अनिता हसनंदानीने सांगितले आई होण्याचे आपले प्लॅन्स

अनिता हसनंदानीने सांगितले आई होण्याचे आपले प्लॅन्स

अनिता हसनंदानी हे नाव टीव्ही जगतात खूपच प्रसिद्ध आहे. अनिता गेले कित्येक वर्ष एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे. पण तिला खरी ओळख मिळवून दिली ती ‘ये है मोहब्बते’ आणि ‘नागिन’ या मालिकांनी. अनिताने सहा वर्षांपूर्वी बिझनेसमन रोहित रेड्डीबरोबर लग्न केलं. त्यामुळे आता ती आई कधी होणार असा प्रश्न तिला बरेचदा विचारण्यात येतो. सध्या अनिता आणि रोहित हे ‘नच बलिये 9’ मध्येही सहभागी झाले आहेत. दोघेही आपापल्या कामामध्ये व्यग्र असतात. याआधी अनिताने कधीही या प्रश्नाचं उत्तर दिलं नव्हतं. पण यावेळी मात्र अनिताने आपण नक्की आई कधी होणार आणि हा निर्णय कधी घेणार हे स्पष्ट केलं आहे. 

पुढच्या वर्षी आई होण्याचा करणार विचार

अनिता आपल्या अभिनयासाठी तर ओळखली जातेच पण बऱ्याचदा सोशल मीडियावर आपल्या नवऱ्याबरोबर अनिता फोटो पोस्ट करत असते. प्रेक्षकांना या दोघांची जोडी बघायला खूपच आवडतं. तिचे बरेच फॉलोअर्स आहेत. नुकतंच नच बलियेच्या निमित्ताने दिलेल्या मुलाखतीमध्ये अनिताने आपण कधी आई होणार याचं उत्तर दिलं आहे. अनिताने सांगितलं, ‘रोहित आणि माझ्यावर कधीही कोणाचा दबाव नव्हता. खरं तर आमच्या आईवडिलांनीही कधी याबाबत जास्त विचारणा केली नाही. जेव्हा आम्हाला वाटेल तेव्हा आम्ही हा निर्णय घ्यावा असंच त्यांनीही सांगितलं. इतर कोणी आमच्या बाळाची काळजी घ्यायला येणार नाही, त्यामुळे त्याची काळजी घेण्यासाठी आम्हीच समर्थ असायला हवं.’ 

अनिताने पुढेही सांगितलं, ‘आम्ही पुढच्या वर्षी बाळाचा विचार करत आहोत. सध्या आम्ही दोघंही व्यग्र आहोत आणि आम्ही प्लॅन केल्याप्रमाणे तर नक्कीच होणार नाही, जेव्हा व्हायचं आहे तेव्हाच होईल. प्रत्येक गोष्टीला एक वेळ असतो.’ त्यामुळे तिने आपले प्लॅन स्पष्ट करत आता आयुष्यात पुढे काय करणार आहोत हे स्पष्ट केलं आहे. अनिता आणि रोहित नेहमीच एकमेकांना समजून घेत साथ देताना दिसतात. अनिताच्या प्रत्येक कामात रोहितचा पाठिंबा असल्यामुळेच तिला काम करणं शक्य होतं असंही तिने अनेकदा मुलाखतींमधून सांगितलं आहे. 

अनिता आणि रोहितच्या लग्नाला झाली सहा वर्ष

अनिताच्या आयुष्यात जेव्हा अडचण आली होती तेव्हा रोहिती अनिला भेटला. त्यानंतर काही वर्ष डेट केल्यानंतर 2013 मध्ये या दोघांनी गोव्यात लग्न केलं. रोहित तेलुगू असून अनिता सिंधी आहे. पण तरीही तेलुगू सिनेमांमध्ये काम केलं असल्यामुळे अनिताला तेलुगू चांगलं बोलता येतं. सध्या ही जोडी नच बलियेमध्ये सहभागी झाली असून आपल्या डान्समध्ये कोणतीही अडचण होऊ नये म्हणून 14 तास रिहर्सल करत असल्याची बातमी आहे. अनिता ही चांगली डान्सर असून रोहितही बिझनेसमन असला तरीही चांगला डान्स करतो. त्यामुळे आता या आठवड्यापासून ही जोडी नक्की कशी कामगिरी करणार याकडेही प्रेक्षकांचं लक्ष आहे. इतकंच नाही तर यावर्षीच्या जोड्यांमध्ये सर्वात जास्त मानधन घेणारी जोडी म्हणून या जोडीची चर्चा आहे. अर्थात याबद्दल कोणतीही गोष्ट अनिताने सांगितलेली नाही. त्यामुळे या चर्चेमध्ये कितपत तथ्य आहे हे स्पष्ट होऊ शकलेलं नाही. आता ही जोडी काय कमाल दाखवणार आणि कधी आपल्या चाहत्यांना गुड न्यूज देणार याकडेच सर्वाचं लक्ष लागून राहिलं आहे.