कपिलच्या अनायरावर सेलिब्स झाले फिदा, फोटो झालेत व्हायरल

कपिलच्या अनायरावर सेलिब्स झाले फिदा, फोटो झालेत व्हायरल

कपिल शर्मा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. पण आता कपिल पुन्हा एकदा चर्चेत आलाय तो त्याच्या क्यूट मुलीमुळे. कपिल आणि गिन्नीला डिसेंबर महिन्याच्या 10 तारखेला मुलगी झाली असून त्याने नुकताच तिचा एक महिन्यानंतर फोटो शेअर केला आहे. कपिलने तिचं नाव ‘अनायरा शर्मा’ असं ठेवलं असून आपल्या त्रिकोणाचा एक फोटो शेअर केला. तिचा फोटो पाहिल्यानंतर त्याचे चाहतेच नाही तर सेलिब्सही तिच्या क्यूटनेसवर फिदा झाले आहेत. कपिलने तिचा फोटो शेअर करताच अनेक चाहत्यांनी आणि सेलिब्सने त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आणि अनायराच्या क्यूटनेसबद्दलही भरभरून कमेंट्स दिल्या आहेत. कपिल, गिन्नी आणि अनायराचा हा फोटो सध्या व्हायरल होतो आहे. आपल्या इन्स्टा अकाऊंटवरून कपिलने हा फोटो शेअर करत आपला आनंदही व्यक्त केला आहे. दोघांच्याही चेहऱ्यावरील आनंद दिसून येत आहे. कपिलने अनायराचा एक सिंगल फोटो आणि एक पूर्ण कुटुंबाचा फोटो असे दोन फोटो पोस्ट केले आहेत. कपिलने फोटोखाली कॅप्शन लिहिले, ‘आमच्या जीवाचा तुकडा’. या तिघांनाही बघून कपिल आणि गिन्नीचा आनंद नक्कीच त्याच्या चाहत्यांनाही जाणवत आहे. 

 

सेलिब्सने अभिनंदनाचा केला वर्षाव

Instagram

दीपिका आणि रणवीर सिंग हे दोघेही कपिलच्या अगदीच जवळचे आहेत. त्यामुळे रणवीर सिंगनेदेखील कपिलला कमेंट दिली आहे. ‘ओये यार कपिलललल’ असं रणवीरने म्हटलंय. तर कश्मिराने कपिलच्या मुलीला ‘अतिशय सुंदर’ असं म्हटलं आहे. जुबिन नोटियालने अनायराला आशीर्वाद दिले असून मुक्ती मोहनने मजेत कपिलला म्हटलं, ‘कपू पार्टनर, ए वरून नाव, म्हणजे आता शाळेत अटेडन्समध्ये तिचं नाव पहिले येणार’. हिना खानने अनायराला सुंदर असं म्हटलं आहे. नेहा कक्कड तर अनायराला बघून स्वतःला रोखूच शकली नाही. नेहा म्हणाली, ‘अनायरा खूपच सुंदर आहे. मी लवकरच तिला येऊन भेटणार आहे’. याशिवाय  रवी दुबे, कविता कौशिक, करणवीर शर्मा, आहाना कुमरा, सई लोकुर, माही विज या सर्वांनी कपिलच्या अनायराला आशिर्वाद देत तिच्या क्यूटनेसबद्दल कमेंट्स केल्या आहेत. कपिलच्या अनायराला त्याच्या चाहत्यांनीदेखील भरभरून आशिर्वाद देत प्रतिसाद दिला आहे. सध्या सगळीकडे अनायराच्या क्यूटनेसचीच चर्चा आहे. 

कपिल शर्मा आणि गिन्नीच्या बेबीमूनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

दीपिकानेही केलं होतं कौतुक

Instagram

दीपिका पादुकोण कपिलला मुलगी झाल्यानंतर पहिल्याच ‘कपिल शर्मा’च्या भागात गेली होती. त्यावेळी कपिल शर्माने अनायराचे फोटो दाखवले होते. ते पाहताना दीपिकाचे हावभाव पाहण्यासारखे होते. तिचा हा फोटोदेखील खूप व्हायरल झाला होता. दीपिकाचं आणि कपिलचं कनेक्शन सर्वांनाच माहीत आहे. कपिल हा दीपिकाचा सर्वात मोठा चाहता आहे असं तो नेहमीच सांगतो. तसंच दीपिका आणि रणवीरही कपिलला नेहमीच प्रेम देतात. आता अनायरालादेखील हे दोघं नक्कीच पाहायला जातील असंही त्यांचे चाहते सांगत आहेत. 

सलमान खानने दिला कपिल शर्माला ‘हा’ सल्ला

लग्नाच्या एका वर्षात कपिलला झाली मुलगी

कपिल शर्मा आणि गिन्नीचं 12 डिसेंबर 2018 मध्ये लग्न झालं. तर एका वर्षातच अर्थात लग्नाच्या वाढदिवसाच्या आधी दोन दिवस 10 डिसेंबर 2019 ला अनायरला जन्म झाला. अनायराला आता एक महिना झाला असून कपिलने तिचे फोटो शेअर केले आहेत. त्याने थोडंसं वेगळं नावही ठेवलं आहे. कपिलची अनायरा ही नक्कीच आता सर्वांची लाडकी होणार आहे. 

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.