आपल्याच घरात अनिल कपूर करत आहे चोरी, हर्षवर्धनने केला व्हिडिओ शेअर

आपल्याच घरात अनिल कपूर करत आहे चोरी, हर्षवर्धनने केला व्हिडिओ शेअर

बॉलीवूडमध्ये अभिनेता अनिल कपूर आपल्या अभिनयासाठी जितका प्रसिद्ध आहे. तितकाच आपल्या मजेशीर स्वभाव आणि नेहमी उत्साहात असणाऱ्या स्वभावामुळेही प्रसिद्ध आहे. अनिल कपूरकडे पाहून सोनम कपूर, रिया कपूर आणि हर्षवर्धन कपूर अशी तीन मोठी मुलं असतील ही कल्पनाही येत नाही. अनिल कपूरचा उत्साह आणि लुक्स पाहून त्याच्या वयाचा अंदाज बांधणं मात्र कठीण होतं. आता तर अनिल कपूरने असं काही केलं आहे की, त्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. वास्तविक अनिल कपूर आपल्याच घरात चोरी करत असताना पकडला गेला आहे आणि अनिल कपूरला त्याचाच मुलगा हर्षवर्धन कपूरने चोरी करताना पकडलं आहे. याचा व्हिडिओ स्वतः हर्षवर्धनने शेअर केला आहे. 

मुलाचे बूट चोरताना पकडलं अनिल कपूरला

मुलाला आपल्या वडिलांचे बूट व्हायला लागले की, समजावं मुलगा मोठा झालं अशी एक म्हण आहे. वाढत्या वयाप्रमाणे मुलगा नेहमीच आपल्या वडिलांचे बूट घालून बघत असतो. पण जेव्हा वडील मुलाचे बूट चोरून घालायला लागतात तेव्हा? आहे ना मजेशीर. बॉलीवूडमधील हा हँडसम बाबा अनिल कपूरनेदेखील असंच काहीसं केलं आहे. आपला मुलगा हर्षवर्धन कपूरचे बूट चोरी करून घालताना त्याचा व्हिडिओ स्वतः हर्षवर्धनने शेअर केला. सध्या हा व्हिडिओ खूपच व्हायरल होत आहे. आपल्या अधिकृत इन्स्टाग्रामवरून हा व्हिडिओ हर्षवर्धनने पोस्ट केला आहे. यामध्ये दिसून येतंय की, अनिल कपूर आपल्या मुलाच्या कपाटातून एकामागोमाग एक बूट काढत आहे. इतकंच नाही त्यातील बूट घेतानाचा अनिल कपूरचा हा व्हिडिओ फारच क्यूट आहे. हा व्हिडिओ शेअर करताना हर्षवर्धनने ‘बाबांनी केलेली ही चोरी मला अजिबातच आवडली नाहीये पण तरीही माझे सगळेच बूट बाबांच्या पायांवर शोभून दिसत आहेत’ अशी कॅप्शन दिली आहे.  

पिता - पुत्राची कमाल जोडी

अनिल कपूरने हे असं पहिल्यांदाच केलेलं नाही. याआधीदेखील अनिल कपूरने हर्षवर्धनच्या नकळत त्याचे बूट वापरले आहेत. काही दिवसांपूर्वी हर्षवर्धनने आपल्या अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला होता, ज्यामध्ये अनिल कपूरने तेच बूट घातले आहेत जे दुसऱ्या फोटोमध्ये हर्षवर्धनने घातले आहेत. या फोटोवर हर्षवर्धनने लिहिलं होतं, ‘बाबा नेहमी तक्रार करतात की, मी खूपच बूटांची खरेदी करतो, पण मग नंतर स्वतःच ते बूट घालून स्टाईल मारतात’. पिता - पुत्राची ही जोडी कमाल आहे. इतकंच नाही तर अनिल कपूर आपल्या तिनही मुलांवर खूप प्रेम करत असून त्यांच्याशी मित्रांसारखा वागतो हे नेहमीच पाहण्यात आलं आहे. 

हर्षवर्धनचा जम अजून बसला नाही

Instagram

सोनम कपूरच्या पावलावर पाऊल ठेवत हर्षवर्धननेही बॉलीवूडमध्ये प्रवेश केला. पण हर्षवर्धनने केलेले दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर कोणतीही कमाल दाखवू शकले नाहीत. त्याशिवाय हर्षवर्धनच्या अभिनयाचीदेखील जास्त चर्चा झाली नाही. परंतु राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्या चित्रपटातून पदार्पण केल्यामुळे हर्षवर्धनला त्यावेळी चांगलंच फेम मिळालं. पण त्यानंतर हर्षवर्धनचा अजूनपर्यंत एकही चित्रपट आलेला नाही. पण हर्षवर्धन नेहमीच सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतो आणि आपल्या आयुष्यातील लहानसहान गोष्टी सोनमप्रमाणेच शेअर करत असतो. तर अनिल कपूर या वयातदेखील अनेक चित्रपटांच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त असून आपला चाहतावर्ग अनिल कपूरने इतके वर्ष जपून ठेवला आहे.