूडमधील अभिनेत्री असो वेबसीरिजमधल्या अभिनेत्री असो कोणत्याही प्लॅटफॉर्मवरील अभिनेत्रींना कुठल्या ना कुठल्या कारणासाठी ट्रोल केले जाते. सर्वात जास्त ट्रोल केले जाते ते बोल्ड सीन करण्यासाठी. एवढंच नाहीतर अभिनेत्रींना त्यांच्या निर्णयासाठीही अनेकदा निंदनीय ठरवलं जातं. कारण स्त्री-पुरूष यांच्याबाबतीत करण्यात येणाऱ्या भेदभावाबाबत कलाक्षेत्रही अपवाद नाही. मग ते अभिनेत्रींना मिळणार कमी मानधन असो वा बोल्ड सीनमुळे होणारं ट्रोलिंग असो किंवा शरीराबाबत करण्यात येणारं बॉडी शेमिंग असो.

वेबसीरिज मिर्झापूरमध्ये भूमिका केलेल्या अनंगशा बिस्वासने नेमक्या याच मुद्यावर बोट ठेवत काही प्रश्न नुकत्याच एका मुलाखतीत उपस्थित केले आहेत. तिने पुरूष प्रधान मानसिकतेबाबत प्रश्न विचारले आहेत. तिचे प्रश्न पुढीलप्रमाणे आहेत.

पहिला प्रश्न म्हणजे अभिनेत्रींना नेहमी बोल्ड सीन केल्यावर ट्रोल का केलं जातं? कारण जेवढा सहभाग यामध्ये अभिनेत्रींचा असतो तेवढाच अभिनेत्यांचाही असतो मग त्यांच्याकडे बोटं का दाखवली जात नाहीत. दुसरा प्रश्न म्हणजे अभिनेत्यांना अशा अपमानांचा का सामना करावा लागत नाही? आणि शेवटचा प्रश्न म्हणजे बोल्ड सीन करणं एवढी मोठी बाब का आहे? साधारणतः असं दिसून आलं आहे की, अभिनेत्रींना बोल्ड सीन केल्यामुळे त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यातही टीकेला सामोरं जावं लागतं किंवा त्यांना आवडलेल्या भूमिकेबाबतच लज्जास्पद वाटू लागतं. लोकं हे विसरतात की, अभिनेत्रीने केलेली ही भूमिका काल्पनिक आणि वास्तविक नाही. ही भूमिका समाजाला आरसा दाखवण्याचं काम करत असते. पण आपल्याकडे वर्षानुंवर्ष लोकांची विचार करण्याची पद्धत तीच राहिली असून अजूनही बदलली नाही. जे खूप दुःखद आहे. 

अनंगशाने याबाबत आपले विचार मांडताना सांगितलं की, ही खूपच महत्त्वाची गोष्ट आहे. आपल्याला लवकरच या विचारसरणीबाबत बदल करण्याची गरज आहे. जेंडरबाबत प्रगतीशील व्हिजन लोकांमध्ये येणं आवश्यक आहे. लोकांना हे समजून घ्यावं लागेल की, बोल्ड सीनला पडद्यावर मांडणं हे कोणत्याही युद्धाच्या सीनपेक्षाही जास्त कठीण असतं. तसंच ती हेही म्हणाली की, ट्रोलिंग आणि कौतुक या दोन्ही गोष्टी ती गंभीरतेने घेत नाही. पण जेंडरबाबत करण्यात येणाऱ्या भेदभावाबाबत मात्र तिला बदल आणायचा आहे आणि याबाबत ती ठाम आहे. अनंगशाच्या चित्रपटांबाबत बोलायचं झाल्यास तिने खोया खोया चांद या चित्रपटात सोहा अली खान, शायनी आहुजा आणि रजत कपूरसोबत प्रमुख भूमिका केली होती. याशिवाय तिने लव शव ते चिकन खुराना आणि बेनी बाबू या चित्रपटातही काम केलं होतं. त्यानंतर आता ती लवकरच मिर्झापूर 2 या वेबसीरिजमध्ये जरीनाच्या महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे.

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.