अनन्या पांडेने जेव्हा शेअर केले स्वःतावरील फनी मीम्स

अनन्या पांडेने जेव्हा शेअर केले स्वःतावरील फनी मीम्स

अनन्या पांडे ही अभिनेता चंकी पांडेची मुलगी आहे. जिचा समावेश बॉलीवूडमधील स्टार किड्सच्या यादीत झाला असून पहिला चित्रपट येण्याआधीच तिचे भरपूर फॅन्स झाले आहेत. याला कारण आहे तिचा फॅशन सेन्स आणि तिचे आगामी चित्रपट. अनन्याचा बॉलीवूड डेब्यू करण जोहरच्या 'स्टुडंट ऑफ द ईयर 2' मध्ये टायगर श्रॉफ आणि तारा सुतारियासोबत होणार आहे.

प्रसिद्धी म्हटल्यावर ट्रोलिंग ही आलंच, नाही का? आगामी स्टुडंट ऑफ द ईयर 2 चित्रपटासाठी अनन्याने करणच्या प्रसिद्ध कॉफी विथ करणमध्ये हजेरी लावताच मीम्सच्या दुनियेतही तिची वर्णी लागली. या एपिसोडनंतर अनन्यावरील अनेक मीम्स व्हायरल झाले.
 

Today’s style inspo - Dad in the 80s 🕺🏻


A post shared by Ananya 👩🏻‍🎓💫 (@ananyapanday) on
हे मीम्स सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर सर्वात जास्त खूश आहे ती अनन्या. हो. या मीम्सना तिने एन्जॉय करत स्वतःच्या इन्स्टा अकाउंटवर शेअर केलंय. एवढंच नाहीतर तिने या मीम्समध्ये आपल्या आईबाबांनाही टॅग केलंय. ये हुई ना बात.


ananya memes
अनन्याने या मीम्सशी रिलेट केलं आणि स्वतःच्या इन्स्टा स्टेटसमध्येही शेअर केलं. अगदी त्या पेजेसवर जाऊन लाईक ही केलंय.

एका मीममध्ये अनन्याच्या प्रतिक्रियेवर लिहलं आहे की, जेव्हा नातेवाईक तुम्हाला खाऊसाठी पैसे देत असतात, पण आईबाबा त्यांना नको म्हणतात.

दुसऱ्या मीममध्ये लिहीलं आहे की, जेव्हा तुमचा चार्जिंगला लावलेला फोन कोणी काढायचा प्रयत्न करतं.

जेव्हा आईबाबा तुमच्यासाठी शॉपिंग करायला विसरतात.

जेव्हा गणिताच्या बाई विचारतात की, पाच मिनिटात किती सेकंड्स असतात.

जेव्हा तुमच्याकडे नवीन स्टाईलिश कपडे असतात पण कोणते घालायचे म्हणून तुम्ही कन्फ्यूज होता.   

एका मीममध्ये तिच्यासोबत कार्तिक आर्यनही दिसत आहे. कारण अनन्या ‘स्टुडंट ऑफ द ईयर 2’ नंतर ‘पती,पत्नी और वो’ या चित्रपटात कार्तिक आर्यन आणि भूमी पेडणेकर सोबत दिसणार आहे.


50878388 340223076702127 2914760454490374218 n
अनन्या तू जर तुझ्यावरील ट्रोलिंग आणि मीम्सला असंच मस्तपणे एन्जॉय केलंस तर बॉलीवूडमध्ये तुझी जागा निश्चितच आहे आणि फॅन्सच्या मनातही.


29739626 256636201404158 8920232102641795072 n
ऑल द बेस्ट स्टुडंट ऑफ द ईयर अनन्या.


फोटो सौजन्य - Instagram